About

Searching...
Tuesday 26 June 2012

भीमशक्ती फक्त लढ म्हणा...डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)

June 26, 2012
भीमशक्ती फक्त  लढ म्हणा...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)
वडिल गोरेगावी नोकरीस असताना सगळ्या भावंडानी वडिलाकडे जाण्याचा बेत रचला. पत्र लिहुन वडलाना येण्याची तारिख कळविली. अन ठरल्याप्रमाणे सगळी भावंड आगगाडीने पाडळी ते मसुर पर्यंत आली. पण वडिलाना पत्र मिळालेच नव्हते. आपल्या भारतातील पोस्ट खात्याच्या आपले दिव्य गुणांमुळे पोरांवर भयानक संकट ओढावलं. आगगाडी रात्री पोहचली होती. स्टेशनवरील सगळे प्रवासी हळू हळू नाहीसे झाले. हि भावंड मात्र वडिल कुठे दिसतात का म्हणुन केविलवान्या नजरेनी शोधशोध करत होती. बघता बघता स्टेशनवर चिटपाखरु उरलं नव्हतं. आता मात्र सपकाळ भावंडाची धांदल उडाली. एवढ्या रात्री कुठे जावं? काय करावं काहिच सुचेना.
स्टेशन मास्तराच ब-याच वेळेपासुन पोरांवर लक्ष होतं. सगळे गेले तरी पोरं ईथेच का थांबलीत त्याना प्रश्न पडला. भीमाच्या व इतर भावंडांच्या अंगावरील कपडे बघुन कुणीतरी सुखवस्तु कुटूंबातील मुलं असल्याचं जाणवत होतं. विचार पुस करावी म्हणुन स्टेशन मास्तर पुढे सरसावले. पण त्याना जेंव्हा कळलं की ही महाराची पोरं आहेत तेंव्हा ते दोन पाऊल मागे सरकले. माणुसकी म्हणुन एक बैलगाडीवाला गाठुन दिला.
बैलगाडी भाड्याने घेऊन पोरं गावाकडे निघाली. बैलगाडीवाला पुढे बसुन गाडी हाकत होता. पोरं मागे बसुन गप्पा मारत होती. काही अंतर पुढे गेल्यावर पोरांच्या गप्पांवरुन गाडीवाल्याने हेरलं की तो महारांच्या पोराना बैलगाडीत बसवुन नेतो आहे. हे त्याच्या साठी फार अपमानाची गोश्ट होती. जरी तो दिड दमडीचा बैलगाडीवाला होता तरी त्याची जात ही महारापेक्शा उच्च होती. महाराची पोरं आपल्या गाडीत बसली याचा त्याला प्रचंड रागा आला. गाडी जाग्यावर थांबुन मागे आला. एक एक पोराला उचलुन गाडीच्या बाहेर फेकुन दिलं. लहानची पोरं, बाहेर किर्रकिट्ट अंधार. पिण्याचे पाणि संपत आलेले अन वरुन हा अत्याचार. पोरं भितीने किंचाळु लागली, पाय धरुन विणविण्या केल्या. तरीकाही जातियवादाचा बळी बैलगाडीवला ऐकायला तयार नव्हता. शेवटी दुप्पट भाडे देण्याचं ठरलं अन गाडीवाला तयार झाला. पण तडजोड बघा काय ठरली. भाडं जरी दुप्पट दिलं तरी महारांचा स्पर्श झाल्यास त्याला विटाळ होईल. म्हणुन पोरानी गाडी हाकायची व हा गाडीवाला गाडीच्या मागे मागे चालेल असं ठरलं. अन पोरं गाडी हाकु लागली व ठरल्या प्रमाणे गाडीवला मागे चालत होता. वाटेत पिण्याचे पाणे नाही, खायला अन्न नाही, अशा प्रकारे अर्धमेल्या अवस्थेत पोरं घरी वडलांकडे पोहचलीत.
आता बाळ भीमाचे शिक्षण सुरु झाले होते. शाळेत बसायला गोणपाटे न्यावे लागे. इतर विद्यार्थी ज्या चटईवर बसत त्या चटईवर बसण्याची परवानगी नव्हती. शिक्षक भीमाच्या पुस्तकाना हात सुद्धा लावत नसत. त्याचा होमवर्क तपासायचे असल्यास दुरुन बुक उघडुन दाखवावे लागत असे. आता भीमाला हळू हळू कळु लागलं होतं की तो अस्पृश्य आहे. त्याचा स्पश इतराना चालत नाही. पाणि प्यायचे असल्यास ओंजळ करुन तोंड वर करावे लागे अन इतर कुणीतरी वरुन ओंजळीत पाणि सोडत असत. एकदा भिमाला खुप तहान लागलेली होती. जवळच एका हिंदुचा पाणवठा होता. बाळभिमानी तिथे पाणि पिण्याची चुक केली. महारानी ईथे पाणि पिल्याची शिक्षा म्हणुन भिमाला काळानिळा होईस्तोवर मारण्यात आले. गुरासारखं मार खाल्यामुळे पुढे आठवडाभर शाळेला बुट्टी मारावी लागली. आता मात्र भीम आतुन पेटुन उठला. हे सगळं शाळेतील मास्तराना कळल्यावर सगळे हळहळले. डोई करण्यास न्हावी तयार नसे म्हणुन बहिणच ओट्यावर बसवुन भिमाची डोई करत असे. अशा प्रकारे पदोपदी अत्याचार सहन करत जगावं लागत होतं. प्रतिकाराची ठिणगी पडण्याच्या दिशेनी पाऊल पडायला अजुन बराच अवकाश होता. एक लढवय्या या सगळ्या प्रथांची सुट्टी करणार होता सगळ्यांवर भारी पडणार होता, पण आज मात्र प्रथा भिमांवर भारी पडत होत्या.

