About

Searching...
Thursday, 20 September 2012

Marathwada Mukti Sangram Din

September 20, 2012










आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे पण हे स्वातंत्र्य अधुरे होते. काश्मिर, जुनागड आणि निजाम संस्थानातील जनता अजूनही गुलामीत होती. मराठवाडा आणि तेलंगणात निजामाची राजवट होती. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाला....!

डा.आंबेडकर जी की भूमिका :- मराठवाडा के साथ पूरा हैदराबाद संस्थान का दलितवर्ग एक तरफ निर्धनता और दूसरी तरफ निजामी अत्याचार,दो पाटों के बीच पिसा जा रहा था.निजाम मीर उस्मान अली खान ने डा.बाबासाहब आंबेडकर को २५ करोड का लालच दिखाकर इस्लाम स्वीकारने का प्रस्ताव भेजा था.यदि दलितवर्ग इस्लाम को ग्रहण करता है तो उन्हें ऊंचे ओहदों पर रखा जाएगा इत्यादि सुविधा देने की बात कही थी.डा.अम्बेडकर ने निजाम के प्रस्ताव को यह कहकर ठुकरा दिया कि,"राज्य के दलित भाई आर्थिक दृष्टी से जरूर निर्धन है लेकिन वे मन से निर्धन नही है.रही मेरे इस्लाम ग्रहण करने की बात मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है."बाबासाहब अम्बेडकर ने १८-११-१९४७ तथा २७-११-१९४७ को एक परिपत्र निकालकर जोर-जबरदस्ती धर्मांतरित किये हुये दलितों को आवाहन किया की वे वापस घर आवें.यह पत्र २८नवम्बर के नैशनल स्टैण्डर्ड नामक दैनिक में प्रकाशित किया गया.
-------------------------------------------------------------------------------------
मराठवाडा मुक्ती संग्राम -

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
-----------------------------------------------------------------------------------
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या १७ सप्टेंबर रोजी तब्बल ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ६० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून वेगळे होण्याची भाषा करीत आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? ( डॉ. राजीव भोसेकर)

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....६४ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या नीळ चक्री वादळ  तर्फे सर्वाना हार्दिक शुभेच्या.........!

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.