जय भीम....डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)
सुभेदार-मेजर रामजी सपकाळांच्या घरी गोड बातमी होती. तसंही नविन पाहुणा घरी येणार असल्यामुळे घरात अगदी आनंदाचं वातावरन होतं. भिमाबाई पोटातिल अर्भकाशी गप्पा मारण्यात गुंग होऊ लागली. सुभेदारही अधुन मधुन पोटातिल मुलाशी संवाद साधत. अन आतामधे पोटात एक एक महासुर्य आकारघेत होता. हजारो वर्षाच्या सुर्यानी ज्या दलितांच्या जिवनातील अंधार घालविला नाही तो घालविण्यासाठी भिमाईच्या पोटात अर्भकाच्या रुपात हा महासुर्य तेज गोळा करत होता. बाबासाहेबांच्या तेजानी हाजारो वर्षाचा अंधकार सळो की पळो होणार होता. काहि दिवसातच सुर्य सुध्दा शरमेनी मान खाली घालणार होता. कारण ज्या सुर्याच्या प्रकाशामुळे सगळी पृथ्वी न्वाऊन निघत असे. सगळा प्रदेश प्रकाशमान होत असे तरी दलितांच्या जिवनातील अंधार चिरकाल टिकला होता. हा अंधार घालविण्यात सुर्यलाही मात दिल्या जात होती. एवढे सशक्त यंत्रणा या भारत भु वर उभी झाली. ज्या यंत्रणेला तोडण्यात स्वयंम सुर्याचा हजारो वर्षापासुन पराभव होता आला त्या यंत्रणेला पळता भुई कमी होईल ईतकी मर्दुमकी आंगात बाळगणार तेजोमय प्रकाश भिमाईच्या पोटात आकार घेत होता. ६४ कला या मातीची शान म्हणुन मिरविण्या-याना धडा शिकविण्याचं याचं कलांनी ठरविलं होता. सगळ्या कला भिमाबाईच्या पोटात एकवटत होत्या. बुद्धीच्या देवतांना हद्द पार करणारा महान विद्वान आज आईच्या पोटात वाढत होता.
अशा युगपुरुषाला वाढविताना ती माता धन्य होऊन जात असे. या युगपुरुषाच्या जन्माचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसं घरच्या लोकानी त्याच्या स्वागताची जंगी तयारी सुरु केली. हा हा म्हणता युगपुरुषाचा पुथ्वीवर येण्याचा दिवस येऊन ठेपला अन १४ एप्रिल १८९१ साली महासुर्याचा जन्म झाला.
महान मानवाच्य आगमानाचं स्वागत करायला मात्र कुणीच नव्हतं. कोण करणार स्वागत? जर कुणी स्वागत केलं असेल तर हजारो वर्षाच्या दलितांच्या मुक किंकाळ्या स्वागत करत होत्या. हा दलितांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस. आज कोण जन्माला आला याचा कुणालाच अंदाज नव्हता.
हा लहानसा दिसणारा बालक नुसता बालक नव्हता. तो होता दलितांचा भावी सेनापती. हजारो वर्षाच्या गुलामगिरीला झुगारुन दलितांची फौज तयार करणारा हा महान सेनापती सनातन्यांचे सगळे किल्ले उध्वस्त करणार होता. मनु नावाच्या राजाचा कर्दनकाळ आज जन्माला आला होता. धर्माच्या नावाखाली दलिताना चिरडणा-या प्रथांचा बंदोबस्त करणारा एक महान विद्वान या भुमीवर अवतरला होता. स्पृश्य अस्पृश्याचे सगळे बंध तोड्णारा महाशक्तिशाली माणव आज जन्माला आला होता. अन हे सगळ करताना भविष्यात या सेनापतीची फौज कोण असणार होती? तर गुलामांची सेना. ज्याना स्वत:चं हक्क काय असतं हे माहीत नाही अशा गुलामांच्या सेनेचा हा सेनापती फक्त स्वत:च्या बळावर हे युद्ध जिंकणार होता. दासांची, गुलामांची व मेलेल्या ढोराचं मांस खाऊन जगणा-या, गावाच्या बाहेर फेकुन दिलेल्या समाजाची धुरा साभांळणारा, नव्हे नव्हे त्यांना खांद्यावर बसवुन त्यांचं संरक्षण करत एकटाच सगळ्या समाजाशी लढा लढणा-या बौद्धिक, राजकिय व धार्मिक सगळ्या आघाड्यांवर उभ्या भारताला पुरुन उरणा-या अशा महामानवाचा आज भुतलावर सपकाळांच्या घरी स्वागत होत होतं.
