About

Searching...
Wednesday 22 August 2012

dalit against raj thakre

August 22, 2012



































नवा धर्म ?
विविध जाती-धर्मानी नटलेल्या देशात आणखी एका धर्माची भर पडली काय?
'महाराष्ट्र धर्म' या धर्माचे नामकरण आणि विश्लेषण
कालच भडकावू भाषणे करणार्‍या एका नेत्याने केले
काय आहे हा महाराष्ट्र धर्म ?
निव्वळ विकासाचे 'राजकारण' आणि ते ही केवळ
'महाराष्ट्रापुरतेच मर्यादित'
असा संबंधित नेता व त्याच्या समर्थकांचा दावा आहे,
मात्र केवळ खळ्ळ खट्याक ,राडेबाजी आणि त्यातून भय,
आणि जगण्याची अगतीकता वाढली आणि वाढत आहे.
हाच जर महाराष्ट्र धर्म असेल तर,
माफ करा आम्हाला हा महाराष्ट्र धर्म नको आहे.
केवळ झेंड्यात रंग घेतल्याने समाज भूलत नसतो,
वारंवार भडकाऊ,विरोधी ,शिवराळ गलिच्छ भाषणं, हेटाळणी ,
अपमान हि तुमच्या लेखी विकासाची लक्षणं असतील तर
असा 'विकास' तुम्हालाच लखलाभ असो !!

पक्ष स्थापन करताना "नीळा" रंग दलितांचा
"हिरवा" रंग मुस्लिमांचा असे बोलून
मतपेटित निर्णायक बदल घडविण्याची ताकद असणार्‍या या
एक गठ्ठा मतांचे राजकारण करणार्‍या सर्वच पक्ष आणि त्यांच्या स्वयंघोषित म्होरके
जेव्हा दलित/मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा मात्र शेपूट घालून बसलेले दिसतात
साला मतदानाच्या वेळी झेंड्यांचे रंग दाखवून
भावनिकतेचा फायदा घेऊन मतं पदरात पाडून घेतली जातात
आणि अत्याचारासाठी मात्र "तुमच्या" नेत्यांनीच (आरपिआय नेत्यांनीच) बोलावे
आंदोलनं करावीत?
आम्हि काही करणार नाही.हा काय प्रकार आहे?

खैरलांजी, शेतकरी अत्महत्या या वेळी महाराष्ट्र धर्म झोपला होता का?????
खैरलांजीत दलित स्त्रियांवर अत्याचार झाले त्यावेळी राजने का मोर्चा काढला नाही?????

आजच्या मोर्च्यात इंदू मिलच्या जागाचा विषय काढून बहुजनांच्या भावनांशी खेलण्याच काय कारण?????
आता तरी जागा हो भीमसैनिका ...लाज कशी वाटत नाही अजून तुला..
आरक्षण विरोधी आणि इंदुमील स्मारक विरोधी राज ठाकरेच्या पक्षातून बाहेर पडा

इंदुमील वर काय बंगला बांधायाचा?? असे बोलुन राज ठाकरे यांनी आंबेडकरी अनुयायांचे मने दुखवले आहेत. राज ठाकरे यांनी माफी मागावी. राज ठाकरे चा निषेध..
त्याला म्हणव इंदू मिल चा विषय काढू नकोस...तुझी कोहिनूर मिल देखील त्याब्यात घेऊ...!!! विक्टोरिया टर्मिनल्स चे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनल करायचेय, आपण आनंदाने सर्वात पुढे, आरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक करायचेय, आपण आनंदाने सर्वात पुढे, बॉम्बे चे मुंबई करायचेय, आपण आनंदाने सर्वात पुढे, मग दादर चे "चैत्यभूमी" करायचेय हे मात्र मागेच, इंदुमील च्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक करायचेय, हे मात्र मागेच, का ? का ? अरे हड्ड... तुमची गरज पण नाही आम्हाला, आम्ही आमच्या बाबांचे स्मारक आम्हीच बांधणार, आमच्या घामाने, आमच्या रक्ताने आणि गरज पडल्या तुमच्या रक्ताने सुद्धा....!!!



































0 comments:

Post a Comment