आता भीमराव आंबेडकर हे विद्यापिठात सर्वांच्या परिचयाचं झालं होतं. याच दरम्यान लाला लचपतराय यांच्याशी विद्यार्थी भीमरावाची ओळख झाली. लालाने भीमरावा राजकीय लढयात ओढण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाबासाहेबानी वेगळ्या ध्येयानी प्रेरीत असल्याचं स्पष्ट केलं. तुमच्यावर फक्त एकच गुलामगिरी आहे ती म्हणजे इंग्रजांची, पण आमच्यावर दोन गुलामगि-या आहेत. एक इंग्रजांची दुसरी तुमची. आता प्रश्न हा आहे की आम्ही लढा उभारायचा तर नेमकं कुढल्या गुलामगिरीच्या विरोधात आधी उभारायचा? या प्रश्नावर लाला लचपत राय निरुत्तर झाले. भारतातील परिस्थीती त्याना चांगल्या प्रकारे माहित होती.
अमेरीकेतील दोन घटनांचा बाबासाहेबांवर अत्यंत प्रभाव पडला
१) अमेरीकेतील राज्यघटनेतील गुलामगिरी नष्ट करणारी १४ घटना दुरुस्ती.
२) नीग्रोंचा उद्धारकर्ता बुकरी टी. वॉशिंग्टन यांचा मृत्यु.
येथील अभ्यासक्रपुर्ण झाल्यावर अन एम. ए. ची पदवी प्राप्त करुन जुलै १९१६ मधे अमेरीका सोडली. पुढे लंडनला जाऊन अर्थशास्त्र व कायदा विषयाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. करार वाढवुन पाहिजे होता. महाराजांकडे तशी परवानगी मागितली. महाराजानी परवानगी दिल्यावर बाबासाहेब पुढील अभ्यासासाठी थेट लंडनला गेले. कायद्याच्या अभ्यासासाठी “ग्रेज ईन” मधे प्रवेश मिळविला. सोबतच London School of Economics & Political Science या संस्थेत अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळविला. बाबासाहेबांची अर्थशास्त्र या विषयावर एवढी पकड होती की तिथला प्राध्यापकवृंद या ज्ञानाच्या तेजाने थक्क झाला. असा विध्यार्थी लाभल्यामुळे ते स्वत:ला धन्य मानु लागले. बाबासाहेबांच्या ज्ञानाची खोली जाणुन प्रध्यापक वृदांनी त्याना एक परिक्षेत न बसण्याची सवलत दिली. त्याना थेट दुस-या परिक्षेसाठी पात्र ठरविले. हा गो-यांच्या भुमीत एका अस्पृश्याच्या विद्वत्तेचा हा सन्मान होता. जे गोरे भटा बामणानाही bloody black म्हणुन हिनवित असत त्याच बामणांनी सदैव मानहानी केलेल्या समाजाती एका पिढीत व शोषित विद्वानाचा हा जाहिर सन्मान होता. एकंदरीत सगळं मनासारखं झालं. आता अभ्यासाला सुरुवात झाली. बाबासाहेबांची बरीच काम पडलेली होते. ध्येयानी झपाटलेली माणसं मिळेल त्या परिस्थीतीत ध्येयाच्या दिशेनी सर्वस्व झोकुन देतात. बाबासाहेबानी जोमानी अभ्यासाला सुरुवात केली. मात्र एवढ्या सुरळीत सगळं चालने म्हणजेच संकंटाची नांदी होती. बाबासाहेबांचं आयुष्य नुसतं संकंटानी भरलेलं होतं. थोडं काही चांगलं झालं की संकट यायचाच, यावेळेसही संकट उभा ठाकला.
लंडनपासुन हजारो मैल दुर बडोदे सरकारमधे उच्च पदस्थ अधिका-यांमधे बराच बदल घडत होता. या सगळ्या धामधुमीत जुने दिवाण जाऊन मनुभाई मेहता नावाचा नविन दिवाण नियुक्त होतो. मनुभाईनी राज्याच्या कारभारात ईतर मोठे काम करण्यापेक्षा एका दलितावर घसरण्याचा निचपणा केला. त्यानी बाबासाहेबाना परत येण्याचे आदेश दिले. शिष्यवृत्तीचा कालावधी संपला असुन आता यापुढे १० वर्षे ठरलेल्या करारा प्रमाणे बडोदे सरकारकडे नोकरी करण्यास हाजर व्हावे असा आदेश येताच बाबासाहेब हादरुन जातात. खरतंर बाबासाहेबानी महाराजांची परवानगी घेऊन हा कालावधी वाढवुन घेतला होता. पण कागदोपत्री जो करार होता त्याच्या आधारे मनुभाईन हा मनुवाद केला होता. आता सगळं सोडुन भारतात परतण्याचं संकट कोसळलं होतं. उपाय नव्हता. बाबासाहेबानी पुढील ४ वर्षात हा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी परत येण्याच्या अटीवर विद्यापिठाकडुन परवानगी मिळविली अन शिक्षण अर्धवट सोडुन २१ ऑगष्ट १९१७ रोजी भारतात परतले.
