About

Searching...
Saturday 23 June 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)

June 23, 2012
गर्वच नाहीतर माज आहे मला मी जय भीम वाला असल्याचा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)
१९२० मे च्या शेवटच्या आठवड्यात नागपुर येथे “अखिल भारतिय बहिस्कृत परीषद” भरविण्यात आली. या परिषदेच्ये अध्यक्ष होते कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज. याच दरम्यान भारतात जिकडे तिकडे लहान मोठे अस्पृश्याचे नेते उदयास येते होते. देशात अस्पृश्यनिवारणाचे वारे वाहु लागले होते. लोकांना गुलामगिरीची जाणीव होऊ लागली अन आता ती झिटकारण्याची वेळ जवळ येत होती.
याच दरम्यान डी. सी. शिंदेनी सरकारला एक निवेदन सादर केले होते. त्यात त्यानी सरकारला विनवणी केली होती की, अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळानी नेमावे. राज्यपाल व अस्पृश्यांच्या संस्थानी ते निवडु नये. झालं यावरुन लोकांचा रोष ओढवुन घेतला. एवढे महान समाजसेवी पण एक गोष्ट जराशी चुकली अन लोकांच्या विरोधाला समोर जावे लागले.
विषयनियामक समितीच्या बैठकित बाबासाहेब अन शिंदेंच्या आघाडीतील दोन नेते १) गणेश अ. गवई २) बेळगावचे पापन्ना यांच्यात खडाजंगी झाली. गवईनी व्यूह रचला होता. बाबासाहेबाना या समितीचे अद्यक्ष बनवायचे म्हणजे ईथे घेतलेल्या निर्णयाचं खापर बाबासाहेबांच्या डोक्यावर फोडता येईल. पण आंबेडकरांची सेना फार हुशार त्यानी हा डाव ओळखला अन फार चलाखिने शिंदेंचा खंदा कार्यकर्ता पापन्ना यानाच या समितीचे अद्यक्ष केले. आता बाबासाहेब बोलायला मोकळे होते. अध्यक्षांच्या परवानगीने बाबासाहेबानी एक लांब लचक भाषण दिले. डी. सी. मिशनचे धोरण कसे घातक आहेत हे त्यानी सिद्ध केले. शिंदेंच्या या धोरणांचा यथेच्च समाचार घेऊन धोरणांचा निषेध केला. शिंद्यांच्या मताप्रमाणे सरकारनी निर्णय घेऊ नये असा ठराव मांडला. सगळ्या अस्पृश्य नेत्यांचा पाठिंबा मिळवुन तो प्रस्ताव तिथेच पास करवुन घेतला. हे सगळं शिंदेंच्या डोळ्यापुढे घडुन आलं. ते आवाक झालेत. त्यांच्या निर्णयाचा व धोरणांचा ईथे नुसता विरोध अन निषेधच झाला नाही तर त्यानी सरकारला सादर केलेले निवेदन चुकीचे आहे हे सिद्धही झाले, अन प्रस्तावहई पास झाला. हा एक चमत्कार होता. भावी विद्वानाच्या आगमनाची ही नांदी होती. या परिषदेत बाबासाहेबांच्या नेतृत्व कौशल्य, वादकुशलता अन बुद्धीमत्ता ईत्याची गुणांची पाऊले ठशठशीत उमटली. बाबासाहेबांचा हा पहिला विजय होता. तो असाच मिळाला नव्हता, बुद्धीच्या जोरावर त्यानी तो खेचुन आणला होता. मूकनायकानी आपल्या भावी महान कार्याची चुणूक दाखविली. आता मूक्या लोकांचा नायक म्हणुन एक विद्वान व्यक्ती रणांगणात उतरली होती. अस्पृश्यांतील १८ उपजातीतील नेत्याचे सहभोजन घडवुन आणले. अस्पृश्यांमधे आपापसात उच्च निच प्रकार होते, ते आधि मिटावे म्हणुन हा प्रयत्न होता.