हट्टी स्वभाव
आता भिम दुस-या वर्गात शिकत होता. स्वभावाने फार हट्टी होता. एकदा कुणितरी त्याला पाण्यात भिजण्याचं चॅलेंज दिल. भिमानी लगेच आपल्या भावाकडे पुस्तकांचा दप्तर दिला अन भिजतच शाळेत गेला. भिजलेल्या भिमाला पाहुन पेंडसे गुरुजीनी विचारना केली. तेंव्हा भिम उत्तरला की छत्री एकच आहे व ती भावाला दिल्यामुळे मी भिजत आलो. गुरुजीना भिमाच्या खोडकरपनाची बातमी कळली होती. त्यानी भिमाला आपल्या घरी नेलं, गरम पाण्यानी आंघोळ घातली व घरची एक जुनी लंगोट बांधायला दिली. धष्टपुष्ट असा बाळ भिम लंगोट मधे शाळेच्या आवारात शीळ घालत फिरत होता. “लंगोटमधे वर्गात बसायची लाज वाट्ते का? चल ये अन बस वर्गात.” असा दम पेंडसे गुरुजीनी भरल्यावर मुकाटयाने वर्गात येऊन बसावं लागलं. ह्या आठवणी सांगताना बाबासाहेब स्वत:च लाजुन जात. असल्या गप्पात रंगले कि त्यांच्य मनात गुदगुल्या होतं. याच दरम्यान न्या. रानडे वारले अन शाळेला सुट्टी मिळाली. सुट्टीचा ते नेहमी उल्लेख करत. बालपणी हे रानडे म्हणजे कोण होते याची काळीमात्र कल्पना नव्हती असं ते नेहमी सांगत.