बाबासाहेबांच्या अमेरीकेतील शैक्षणीक यशाचं कौतुक म्हणुन त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. रावबहाद्दुर चिमणलाल सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आखण्यात आला. बाबासाहेबांच्या या यशाचं सन्मान म्हणुन त्याना मानपत्र देण्याचं ठरलं. पण अमेरीकेतील वास्तव्यात बाबासाहेबानी एक से बढकर एक दिग्गज बघितले. महान विद्वानांची बैठक लाभल्यावर त्याना स्वत:चं अस कौतुक करुन घेणे आवडलं नसावं. त्यानी हे मानपत्र घेण्यास साफ नकार दिला. ते या कार्यक्रमालाच गेले नाहीत.
आता कराराप्रमाणे बडोदे सरकारमधे नोकरीस हजर राहणे क्रमप्राप्त होते. सप्टेबर १९१७ च्या दुस-या आठवड्यात बाबासाहेब बडोद्यास पोहचले. बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाडानी बाबासाहेबांच स्टेशनवर स्वागत करण्याचे आदेश दिले होते. पण महाराचं स्वागत करणार तरी कोण? जेंव्हा बाबासाहेब बडोद्यास पोहचतात तेंव्हा स्टेशनवर त्याना घेण्यासाठी कुणीच आलेलं नव्हतं. उलट त्यांच्या येण्याची खबर फैलली अन लोकानी या महारांला वाळीत टाकण्याचा पवित्रा घेतला. जातिने महार असल्यामुळे रहायला जागा मिळेना, कुठल्याही खानावळात त्याना जेवन मिळत नसे. ज्या मानसाचा आत्ता काही दिवसापुर्वी लंडन विद्यापिठाने अन अमेरीकेने एवढा मान सन्मान केला अशा विद्वानाचा ईथे सडक्या मनुवाद्यानी इतक्या हिन दर्जाला जाऊन अपमान चालविला. तरी बाबासाहेब न डगमगता खंबिरपणे उभे राहण्याचे अनेक प्रयत्न करत होतेच. कुठेच राहण्याची व खाण्याची सोय होत नाही हे लक्षात आल्यावर बाबासाहेबानी पारशी वसतीगृहात जागा मिळविली. पण आता पर्यंत पदरी आलेला अनुभव बघता ईथेही त्याना प्रवेश नाकारल्या जाणार याची जाण असल्यामुळे त्यानी ईथे चक्क खोटं बोलावं लागलं. त्यानी आपली जात न सांगताच ईथे प्रवेश मिळवील. उच्च विद्याविभुषित असल्यामुळे कोणी जात विचारलिही नसावी. पण काही दिवस जाताच पारशी लोकांच्या कानावर आले की त्यांच्या वसतीगृहात एक अस्पृश्य राहतो आहे. मग मात्र पारशी लोकांचं डोकं पेटलं. लोकांचा मोठा घोडका बाबासाहेबांवर चालुन गेला. बाबासाहेबांची यथेच्छ मानहानी करुन हाकलुन लावले. यावेळेस बाबासाहेबानी हात जोडुन अनेव विनवन्या केल्या व ८ तासाची महुलत मागुन घेतली. पण पुढच्या ८ तासात कुठेच सोय न झाल्यामुळे आपला सामान घेऊन बाहेर पडले. एका झाडाखाली रात्र काढली. दुस-या दिवशी मुन्शीना भेटुन काही सोय होईल का याची चौकशी केली पण कुठे काहीच होईना. महाराजाना भेटायचे होते पण महाराज म्हैसुरला जाण्याच्या तयारीत असल्यामुळे भेट घेता आली नाही. शेवटी कुठेच काहीच सोय झाली नाही अन नाईलाजाने व दु:खी अवस्थेत मुंबईस परतले.
हा सगळा प्रकार ऐकुन केळूस्कर गुरुजी फार दु:खी झाले. त्यानी महाराजाना पत्र लिहुन बरीच खटाटोप केली पण काहीच हाती आलं नाही. याच दरम्यान श्री. सयाजीराजे गायकवाड यांचे वडिल बंधु आनंदराव यांचे निधन झाले. महाराजांच्या जबाबदा-या वाढल्या अन त्या सगळ्या घाईगडबडीत महाराज व्यस्त झाले. डिसेंबर १९१७ च्या अखेरीस महाराज म्हैसुरहुन मुंबईला येतात अन फेब्रुवारी १९१८ पर्यंत ईथेच वास्तव्य होता. पण एकंदरीत परिस्थीती बघता बाबासाहेबाना महाराजांची भेट घेता आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. घरातील मोठ्या भावाच्या मृत्युमुळे महाराज दु:खी अन व्यस्त होते.
