About

Searching...
Sunday, 24 June 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)

June 24, 2012
भीमराज का बेटा में  तो जय भीम वाला हून ..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)
याच दरम्यान बाबासाहेब मुंबईत बसुन परत वकिलीचा अर्धवट सोडलेला अभ्यासक्रम कसा पुर्ण करता येईला याच्या विचारात होते. नोकरी मिळने तर कठिण काम होते. त्यांचा अमेरीकेतील शिक्षणात सोबत असलेला मित्र नवल भथेना यानी दोन शिकविण्या मिळवुन दिल्या. किती हा संघर्ष बघा. अमेरीकतुन शिक्षण घेऊन आलेल्या उच्च विद्याविभुषीत माणसाला शिकवणी घेऊन जगावे लागत होते. याच दरम्यान बाबासाहेबनी “स्टॉक्स आणि शेअर्स” संबंधी लोकाना सल्लादेणार कंपनी काढली. बाबासाहेबांचा अभ्यास इतका सखोल होता की त्यांच्या मार्गदर्शनामुळे लोकाना फायदा होऊ लागला. त्यामुळे बाबासाहेबांचीही चांगली कमाई होऊ लागली. पण शेवटी हा जातियवादी लोकांचा देश, एक दिवस एकानी त्यांची जात विचारली अन महार आहे कळल्यावर त्याचा भोबाटा केला. त्यानंतर तो धंदा बंद पडला. आता खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. इतक्यात परत त्याच पारशी मित्राच्या ओळखिने एका धनिक पारशी गृहस्थाचा हिशेव व पत्रव्यवहार करण्याचे काम मिळाले. ईकडे १० शिकलेला ब्राह्मण मलाई खात होते पण जातीच्या नावाखाली एक महान विद्वानाची अशी दशा करुन ठेवणारी ही व्यवस्था किती मानवतेवर शाप होती. याच दरम्याना रसेल यांच्या “सामाजिक पुनर्रचनेची तत्वे” या ग्रंथावर जर्नल ऑफ दी ईंडीयन ईकॉनॉमिक्स सोसायटी च्या अंकात परिक्षणात्मक लेख लिहला. व “भारतातील जाती” हा निबंध पुस्तक स्वरुपाने प्रसिद्ध केला.
एवढ्यात बाबासाहेबाना खबर मिळाली की, सिडनहॅम महाविद्यालयात एका प्राध्यापकाची जागा खाली झाली. बाबासाहेबानी त्या जागेसाठी अर्ज भरला. मुंबईचे माजी राज्यपाल लॉर्ड सिडनहॅम यांच्या प्रयत्नाने ती जागा मिळाली. लंडनला जाऊन अर्धवट सोडलेले शिक्षण पुर्ण करण्यासाठी या नोकरीतुन मिळणारा पैसा कामी येईल या विचाराने बाबासाहेबानी हि हंगामी नोकरी धरली.
व्यासंग, ज्ञाननिष्ठा, विद्यादानाची तळमळ अन शिकविण्याची हातोटी या विविध गुणानी परिपुर्ण असे हे व्यक्तिमत्व जेंव्हा महाविद्यालयात प्रवेशते तेंव्ह महार म्हणुन सुरुवातील जरी मानहानी होते पण वरिल गुणांच्या प्रभावानी सगळा कॉलेज भारावुन जातो. विद्यार्थी बाबासाहेबांचे फॅन बनतात. यापेक्षा उत्तम गुरु लाभणे अशक्य आहे याची जाण होते. अन बाबासाहेबांची ख्याती दिवसेंदिवस वाढत जाते. ईतर महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या सिमिनारसाठी येऊ लागले. ज्याच्या त्याच्या तोंडी यांचं कौतुक हे सगळं चालु होतं. बाबासाहेबही या प्रेमामुळे भारावुन जातात. पण त्याच महाविद्यालयातील शिक्षकानी मात्र त्यांच्या पिण्याच्या पाण्याला स्पर्श करायचा नाही असा दम भरलेला असतो. जो प्राध्यापक विद्यार्थ्यांमधे अत्यंत प्रिय असतो, महाविद्यालयाची शान असतो त्याच महाविद्यालयातील उच्च वर्णीय प्राध्यापक मात्र त्याना हीन वागणुन देत असतात.
