About

Searching...
Tuesday, 26 June 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)

June 26, 2012

सुर्याहून हि तेज प्रखर असा तो एकच नर त्याचे नाव भीमराव रामजी आंबेडकर...!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)

रामजींचं संस्कृत भाषेवर अत्यंत प्रेम. आपल्या मुलानी संस्कृत शिकावं अस त्याना सारखं वाटे. आनंदरावाना संस्कृत शिकता यावं म्हणुन शुभेदारानी बरीच खटपत केली पण सातारा माध्यमिक शाळेतील संस्कृतच्या शिक्षकानी अपमान करुन परत पाठविलं. संस्कृत हि वेदांची भाषा, संस्कृत मधे देवांच्या तोंडातुन निघालेलेल श्लोक आहेत. तुम्हा महाराना कशाला हवी हि पवित्र भाषा. हि भाषा ब्राह्मणाची आहे. देवाचे प्रुथ्विवरिल प्रतिनिधी भटांची आहे असं खणखणीत शब्दात शुभेदाराना सुनविण्यात आलं. महारानी संस्कृत शिकने हा अपराध होता. शेवटी आनंदरावाना संस्कृत ऐवजी पर्शियन भाषा निवडावी लागली. सुदैवाने त्या शिक्षकाचे शब्द खरे ठरले अन संस्कृत देवांचीच भाषा असल्याचं सिद्ध झालं व आज ती भाषा देवाघरी नांदतेय. मला याचा फार आनंद होतो. जिथे दलितांच वास्तव्य आहे त्या भु तलावरुन ही भाषा हद्दपार झाली. आज खरच संस्कृत ही देवाघरची भाषा आहे.
पुढे भिम ४ थ्या ईयत्तेत गेला तेंव्हा भिमावरही हाच प्रसंग ओढावला. भिमालाही संस्कृत भाषा शिकण्यास मज्जाव करण्यात आला. वर वर पाहता जातियवादाचा फटका भिमाला बसला असे जरी दिसते तरी सत्य अगदी त्याच्या उलट आहे. भावी विद्वानाला संस्कृत भाषेपासुन तोडल्यामुळे खरा फटका संस्कृत या भाषेलाच बसला. पुढे ती भाषा बारतातुन हद्दपार झाली. भटा ब्राह्मणांच्या घरी नांदण्याचे परिणाम संस्कृत या भाषेत भोगावे लागले. विद्वानांच्या अभावामुळे संस्कृतने जीव सोडले. ब्राह्मनांचा ज्याला ज्याला स्पर्श झाला ते सगळ नष्ट झालं असा ईतिहास आहे. ब्राह्मणानी संस्कृतला कवटाळले अन परिणाम असा झाला की आज संस्कृतला कुणी कुत्रही विचारत नाही. भिमाला संस्कृतपासुन तोडताना भिमावर अत्याचार करण्याचे मनसुबे असले तरी अत्याचार संस्कृत सारख्या त्या काळातल्या संपन्न भाषेवर झाला. पुढे मात्र कुठल्याच विद्वानाचे पाय या भाषेला लाभले नाही म्हणुन त्या भाषेचं वैभव हरवलं. संपन्नत नष्ट झाली. किंबहुन संपन्नता मिळवुन देणारं लिखान संस्कृतमधे झालच नाही अन संस्कृ पोरकी झाली. आज कुपोषित झालेली संस्कृत नावाची भाषा बघुन मला फार बरं वाटतं. विद्वानांचा धिक्कार करणारी पापी भाषा तु, तुझं या पेक्शा वेगळं होणार तरी काय होतं?
याच वर्षी सुभेदारांच्या नोकरीचा कार्यकाळ संपतो अन ते साता-यातुन मुंबईत राहायला येतात. परत विभागातील डबक चाळित बि-हाड थाटतात. भिम आता मराठा माध्यमिक शाळेत जाऊ लागला. तिथेही संस्कृत शिकण्यासाठी धडपड करुन बघितली पण यश आले नाही. अन लवरच एल्फिस्टन माध्यमिक शाळेत प्रवेश मिळतो अन भिम मॅट्रिक पर्यंतचं पुढचं शिक्षण ईथेच करतात. संस्कृत शिकण्याची जिद्द एवढी की, ते स्वत: स्वकष्टाने संस्कृत शिकले.