आंबेडकर गुरुजी.
याच माध्यमिक शाळेत आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. भिमावर त्याचं अत्यंत प्रेम. एक दिवस भिम शाळेत आला नाही तर ते चौकशी करत. शेजारपाजारच्या विद्यार्थ्यांकडे तसा निरोप पाठवत. घराबाहेरील सहानुभुती शुन्य रखरखीत वाळवंटात सापडलेली हि प्रेमळ हिरवळ. भिमाला सुद्धा या हिरवळीची सदा ओढ असे. शाळेत गेल्यावर आंबेडकर गुरुजी व पेंडसे गुरुजींना बघितल्या शिवाय मन मानत नसे. ते जरावेल दिसले नाही तर भिमही अस्वस्थ होत असे. पेंडसे व आंबेडकर हे शत्रुच्या प्रदेशात आपली काळजी घेणारे, माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांची उंची वाढली पाहिजे असा विचार बाळगणारे व ते प्रत्यक्षात उतरविणार भिमाचे दोन आधारस्तंभ होते. या दोन व्यक्तिच्या रुपाने भिमाला प्रेमाचा झरा सापडला होता. अन भिमही या झ-याच्या अवती भवतीच राहणे पसंद करित असे. मधल्या सुट्टीत रखरखत्या उन्हात भिम घरी जात असे. हे लक्षात आल्यावर आंबेडकर गुरुजीनी एक दिवस भिमाला बोलविले. ओंजळीत वरुन भाजी भाकर टाकली. ही भाकर जरी वरुन टाकली होती तरी त्यात प्रेमाचा ओलावा होता. त्या अन्नात माणुसकीचा सुगंध होता. या प्रेमाणे वाढलेल्या भाकरीची गोडी अविट होती. आपुलकिच्या या झ-यात भिम न्हाऊन निघाला. आता हे रोजचं नित्यक्रम झालेलं होतं. अशा या प्रेमळ व निर्मळ गुरुजींची आठवण झाल्यास बाबासाहेबांचा कंठ दाटुन येई. याच आंबेडकर गुरुजीनी बाळभिमाला आडनाव बदलविण्याचं सुचविलं. नंतर गुरुजीनी शालेय दप्तरात तशी नोंद करुन घेतली अन बाबासाहेबांच आडनाव आता आंबेडकर झालं होतं. पुढे बाबासाहेबानी हे नाव अजरामर केलं. गुरुजींच्या आडनावाचा डंका बाबासाहेबांनी जगभर वाजविला. जेंव्हा बाबासाहेब दलितांचे प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेला निघाले होते तेंव्हा आंबेडकर गुरुजींच एक पत्र आलं. ते पत्र होतं शुभेच्छांच, आपल्या प्रिय शिष्याला विजयी होण्याच्या आशिर्वाद देण्याचं. ज्या कार्यासाठी निघालास त्या कार्यात तुला भरपुर यश येवो. तुझा लढा रंजल्या गांजल्यासाठी, अपेक्षितांसाठी आहे. तो तुला जिंकायचाच आहे. शत्रु फार बलाढ्य आहे. पण तुझ्या पाठिशी माझा आशिर्वाद आहे. तुझा या लढ्यात विजयी होवो. हे पत्र बाबासाहेबानी जतन करुन ठेवलं. अन बाबासाहेबानी गुरुजीचा शब्द नि शब्द खरा करुन दाखविला. पुढे बाबासाहेबान भेटण्यासाठी गुरुजी त्यांच्या दमोदर हॉलच्या कार्यालयात आले तेंव्हा या सदीचा महान विद्वान अन किर्तिमान शिष्य आपल्या गुरुजींच स्वागत करताना गदगदुन रडला. त्याना पोशाख देऊन स्वागत केला व गुरु शिष्यानी मनसोक्त गप्पा मारल्या. खरतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची आठवणही न ठेवणा-या आमच्या या पिढीसाठी संदेश देणारी हि भेट होती. बाबासाहेबांचा हा मोठेपणा होता. आपण कितीही किर्तिमान झालो तरी गुरुंचा सदैव मान राखला जावा याचं हे उदा. होतं. अन बाबासाहेबांची थोरवी ईथेही जाणवते. अशा कित्येक घटनांतुन बाबानी अनेक संदेश दिले आहेत. आपण फक्त डोळसपणे बघण्याची गरज आहे.