दिवाण मनुभाईनी मात्र पाय ओढण्याच्या व्यतिरीक्त काहीच केले नाही. केळूस्कर गुरुजीने बडोद्यातील एका प्राध्यपक मित्राशी बोलुन राहण्याची सोय करण्याची विनंती केली. सुरुवातील त्यानी होकार दिला. बाबासाहेब बडोद्याला निघुन गेले. पण तिथे गेल्यावर त्या प्राध्यापकाने बायकोचा विरोध असल्यामुळे ही मदत नाकारली. मग बाबासाहेबानी स्वत: सगळ्याना भेटुन कुठे राहण्याची व जेवणाची सोय होते का, यासाठी बरेच प्रयत्न केले. पण कुठेच यश न आल्यामुळे एक महान विद्वान आज जातियवादाचे चटके खाऊन खिन्न मनाने मुंबईची वाट धरली अन बडोदे सरकारला कायमचा जयभिम ठोकला. याच दरम्यान त्यांची सावत्र आई वारली. बाबासाहेबानी सगळा विधी पार पाडला.
याच दरम्यान अस्पृश्य निवारनाच्या दिशेनी मुंबईत एक अत्यंत महत्वाची घटना घडली. १९ मार्च १९१८ ला मुंबईत “अखिल भारतिय अस्पृश्य निवारण परिषद” भरविण्यात आली. या परिषदेचे सुत्रधार कर्मवीर शिंदे अन अध्यक्ष होते बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाड. महाराजानी आपल्या भाषणात काही मुख्य गोष्टी सांगितल्या त्या या प्रमाणे, “ जातीचा चिरकाल टिकाव अशक्य आहे, जाती मानव निर्मीत आहेत. हे असच चालल्यास पुढे ख्रिश्चन धर्म याचा फायद उठवेल. धर्मांतराचा फार मोठा धोका निर्माण होईल. व्यवहारीक सुधारणांची गरज आहे. अन्यथा एक दिवस आपल्या धर्मात मोठी फुट पडेल” अशा आशयाचं भाषण देऊन महाराजानी जातीपातीचा नायनाट करण्यास आवाहन केलं.
परिषदेच्या दुस-या दिवशी टिळक नावाचा एक भट पुण्याहुन परिषदेस आला. खरंतर या भटाची काहिच गरज नव्हती पण त्याचा खरा चेहरा लोकाना कळावा या साठी त्याला पाचारण करण्यात आले. याचं नाव बाळगंगाधर, हा एक अत्यंत जातियवादी माणुस. सदैव ब्राह्मणाच्या हिताचं व दलितांच्या अहिताचं चिंतन्यात आयुष्य गेलेलं. या इसमाने भाषणात म्हटलं, “ अस्पृश्य वर्गाचा प्रश्न सामाजीक व राजकीय दृष्ट्या निकाली काढला पाहिजे. ब्राह्मण क्षत्रीय आणि वैश्य याना जे जे अधिकार आहेत ते शुद्रानाही आहेत. मात्र शुद्रानी वैदिक मंत्र म्हणु नये. जातियवाद हे पुर्वीच्या ब्राह्मणानी चालु केलेली प्रथा आहे हे मी मान्य करतो.” असे एकंदरीत दुतोंडी व ब्राह्मणी हरामखोरी करणारा हा टिळक ईथे एवढे बोलुन थांबला नाही, त्यानी आजुन एक अत्यंत हिणकस कृत्य केलं.
परिषदेच्या शेवटी सर्व पुढा-याच्या सहिने एक जाहिरनामा काढण्यात आला. त्या जाहिरनाम्यात सही करणा-या पुढा-यानी वयक्तिक जीवनात अस्पृश्यता पाडनार नाही अशी प्रतिज्ञा करायची होती. टिळकानी या जाहिरनाम्यावर सही करण्यास स्पष्ट नकार दिला. कारण त्याला अस्पृश्यता हवी होती. त्याला ब्राह्मणांचं वर्चस्व हवं होतं. त्याला दलितांचा विकास नको होता. दलितानी माणुस म्हणुन जगावं हे या टिळक नावाच्या भटुरड्याला मान्य नव्हते. म्हणुन त्यानी जाहिरपणे ईथे अस्पृश्यनिवारणाच्य जाहिरनाम्यावर सही करण्यास नकार दिला. केवढा हा दृष्टपणा.
अन मुंबईत १९१८ च्या सुरुवातीला जेंव्हा हे सगळं घडत होतं तेंव्हा आंबेडकर नावाचा तारा आजुनतरी राजकीय नभात उगवायचा होता. तो आज क्षितीजाच्या उंबरठ्यावर उभा होता. तारा ते महासुर्य असा एकंदरीत प्रवास करणारा हा विद्वान बडोदयातील जातीयवादाच्या चटक्यानी ज्या जखमा दिलेल्या होत्या त्यातुन सावरण्याचा प्रयत्न करत होता.
0 comments:
Post a Comment