याच दरम्याना बाबासाहेबानी मृतप्राय झालेल्या अस्पृश्यांच्या हृदयात धगधगती आग पेटविण्याच्या कार्यशील होतात. प्राथमिक प्रयोग म्हणुन अस्पृश्यांना गुलामगिरीची जाणिव करुन देण्याच्या दिशेनी पाऊल टाकायला सुरुवात केली. मतचाचपणी सुरु झाली अन आपल्याला यश येत आहे हे कळले. त्या काळचे प्रसिद्ध क्रिकेट पटु पी. बाळु हे रोहिदास समाजातुन आलेले हे महान खेळाडु पण जातीपातीच्या लढाईत त्यांचाही नेहमी पायऊतार झालेला. त्यांच्या क्षमतेवर जातीच्या मर्यादा आड आल्यामुळे प्रगती खुंटलेली. बाबासाहेबानी रोहिदास समाजाकरवी या पी. बाळूंचा सत्कार घड्वुन आणला. त्या नंतर मुंबई नगरपालीकेत अस्पृश्यांसाठी एक जागा मिळविली. त्या जागी पी. बाळु यांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे महार समाजात खळबळ माजते, महाराला डावलुन एका चांबाराला ती जागा दिल्यामुळे सगळ्या महारांमधे असंतोष पसरतो. लोकं बाबासाहेबांवर नाराज होतात. पण बाबासाहेबानी सगळ्यांची समजुत काढुन नवा लढा उभारण्यावर लक्ष केंद्रित केले.
याच दरम्यान अस्पृश्यांसाठी कळकळीने झटणारे एक महान विभुती, कोल्हापुरचे मराठी संस्थानीक छत्रपती श्री शाहु महाराज हे अस्पृश्यांच्या विकासासाठी पुढे येतात. अस्पृश्याना आपल्या संस्थानामधे नोक-या दिल्या. जमेल तसं मदत करतात. जे थोडेफार शिकलेले अस्पृश्य होते त्याना वकिलीच्या सनदा दिल्या. अस्पृश्यांच्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मोफत वसतीगृह अन शाळा उघडल्या. सगळा अस्पृश्यसमाज कसा विकसीत होईल याचे धोरणात्मक पाऊल उचलणारे हे महान संस्थानीक अंतकरनातुन दलित उद्दारासाठी झटु लागले. त्यांच्या अंबारीचा माहुत हा महार होता. ते स्वत: अस्पृश्यांसोबत बसुन सहभोजन करित असत. बाबासाहेबांचं हे सौभाग्यस म्हणावं लागेल की शाहु महाराजासारखं महान व्यक्तिमत्व ह्या त्यांच्या समकालीन होतं.
तिकडे कोल्हापुरात महाराजानी अस्पृश्यांच्या विकासासाठी पाऊल उचलले अन त्याच काळात मॉंटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणाच्या अनुषंगाने साऊथ बरो समीती भारतात निरनिराळ्या जातीची मताधिकाराविषयी चौकशी करित होती. अस्पृश्यांच्या वतिने कर्मवीर शींदे अन बाबासाहेबांची या समितीपुढे साक्ष झाली. त्यानंतर बाबासाहेबानी टोपण नावानी टाईम्समधे आपले मत मांडले. “ स्वराज्य ज्या प्रमाणे ब्राह्मणांचा जन्म सिद्ध हक्क आहे त्याच प्रमाणे महारांचाही जन्म सिद्ध हक्क आहे.” हा टिळकाना ईशारा होता. या काळात टिळक टवाळक्या करत हिंडत होते. गल्लो गल्ली स्वराज्य माझा....... वाली डायलॉग मारत फिरत असतं. त्यावर त्याना स्वराज्याचा आजुन एक दावेदार ईथे उभा आहे याची जाणिव व्हावी म्हणुन हि चेतावणी वजा सुचना करणारा लेख सोडण्यात आला होता. हे वाचुन दुसरा दावेदार उभा राहतो म्हणुन टिळक चवताळला. पण उपाय नव्हता. ते या आधी वेदोक्त प्रकरणात हरले असल्यामुळे वचवच करण्यापलीकडे काहिच करु शकले नाही.