प्राध्यापक म्हणुन नोकरी करताना बाबासाहेबाना भरपुर वेतन मिळत असे. काटकसरीने जीवन जगत, गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च न करता साठवुन ठेवण्याच्या वृत्तीमुळे आज जवळ ब-यापैकी पैसे साठले होते. नोव्हेबर १९१८ मधे नोकरी धरली होती अन मार्च १९२० मधे या नोकरीचा राजीनामा देऊन अर्धवट सोडलेले शिक्षण पुर्ण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. ते आजही इंप्रुव्हमेंट चाळितल रहात होते. आता लंडनला जाण्याच्या तय्यारीत लागले.
मित्र नवल भथेना, हा अगदी अमेरीकेपासुनचा जीवलग मित्र. नेहमी अडचणिच्या वेळी हाच उपयोगी पडत असे. लंडनला जाण्याची तयारी केली खरी पण पैशाची अजुन तजवीज करायची होती. नवल कडुन ५०००/- रुपये उधार घेतले. हा मित्र सुद्धा कुठलीही कुरकुर न करता नेहमी सढळ हातानी मदत करीत असे. त्यानंतर छ्त्रपती शाहु महाराजांकडुनही थोडे पैसे घेतले अन १९२० मधे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लंड्नला पोहचले.
याच दरम्यान बडोदे सरकारच्या अधिका-यानी शिक्षणासाठी झालेला खर्च परत मिळावा म्हणुन बाबासाहेबांच्या मागे तगादा लावला. बाबासाहेब महाविद्यालयात नोकरी करतात हे कळल्यावर त्यानी प्राचार्याना पत्र लिहुन तसे कळविण्याचा घृणास्पद प्रकार केला होता. एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणुन त्यानी मुंबई प्रांताचे शिक्षण अधिकारी याना सुद्धा एक पत्र लिहुन बाबासाहेबांची बदनामी केली. ना. म. जोशींच्या कानावर ही बातमी घातली अन बाबासाहेबांचा छ्ळ करण्याच्या नवनविन क्लृप्त्या लढविल्या जात होत्या. तो पर्यंत बाबासाहेब देश सोडुन विदेशात शिक्षणासाठी निघुन गेले होते. तिकडेही पत्र पाठवुन त्यांच्या छळ करण्याचे काम चलविले गेले. हा महार आता आमच्या नकावर टिच्चुन शिक्षण पुर्ण करतो आहे याचं त्यान फार खटकत होतं. आम्ही याची शिक्षणाची नाकेबंदी व्हावी म्हणुन अनेक प्रयत्न करुन सुध्दा हा परत शिकण्यासाठी विदेशात गेला याचं त्याना सलत होतं. काहिही करुन कोर्टात खेचायचं अन शिक्षणात अडथडा आणायचा हाच काय त्यांच्या प्लॅन होता. पण बाबासाहेब या दिवाणाला दाद देत नव्हते अन शेवटी हे प्रकरण महाराजांकडे गेलं. तेंव्हा महाराज म्हणतात
“ हि रक्कम शिक्षणावर खर्च झाली, ते कर्ज थोडीच होतं? वसुलीचा प्रश्नच नाही, ती शिष्यवृत्ती होती”
पण जातियवादी अधिका-यानी छळ चालुच ठेवला. शेवटी जेंव्हा महाराजाना कळतं की आपले अधिकारी उगीच आंबेडकराना त्रास देता आहेत तेंव्हा त्यानी संबंधित अधिका-याना चांगलच खडसावलं अन शेवटी १९३२ साली हे प्रकरण निकाली काढले.