पाळण्यातील नाव भीम पण घरी भीवा म्हणु लागले. पुढे याचे भीमराव झाले. भीम अडीच तिन वर्षाचा असतनाच वडिल निवृत्त झाले. लवकरच काप-दापोलीस राहायला आले. येथील मराठी शाळेत थोरला भाऊ आनंदराव शिकु लागला. भीमानेही शिक्षणास सुरुवात केली. त्या काळी काप-दापोली सेवा निवृत्त महारानी गजबजलेलं गाव होतं. लष्करातुन निवृत्त झालेले महार याच गावत बि-हाड थाटत. ओघानेच सुभेदारानीही याच गावात बि-हाड थातलं. या गावात राहणारी सगळी महारं कबिरपंथी, नागपंथी किंवा रामानंदपंथी पैकी कुठल्यातरी एका पंथाचे असतं. सगळा गाव भक्तीभावनेत बुडुन जाई. पुजा अर्चा, भजन किर्तिन नित्य चालत असे. बाल भीमावर ईथेच कबिर पंथाचा प्रभाव पडला. कबिरानी जातीभेदावर कडाडुन हल्ला केला होता. “जात पंथ न पुछ कोई, हरको भजे ओ हरका होई” असा संदेश देणारे कबिर हे सगळ्यात जवळचे व आपले वाटु लागले. म्हणुन महारांचा या पंथाकडे सगळ्यात जास्त झुकाव होता. पण सुभेदार मात्र आजुन नागपंथाचेच होते.
निरनिराळ्या पंथाचे महार, थोड्या फार फरकाने प्रत्येक पंथ भिन्न होता. मग या पंथामधे परस्पर मतभेद होत. सारखं वाद विवाद चाले. यामुळे महारांत गटतट पडले. सपकाळ नागपंथी होते व त्यांचा रामायण, पांडप्रताप ते ज्ञानेश्वरी पर्यंत सखोल अभ्यास होता. मग ते या सगळ्या पंथांवर मात करत. सुभेदारांसमोर वाद विवादात कोणीच तग धरु शकत नव्हता. त्यांची ओघवती भाषा, विचार मांडताना ज्ञानाची जोड, अन तर्काची बैठक सुटत नसे. यामुळे सुभेदार बाजी मारुन नेत असतं. पण लोकाना त्यांचा मत्सर वाटे.
आता ते निवृत्त असल्यामुळे पेन्शनवरच गुजारा करावा लागे. महिना रुपये. ५०/- इतकी पेन्शम मिळत असे. आज पर्यंत उच्च राहनिमाची सवय पडलेली. घरात भरपुर पैसा असायचा पण आता मात्र निवृत्तीवेतनातुन घरच्या गरजा भागविण अवघड झालं होतं. उत्पन्नाचा एखादा मार्ग शोधने क्रमप्राप्त होते. दरम्यान सुभेदारानी परत आपलं बि-हाड मुंबईत थाटलं.