दत्तोबा पवार
या व्यक्तिबद्दल मला नितांत आदर आहे. ते बाबासाहेबांच्या फार जवळचे होते. अस्पृश्यांची चळवळ उभी करताना सगळ्यात जास्त झिजलेल्या अनेक माणसांपैकी हे एक. ते बाबासाहेबांची फार चांगले स्नेही होते. तिकडे शाहु महाराज जोमाने अस्पृश्य निवारणावर लक्ष केंद्रीत करत होते अन ईकडे बाबासाहेब नुकतेच त्या मैदानाची चाचपणी करित होते. आजुनतरी बाबासाहेब नावारुपाला यायचेच होते. अन दत्तोबा पवारानी बाबासाहेबांची छत्रपती शाहु महाराजांशी भेट घडवुन आणली. बाबासाहेबाना भेटुन महाराज भारावुन गेले. एक महार जातीत असा तेजोमय पुरुष आहे, याचे त्याना नवल वाटले. एवढं तेज, डोळ्यात आत्मविश्वासाची चमक, शब्दा शब्दातुन सांडणारी विद्वत्ता. एक एक वाक्य म्हणजे एक एक ग्रंथच जणू. विषय समजावुन सांगताना दिसणारी ज्ञानाची खोली. एकंदरीत महाराच्या रुपात शाहुंच्या पुढे एक फरिश्ता उभा होता. सगळ्या विद्वनाना लोळविण्याची बौद्धिक ताकत बाळगणारा असा महाबली भीम बघुन शाहु थक्क होतात. एकदा नजर भरुन बाबासाहेबांकडे बघतात. त्याना जाणवतं की हे साधारण व्यक्तिमत्व नव्हेच, ते ओळखतात त्यांच्या समोर उभा असलेला माणुस जरी इतरांसारखा हाडामासाच दिसतोय तरी तो तसा नाहीच. त्याच्या प्रत्येक हाडामासात ज्ञानाचे झरे वाहताहेत, त्याच्या वाणिमधे युगप्रवर्तकाचा ध्वनी निनादतो आहे. त्याच्या नजरेत हजारो वर्षाचा अंधकार झटकुन टाकण्याचं तेज आहे. हा पुढे असलेला माणुस महान विद्वान असुन दलिताना ईतक्या शतकानंतर आज युगप्रवर्तक सापडल्याचं शाहु महाराजाना साक्षात्कार होतो. अन महाराज बाबासाहेबाना म्हणतात, आंबेड्कर तुम्ही ज्ञानी आहात, दलितांचे खरे कैवारी आहात. मी तुम्हाला अर्थसहाय्य करतो तुम्ही पाक्षिक काढावे अन समाजाची सेवा करावे. हे वाक्य ऐकुन बाबासाहेब आनंदाने न्हाऊन निघतात. कारण त्याना माहित होतं, वृत्तपत्राशीवाय कुठलिही चळवळ हि लंगडी असते अन आज त्याना चळवळीला गतिमान करण्यासाठी एक महान कर्तुत्वानी पुढकार घेऊन मदतीचा हात दिला.
३१ जानेवारी १९२० साली मूकनायक सुरु केले. अन हाच तो दिवस जेंव्हा भारताच्या राजकिय व सामाजीक नभात आंबेडकर नावाचा तारा उगवला.