तिकडे बाबासाहेबानी खडतरी परिश्रम घेणे सुरु केले. मिळेत ते खाऊन सकाळीच म्युझियममधे वाचायला जात. दुपारच्या जेवनसाठी पैसे खर्च करणे त्याना परवडणारे नव्हते. या वेळेस ते कर्ज काढुन शिकायला आले होते. पैसा योग्य ठिकाणी खर्च करणे फार गरजेचं होतं. म्हणुन सकाळी येताना एक सॅंडविच सोबत घेऊन येत अन दुपारी भुक लागल्यावर हळुच तो सॅंडविच काढुन तिथेच खात. पण त्या म्युझियमच्या एका सेवकाच्या लक्षात येताच त्यानी नियमाकडे बोट दाखविले अन या नंतर बाबासाहेबानी कायमचं दुपारचं खानं बंद केलं. पुढच्या तिन साडेतिन वर्षात दुपारचं जेवण त्याना माहितच नाही. सकाळी सगळ्यात पहिले प्रवेश करणारे तेच अन दिवसभर उपाशी पोटानी अभ्यास करुन शेवटी बाहेर पडणारेही तेच. पोटाची भुक मारुन सायंकाळ पर्यंत अभ्यास करुन बाबासाहेब काय मिळवायचे तर पैशाची बचत, वेळेची कमाई अन टिपणांच्या कागदानी फुगलेले खिसे अशा अवस्थेत शिणलेल्या शरिराने पण टवटवित डोळ्यानी भावी युगप्रवर्तक म्युझियम मधुन बाहेर पडत असे.
घरी जाऊन परत अभ्यासाला बसत असे. रात्रीचे थोडेफार खाऊन परत पहाटे पर्यंत अभ्यास चालत असे. त्यांचा रुममेट श्री. अस्नाडेकर अधे मधे केंव्हा रात्री उठलाच तर बाबासाहेबाना म्हणायचा, “अरे झोप, किती वाचतो, तब्बेतीवर परिणाम होईल” यावर बाबासाहेब म्हणत, “अस्नाडेकर, मी खुप गरीब आहे, माझ्याकडे अन्नाला पैसे अन झोपायला वेळ दोन्ही नाहीत” यावर रुममेट निरुत्तर होत.
अशा प्रकारे अविश्रांत श्रम, खडतर परिश्रम करणारा हा महापुरुष आता स्वत:ला पुर्णपणे झोकुन दिले. दिवस रात्र अभ्यास. मिळेत त्या वेळेत अभ्यास. डोळ्यासमोर सतत एकच ध्येय होते. लवकरात लवकर हा ईथला अभ्यासक्रम पुर्ण करायचा अन वेळ मिळाल्यास अन पैसा हाती उरल्यास आजुन काही शिकता येते का ते पहावे.
मधे चलनवाढीमुळे जवळ असलेला पैसा अपुरा पडला. पैशाचं गणित बिघडलं. तेंव्हा बाबासाहेबांकडे पर्यान नव्हता म्हणुन परत आपल्या नेहमीच्या मदतगार मित्राकडे म्हणजेच नवल भथेनाकडे पैशाची मागनी करणारी चिठ्ठी लिहली. पण या वेळेस पैसे मागताना बाबासाहेबाना मनात फार वाईट वाटत होते. कारण ईथे येताना आधिच नवल कडुन रु. ५०००/- कर्ज घेतले होते. पण आता नाईलाज होता. ते चिठ्ठित लिहतात.
“नवल माझ्यामुळे तुला त्रास होतो. तु मनाने फार चांगला आहेस अन माझा एकमेव मित्र आहेस. म्हणुन मी तुझ्याकडे सारखं पैशाची मागणी करत असतो. माझा नाईलाज आहे. पण हे नेहमी नेहमी चालल्यानी तु माझी मैत्री तोडशील की काय अशी अधे मधे भितीही वाटते. कारण मित्राला सहन करुण्याच्याही सिमा असतात. मी त्या सिमा केंव्हाच पार करुन तुला त्रास देऊ लागलो तरी तु ही मैत्री टिकवुन नाईलाजास्तव मला मदतीचा हात देतोस. पण काय करु, मला पैशाची खुप गरज आहे मला एकमेच तुझाच आधार आहे.”
