About

Searching...
Wednesday, 27 June 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)

June 27, 2012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)
वडलांच्या मृत्युनंतर भीमराव खचुन गेले. आज पर्यंत सगळ्या दुनियाशी झगडताना सुभेदार कायम पाठीशी उभे असायचे. भीमरावांचा कायमचा आधार एकाएकी नाहिसा झाला होता. बडोद्यात जाऊन नोकरीवर रुजु होण्याची ईच्छा होत नव्हती. पण अबोल महत्वकांक्षा गप्प बसु देत नव्हत्या. दलित समाजाचं नेतृत्व आज वडिलांच छत्र हरविल्यामुळे पोरकं झालं होतं. सावरायला थोडा वेळ लागणार होता. वरुन कुटुंबाची जबाबदारी यांच्यावरच पडली होती. आता दोन दोन आघाड्यावर लढायचं होतं. कुटुंब प्रमुख अन जातियवादी व्यवस्था अशा आघाड्यावर लढण्याची तय्यारी करावी लागणार होती. शेवटी शेवटी वडील कर्जबाजारी झाले होते. एकंदरीत परिस्थीती फार बिकट होती. एकाच वेळी ब-याच अडचणी येऊन दारात धडकल्या होत्या. याच चिंतेत असताना बडोदा नरेशांची मुंबईत भेट घेण्याची संधी मिळाली. याच दरम्यान बडोदा नरेशानी ४ विद्यार्थ्याना अमेरीकेत उच्च शिक्षणघेण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. या भेटीत महाराजानीच भीमरावाना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले. भीमरावानी तसा अर्ज दाखल केला. बडोदे राज्यातील शिक्षण मंत्रालयाने अमेरीकेतील शिक्षणासाठी बाबासाहेबांची निवड केली. केवढा हा योग. कित्येक अर्ज आले होते पण ईतक्या अर्जामधुन एक महार मुलाची निवड होते तेही अमेरीकेत शिक्षणासाठी. महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच, आम्ही सगळे महाराजांचे ऋणी आहोत. तेंव्हा हि संधी मिळाली नसती तर आजही आम्ही वेशीबाहेरच असतो. बाबासाहेबाना अशी संधी देणारे बडोदा नरेश यांच्या या महान कार्याला सतश: प्रणाम.
भीमरावाची निवड झाल्यावर करार पत्रावर सही करण्यासाठी ते बडोद्याला रवाना होतात. ४ जुन १९१३ रोजी उपशिक्षण मंत्र्यासमोर बाबासाहेबानी करार पत्रावर सही केली. या करारा नुसार अमेरीकेतील शिक्षण पुर्ण केल्यावर भीमरावानी बडोदा सरकारकडे १० वर्षे नोकरी करावी असे ठरले.
आज आनंदाचा दिवस होता, मनात उत्सव साजरा होत होता. विलायतेत जाऊन ज्ञान संपादन करण्याची आगळी वेगळी संधी चालुन आली होती. बडोना नरेशाला मनातुन अनेक धन्यवाद देत बाबासाहेब मुंबईच्या दिशेनी निघाले. नुकताच पितृवियोग झाल्यामुळे खिन्न झालेल्या, खचलेल्या भीमरावाना परत उठुन जोमाने कामाला लागण्यास प्रवृत्त करणारी एक अपुर्व संधी अचानकच चालुन आली होती.
१९१३ मधिल जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्या बाबासाहेब न्युयॉर्कला पोहचतात. अमेरीका हा लोकशाहिचा पाया घालणारं देश. समानतेची क्रांती जिथे झाली त्या देशात पाय ठेवताना बाबासाहेब फार सुखावुन गेले. हि अब्राहम लिकंनची माती होती, लोकशाहीचा पाया ईथेच रचला गेला, प्रत्येकाला राजकीय हक्क बाजवण्यासाठी निवडनुकीचे अवलंब करणारी समावेशक यंत्रणेचा पुरस्कार करणारी ही माती. बुकर टी. वॉशिंग्टनची ही भुमी. आज एक युगप्रवर्तकानी या उदात्त भुमित पाय ठेवले. एक दलित ज्याचा स्पर्शही लोकाना वर्ज्य होता तो आज या विकासाची व मानवी हक्काचे कळस गाठलेल्या देशात पाय ठेवले.
सुरुवाती विश्वविद्यालयाच्या वसतीगृताह वास्तव्य होते. पण तिथेलं खान पान अगदी वेग्ळं होतं. बाबासाहेबांची उपासमार होऊ लागली. त्यानी पाश्चात पद्धतीचं जेवण फारसं आवडेना. नंतर ते हिंदु विद्यार्थ्याकडे राहायला गेले. नवल भथेना नावाच्या पारसी विध्यार्थ्याबरोबर लिव्हिंग्स्टन हॉल मधे राहु लागले. ईथे एकदाचं ठाव ठिकाणा पक्का झाला. आता जोमाने अभ्यासाला लागण्याचे दिवस होते. हे महाविद्यालयाचे सुरुवातीचे दिवस अन वरुन अमेरीका सारखा संपन्न देश. सुबत्ता लाभली की लोकं चैनीने राहण्याकडे झुकतात. शृंगाराची आसक्ती वाढते. पण बाबासाहेब मात्र यातल्या कुठल्याच गोष्टीकडे आकृष्ट झाले नाहीत. विशिष्ट उद्देशाने प्रेरीत होऊन अभ्यासाचे कित्ते गिरविणार हे महापुरुष आपल्या ध्येयापासुन एक इंचही हटले नाहीत.