ओळखी अन ब-याच खटपटी नंतर साता-यातील सरकारी कामाच्या विभागात कोठवळा म्हणुन नेमणुक झाली. आता उत्पन्न वाढलं. निवृत्ती वेतन अन वेतन मिळुन एकंदरीत चांगली कमाई होऊ लागली. साता-यातील महारवाड्याच्या जवळपासच राहण्याची सोय झाली होती. लगेच आनंदराव अन बाळ भीमाचे शालेय शिक्षण साता-याच्या लष्करी छावणीतील शाळेत सुरु झाले. आता सगळं काही सुरळीत चाललं होतं. ब-याच गोष्टी मनासारख्या झाल्या होत्या. निवृत्ती नंतरचं आयुष्य स्थीरावलं होतं. सपकाळ धर्माकडे जास्तच झुकावले होते. याच दरम्यानी त्यानी कबिर पंथाची दिक्षा घेतली. आता ते पुर्ण शाकाहारी झाले होते. सगळं सुरळीत चालु होतं अन अचानक भीमाबाईला घशाचा त्रास जाणवु लागला. जमेत तितके दवाखाने झाले, वैद्य व इतर उपचार झाले पण घशाचा आजार कमी होईना. शेवटी याच आजाराने लवकरच भीमाबाईंचे देहावसन झाले. यावेळी भीम फक्त ६ वर्षाचे होते. आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या वळणावरच आई नाहीशी झाली, बाळ भीम कायमचा आईच्या प्रेमास मुकला. सुभेदारांवर तर आभाळ कोसळला. दु:खाचा डोंगर उभा ठाकला. त्याना काय करावे काहीच कळेना (माऊलीची समाधी आजही साता-यात आहे). भीम आईला ’बय’ म्हणत असे. बयच्या अचानक जाण्याने सगळेच खचले. भीमाला सगळ्यात जास्त त्रास होऊ लालगा. आईविना जगणे अत्यंत कठीण झाले होते. मीराबाई नावाची आत्या यांच्याकडेच राहायला होत्या. त्या कुबड्या असल्यामुळे पती व सासरच्यानी नित्य छळ केला. म्हणुन मीराबाई कायमच्या सपकाळांकडे राहु लागल्या. स्वभावाने फार प्रेमळ, काळजीवाहु अन भीमावर भारी प्रेम. आता भीम बये शिवाय रमु लागला. आत्याशी चांगली गट्टी होऊ लागली. आत्याही अगदी आनंदाने भीमाचं करु लागली. दरम्यान तिकडे ब्रिटीशानी एक अत्यंत वाईट व महारांच्या जीवनात दु:खाची भर घालणार निर्णय घेतला. या पुढे महाराना लष्करात घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला. महारांची आता गरज नव्हती. कारण आता लढाया थांबल्या होत्या. मैदाना मर्दुमकी गाजविणारे महार नको होते. अन या कटमागे इतर उच्चवर्णिय व ब्रह्मण होते. जो पर्यंत मैदाना शुर सैन्याची गरज होती तो पर्यंत महार वापरला गेला. राज्यात जरासं स्थैर्य निर्माण झाल्या झाल्या या बहाद्दर महारना बाद करण्यात आलं. आता बसुन खाण्याचे दिवस होते अन महारांचं सुख पहावत नसलेल्या मनुवाद्यानी हा कट रचुन महारांची वाताहत करण्याची सोय केली. कारण १८९० नंतर देशात लढाया संपुर्णपणे बंद झाल्या होत्या.
हा निर्णय ऐकुन सुभेदार संतापले. त्यानी थेट माधवराव रानड्याना गाठलं. महारांच्या वतीने एक निवेदन तयार करुन घेतलं अन सरकारला सादर केला. महाराना सैन्यात नोकरीवर घेण्यात यावं यासाठी बरीच खट्पट केली पण शेवटपर्यंत यश आलं नाही.
आता सुभेदार मनाने पार खचुन गेले होते. एकटेपणा खायला उठायचा अन मुलांचं ओझं एकट्या बहिणीवर पडत असे. म्हणुन त्यानी जीजाबाई नावाच्या विधवेशी पुनर्विवाह केला. ती शिरकांबळे नावाच्या सेवानिवृत्त जमादाराची बहिण होती. पण भीम मात्र आपल्या सावत्र आईचा राग करत असे. ही माझ्या बय चे कपडे घालते, तीचे दागीने घालते म्हणुन राग व्यक्त करत असे. यामुळे तो आपल्या अत्याच्या अवतीभवतीच राहु लागला. आत्याशी जवळीक वाढली. अन याच दरम्यान सुभेदार नोकरी निमित्य कोरेगावी राहायला गेले.
0 comments:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.