बाबासाहेबाना आता मित्राकडे पैसे मागतानाही फार लाज वाटत असे पण त्यांचा वेळोवेळी नाईलाज झाला. पुढे त्यानी शाहु महाराजानाही पत्र लिहुन आर्थिक मदत मागविली. अशा प्रकारे ते कसं बसं आर्थिक डोलारा सांभाळत लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करण्यात गुंतले होते. यावेळे मात्र घरी रमाईला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणिना तोंड दयावे लागत होते. मागच्या वेळेस सासरे होते अन शिष्यवृत्तीचे पैसे मिळत होते. पण हि वेळ वेगळी होती. याच दरम्याना बाबासाहेबांची प्रकृती बिघडते. ते शिवतरकराना लिहलेल्या पत्रात म्हणतात की माझ्या बायकोला ह्यातलं काही सांगु नका. मी लवरच बरा होईन अन परत अभ्यासाला लागेन.
याच काळात बाबासाहेब एक इंग्रज बाईकडे बायबलचा अभ्यास करायला जात. त्या बाईशी बाबासाहेबांच चांगलं पटत असे. अन लंडनच्या उपनगरात आजुन एक विसाव्याची जागा सापडली होती. संस्कृत शास्त्र्यांच्या घरी आठवडा पंधरा दिवसानी बाबासाहेबाना भोजणाचे निमंत्रण असे. त्या माणसाची बायको बाबासाहेबाना भाऊ मानत असे. या दांपत्यानी बाबासाहेबांवर खुप प्रेम केले. पण ईथे त्याना बाबासाहेबानी आपली जात सांगितली नाही अन जेंव्हा त्यांची जात जगजाहीर झाली त्या नंतर या दांपत्याची केंव्हा भेट झाली नाही. बाबासाहेब नेहमी म्हणत की आज माझी जात कळल्यावर त्या कुटुंबात माझ्याविषयी काय भावना आहेत हे माहित करुन घेण्याची खुप ईच्छा आहे पण मार्ग नव्हता.
बाबासाहेब मुंबई पासुन हजारो मैल दुर लंडनला शिकत होते तरी त्यांचं भारतातील राजकारणावर बारिक लक्ष होतं. १९२० मधे जुलैच्या शेवटच्य आठवड्यात ते लंडनला पोहचले अन १ ऑगस्ट १९२० मधे ईकडे टिळक वारले. टिळकयुग संपले. आता गांधी नावाचा नविन तारा भारतीय राजकारणात उगवला. बाबासाहेब या गांधी युगाला तमोयुग म्हणत.
या दरम्यान भारतमंत्री मॉंटिग्युची लंडनमधे भेट घेऊन बाबासाहेबानी याचे मतपरिवर्तन करण्याचे काम केले. हा मॉंटिग्यु आधि ब्राह्मणेत्तर चळवळीच्या विरोधात होता. तो ब्राह्मणांच्या सांगण्यावरु ब्राह्मणेत्तर चळवळीला हिन लेखायचा किंवा ख-या महितीच्या अभावी त्याला ही चळवळ नेमकी काय आहे ते केंव्हा कळलेच नाही. पण या वेळेस बाबासाहेबानी लंडन मधेच याला गाठलं अन सगळी हकिकत सांगितली. तेंव्हाकुठे या भारतमंत्र्याला ब्राह्मणेत्तर चळवळ म्हणजे नेमक काय आहे ते कळल. आता मॉंटिगो आपल्या चळवळीला अनुकुल झाला याची खात्री झाल्यावर ३ फेब्रुवारी १९२१ रोजी बाबासाहेबानी हि बातमी छत्रपती शाहु महाराजाना कळविण्यासाठी एक पत्र लिहले. आपण मॉंटिगुचे ह्रुदयपरिवर्तन केले असुन ते या पुढे आपल्या चळवळीला विरोध करणार नाही,किंबहुन वेळ प्रसंगी आपल्याला आधार देतील असे कळविले.

0 comments:

Post a Comment