येथील बरोबरीची वागणुक त्यांच्यात दहापट स्फुर्ती भरुन देई. आज पर्यंत ईकडे भारतातील तुच्छ वागणुकीची सवय पडलेले बाबासाहेब या समानतेच्या वागणुकीने पार भारावुन गेले होते. एकत्र बसुन जेवणे, खाणे पिणे, व कुठल्याच ठिकाणि उच निच भेदभाव नसल्यामुळे मन प्रसन्न होत असे. हा समतेचा सुखद साक्षात्कार होता. यामुळे मनाची क्षीतिजं विस्तारु लागली होती. आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. अंगी सामर्थ्य वाढविण्याची संधी खुणावत होती. सर्व शक्ती एकवटुन व आपले दायित्व ओळखुन अध्ययन सुरु झाले. सुखविलासात रमण्याच्या पायरिवर उभं राहुन त्यागाचे कित्ते गिरवायला सुरुवात झाली. मिळालेल्या शिष्यवृत्तीत जेमतेम खर्च भागत असे. त्यातुनही काही पैसे वाचवुन रमाईसाठी मुंबईला पाठवित असतं. त्यांच्या एका दिवसाचा जेवणाचा खर्च एक डॉलर दहा सेंट ईतका होता. हात आखडुन खर्च करावे लागे. धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला अन आयुष्याचा प्रत्येक क्षण सुद्धा योग्य ठिकाणी वापरला. त्यांच्या नियोजनाला तोड नाही, ठरविल्या प्रमाणे वागुन यश संपादन करण्यात त्यांचा स्वत:ला झोकुन देण्याचं गुण उपजतच अंगी होतं.
प्रा. एडविन आर. ए. सोलिग्मन यांचा भीमरावांवर अत्यंत प्रभाव. हे प्राध्यापक महाशय फार विद्वान. शिकविण्यातील त्यांचा हतखंडा फार आगळा अन विद्यार्थ्यांवर छाप पाडणार तल्लख बुद्दीचं हे तेजस्वी व्यक्तीमत्व प्रत्येक विद्यार्थ्यावर आपला प्रभाव सोडुन जात असे. भीमरावांवरही या प्रध्यापकाचं विलक्षण प्रभाव पडला. प्राध्यापकाकडुन जास्तीत जास्त ज्ञान संपादन करण्यासाठी सदैव उत्सुक असतं. एकदा भीमरावानी प्राध्यापक महोदयाना विचारलं की, संशोधनाची सर्वोत्तम अन प्रभावी पद्धत कुठली? यावर प्राध्यापक महाशयानी उत्तर दिल.
“आपले काम कळकळीने केल्यास संशोधनाची स्वत:चील पद्धत तयार होते”
या वाक्यानी भीमराव आंबेडकरांवराना संशोधनाच्या नविन मार्गाच्या पाऊलखुणा दाखविल्या. संशोधनाच्या मार्गावर भीमानी चांगलीच गती प्राप्त झाली. रोज १८ तास अभ्यास करण्यास सुरुवात झाली. अभ्यासात स्वत:ला झोकुन देलं. प्रचंड वाचन सुरु झाले. विविध विषयाची पुस्तकं पालथी घालु लागले. ज्ञानाचा भांडार सापडल्याने त्याना ज्ञानग्रहनाशिवाय ईतर काहिही सुचत नव्हते. दिवस रात्र एकच काम चालु होते.
१९१५ साली दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर “प्राचिन भारतातील व्यापार” (Ancient Indian Commerce) हा प्रबंध लिहुन एम. ए. ची पदवी संपादन केली. अन मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “भारतातील जातीसंख्या, तीची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास” (Caste In India, Their Mechanism, Genesis & Development) ह्या विषयावर त्यानी एक निबंध वाचला. मनुचा उद्दटपाण ईथे जगासमोर माडताना त्याना भरुन आलं. याच्या आधी स्वामी विवेकानंदाच्या बंधु आणि भगिनीनो या शब्दानी भारावुन गेलेल्या अमेरीकन लोकाना आज भारताचा खरा चेहरा समजला होता. आज पर्यंत ईथे आलेल्या प्रत्येक माणसाने भारत कसा महान आहे व त्यांची संस्कॄती कशी चांगली आहे हेच सांगितले. आपले सगळे कुकर्म लपवुन ठेवले होते. आज मात्र दलित समाजाती खुद्द जातीयवादाचे अनेक चटके पाठीवर घेऊन अमेरीकेत आलेला एक विद्यार्थी या समस्त हिंदुनी विदेशात तयार केलेली खोटी प्रतिमा पुसुन टाकण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. उभा अमेरीका अवाक झाला होता. भारतीयांच्या क्रुरपणाचा सगळ्यानी निषेध केला. अन अशा प्रकारे दलित विध्यार्थी भीमराव आंबेडकरानी प्रस्थापितांच्या विरोधात ईथेच रणशिंग फुंकले. पुढे जुन-१९१६ मधे “भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा-एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन” (National Dividend of India-A Historical & Analytical Study) हा प्रबंध कोलंबिया विद्यापिठात सादर केला. विद्यापिठाने हा प्रबंध अक्षरश: डोक्यावर घेतलं. आंबेडकरांवर सगळीकडुन स्तुतीसुमनांची उधळन होऊ लागली. हे यश ईतकं अफाट होतं की विद्यापिठातील विद्यार्थ्यानी भीमरावाना मेजवानी दिली. अशा प्रकारे अमेरीकेत आपल्या विद्वत्तेचा डंका वाजवुन बाबासाहेबानी भीमगर्जना केली होती.

0 comments:

Post a Comment