पण बाबासाहेब प्राध्यापक म्हणुन नोकरी करित असल्यामुळे त्याना स्वत:च्या नावाने हे पाक्षिक चालविता येणार नव्हते. म्हणुन त्यानी पांडुरंग नंदराम भटकर याना संपादक नेमले. भटकर जातीने महार होते. ते बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे होते. त्यांच पुण्यातील डी. सी. मिशनमधुन मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं होतं. त्यांची बायको ब्राह्मण होती. म्हणुन ईतर महार जरा नाराजच होते. भटकर हा जरी महार असला तरी ब्राह्मण बायकोमुळे एकंदरीत तो ब्राह्मणी विचाराच आहे किंवा तसा त्याच्यावर प्रभाव आहे असा एकंदरीत समज होता. पण बाबासाहेबानी याही वेळी कार्यकर्त्यांची समजुत घालुन हे सगळं ईथेच मिटवलं. पण आग आतुन धगधगत होती.
पहिला अंक
मूकनायकच्या पहिल्या अंकात बाबासाहेब सडेतोड लेख लिहतात. ब्राह्मणी व्यवस्थेवर ताशेरे ओढतात. हिंदुस्थाना हा देश म्हणजे विषमतेचे माहेर घर आहे. अन हिंदु हा समाज अशी ईमारत आहे जिथे वेगवेगळ्या जातीचे मजले आहेत. अन एका मजल्या वरुन दुस-या मजल्यावर जाण्यासाठी शिडी नाही. जो जिथेल्या मजल्यात जन्मला तो तिथेच मरतो. या ईमारतीचा सगळ्यात वरचा मजला ब्राह्मणानी काबिज केला आहे. नंतरचा मजला क्षत्रिय, वैश्य अन सगळ्यात खाली शुद्रांचं वास्तव्य आहे. शुद्राना या ईमारतीत कायमचे बंदिस्त केल्या गेले आहे. असा रखरखीत लेख लिहुन बाबासाहेबानी वर्णव्यवस्थेचा समाचार घेतला.
माणगाव: अस्पृश्य परिषद
या दरम्याना बाबासाहेबानी मूकनायकांमधुन हजारो वर्षाच्या मूक दलितांच्या किंकाळ्याना वाट करुन दिली. त्याना ईमाने इतबारे दलितांचे प्रतिनिधीत्व केले. ते स्वत: जाती पातीच्या चटक्यानी पोळुन निघालेले होते म्हणुन सगळी ताकत एकवटुन मूकनायकातुन हा दलितांचा नायक आता बोलु लागला होता. आज पर्यंत मूक असलेले विचार ईथुन मांडु लागला अन या विचारानी प्रेरीत होऊन तळागळातुन दलित बांधव बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहु लगला. याच वर्षी मार्च महिन्यात माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरली. छत्रपती शाहु महाराजांचे या परिषदेस आगमन झाले. त्यानी भाषणात दलिताना उद्देशुन म्हटले, “ माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजनानो, तुम्ही तुमचा पुढारी शोधुन काढलाय, तुमचे दु:खाचे दिवस आता फार लवकर संपणार आहेत. आंबेडकर नावाचा एक विद्वान तुमच्यासाठी या भुतलावर आलाय. तुमच्या गुलामगीरीच्या बेड्या कापुन तुम्हाला मुक्त करण्यास एक अन तुमच्य आयुष्यात नवचैतन्य भरण्यास एक युगप्रवर्तक आला आहे. तोच तुमचा खरा नेता आहे. आज तुमचा नेता असलेले हे विद्वान फार लवकरच उभ्या भारताचा नेता म्हणुनही स्विकारले जातील.” अन एक शब्दानी परिषदेतील दलित बांधव पुनर्जन्म घेत होता. हे नुसते शब्द नव्हतेच, या पुनर्जन्माच्या कळा होत्या. गुलामगिरी झिटकारुन आत्मसन्मानाने जगण्यासाठी दिलेली ती क्रांतीकारी हाक होती. गुलामगिरीची जाणीव होऊ लागली, अन बाबासाहेबांच्या साथीने ही गुलामगीरी कायमची संपविण्याच्या दिशेनी हे पहिले वहिले जाहीर पाऊल टाकताना अस्पृश्य समाज फार सुखावुन गेला होता.

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.