इंग्रजी दुसरी तिसरी पर्यंतच शिक्षण यथातथाच चालला होता. उनाडक्या वाढल्या होत्या. घरी सावत्र आईशी पटत नव्हतं. बाहेर लोकं विटाळच्या नावाखाली जमेत तितका छळ करीत असत. एकंदरीत आयुष्याच्या सुरुवातीलाच नकारात्मक किंवा चिड निर्माण होईल असे अनुभव बालमनावर खोलवर परिणाम सोडुन जात. केंव्हा केंव्हा सगळं जग पेटवुन देण्या इतकी चिड येई. एकदा सावत्र आईनी बयचे दागिने घातले म्हणुन भिमानी विरोध दर्शविला. यावरुन घरी खुप भांडण झालीत. वडिलानी भिमाला बरच सुनावलं. बापाची सारखी बोलणी खावी लागे. अन स्वभाव हट्टी असल्यामुळे भिमही काही ऐकत नव्हता. आता वड्लांमधे अन भिमामधलं अंतर वाढु लागलं. अशावेळी आत्याचा फार आधार वाटायचा. रोज रोज बापाशी बिनसत असल्यामुळे आता भिमाने सातारा सोडुन मुंबईस पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत गिरणीमधे कामगार म्हणुन काम मिळते असं ऐकुन होता. पण मुंबईत जायला पैसे लागतात. भिमाकडे पैसे नव्हते, पण जाण्याचा निश्चय केला अन एक शक्कल लढविली. आत्याच्या कमरेला जी पैशाची पिश्वी होती तो रात्री झोपेत चोरायची अन मुंबईस निघुन जायचं अस ठरलं. सगळी भावंड आत्या सोबतच झोपत असतं. पिश्वी पळवायला वेळच मिळत नसे. पण हार मानने भिमाच्य रक्तात नव्हतं. एक दिवस त्यानी पिश्वी चोरलीच. पण फार निराशा झाली. त्या पिश्वीत फक्त अर्धा आणा होता. या अर्ध्या आण्यात काहीच होणार नाही हे कळल्यावर भिमानी मुंबईला जाण्याचा नाद सोडला. काही दिवस सातार स्टेशनवर हमालीही केली. या दरम्यान अभ्यासावरील लक्ष कमी झालं. पोरागा वाया गेला म्हणुन घरची लोकं म्हणत. शाळेतुनही चांगला शेरा मिळत नव्हता. पण हे सगळ करुन झाल्यावर भिमाला नविन साक्षात्कार झाला. आपण हिच जिद्द अन हट्ट अभ्यासात वापरला तर आपला ध्येय गाठु शकतो. निर्णय बदलला. पळून जाण्यापेक्षा लढुन मोठे होऊ असा निर्धार केला. आता सगळा हट्ट अन जिद्द तशीच होती पण ती अभ्यासावर केंद्रित करण्यात आली. घरात नसले वाद व कटकटी असुन सुद्धा भिम मात्र एकाग्रचित्तेनी अभ्यास करु लागला. बघता बघाता शाळेतील निकालात भिमाच्या कष्टाचा परिणाम दिसू लागला. भिमावर प्रेम करणारे शिक्शक परत सुखावु लागले. ज्या विद्यार्थ्यावर आपण एवढं प्रेम केलं तो परत अभ्यास करु लागल्याचा त्याना आनंद झाला. अन आता शाळेतिल शिक्षक सुभेदाराना बोलुन दाखवु लागले.
“सुभेदार, वाट्टेल ते करा, पण पोराला मात्र शिकवा!”

0 comments:

Post a Comment