अवांतर वाचन
बाबासाहेबांचं अवांतर वाचन खुप होतं. सुभेदार या अवांतर वाचनापाई नारज असतं. भिमाला वेळीवेळी दटावत असतं. पण भिम वडलाना उत्तर देत असे. मी दर वर्षी पास होतो. शिक्षणात मागे पडत नाही. मग माझ्या अवांतर वाचणावर तुम्ही असे का उखडता. वड्लाना वाटे की पोरानी खुप अभ्यास करावा. पण पुढे समाजाची धुरा सांभाळावी लागणार होती. त्या परीने पायभरणीचा हा काळ होता. अवांतर वाचणावरुन वडलांशी खडगे उडत. पण भिम तो भिम, भिम केंव्हाच माघार घेत नसे. पास होण्याचा युक्तिवाद केल्यास सुभेदार निरुत्तरीत होतं. अन भिमाला पाहिजे असलेलं पुस्तक ते स्वत: शोधुन शोधुन आणुन देत. पण भिम म्हणझे अगदी त्या नावाला सार्थक ठरणारं व्यक्तीमत्व होतं. महाभारतातल्या भिमाला पोटाची भुक तर आमच्या भिमाला ज्ञानाची भुक. कुठली नविन पुस्तक आणलं तरी दोन दिवसात भिमानी ते पालथ घातलच समजा. मग परत त्याना नविन पुस्तकाची भुक लागे. या पुस्तकाच्या भुके पायी सुभेदाराची तारांबळ उडत असे. पेन्शनचे पैसे पुरत नसतं. अन वरुन भिमाचा हट्ट काही थांवेना. अशावेळी ते कांतेकरांकडे दिलेल्या आपल्या मुलीकडे जात. तिच्याकडुन पैसे उसने घेऊन भिमाला पुस्तक आणुन देत. वेळ प्रसंगी मुलीकडे पैसे नसल्यास आपण लग्नात तिला दिलेला एखादा दागिना उसने घेत. ठरलेल्या सोनाराकडे तो गहान ठेवुन पुस्तकाची सोय करित. पेन्शन मिळाल्यावर लगेच तो दागिना सोडवुन मुलीला परत करत. अशा प्रकारे वडिलांची पार पुरेवाट लावणारा भिम मोठेपणी या आठवणी सांगुन वडिलांच्या प्रेमळ स्वभावाची त्या वयात दखल न घेतल्याची खंत व्यक्त करत. ढसा ढसा रडतं. माझे वडील फार प्रेमळ होते, मीच हट्टी होतो, माझा त्याना खुप त्रास झाला पण तो प्रेमाचा झरा नित्या माझ्यासाठीच वाहत राहिला. ह्या आठवणी सांगताना बाबासाहेब सदगदीत होऊन जात. वड्लांच्या आठवणीनी हा महामानाव स्फुंदुन स्फुंदुन रडत असे.
बाबासाहेब मन लावुन अभ्यास करु लागले, वर्गात हुशार, सगळा गृहपाठ वेळेवर तयार असे, म्हणुन शिक्षकांचं भिमावर विशेष लक्ष. एकदा एका शिक्षकाने भिमाला फळ्यावर अंकगणित सोडवुन दाखवायची आज्ञा केली. भिम उठला अन फळ्याच्या दिशेनी चालु लागला. भिमाला मनातुन प्रचंड आनंद झाला. आजवर नेहमी वर्गात मानहानी होत आलेली. नेहमी खाली मान घालुन राहाव लागलं होतं. क्षमता असुन सुद्धा सतत डावलल्या गेल्याचा खेद होता. या सगळ्य़ा अनुभवांपेक्षा आजचा अनुभव निराळा होता. सुखावणारा होता. बुद्धिची चुणुक दाखविण्यासाठी मिळालेली पहिली वहिली संधी होती. पण दोन सेकंदात हा आनंद हवेत विरला. वर्गातील सगळी मुलं फळ्य़ाच्या दिशेनी धावली. क्षणभर भिमाला कळलच नाही काय चाललं ते. फळ्याच्या मागे ठेवलेले फराळाचे डबे उचलुन पटापट बाहेर भिरकावल्या गेले. घडलेला प्रकार काय होता ते भिमाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. भिम एक महार होता. महार आता फळ्याला हात लावणार म्हणजेच फळ्याच्या मागे ठेवलेलं मुलांचं अन्य महाराच्या स्पर्शानी विटाळणार. म्हणुन मुलानी अस्पृश्य महारापासुन आपलं अन्न वाचविण्यासाठी केलीली हि धडपड होती. भिमाच्या डोळ्यात पाणि आले. खरंतर त्यात इतर मुलांचा दोष नव्हतात. दोष होता धर्माचा, धर्मपंडीतांचा अन त्या धर्माच्या पायाली लोळणा-या मुर्ख समाजाचा. मनातिल उद्रेक आवरण्याच्या पलिकडचा होता. दु:खाची सिमारेषा कुठल्याही पट्टीने मोजता येणार नाही इतक्या विस्तारत होत्या. मन छिन्न विछिन्न झाले होते. असे अनेक अनुभव रोज गाठीशी बांधत भिम खचण्या ऐवजी अधिक दृढ निश्चयी बनत होता. हा विटाळ बाहेरील जगातिल प्रतिध्वनी होता. याच शाळेत एक तेजोभंग करणारा शिक्षक होता. तुम्ही महारानी कशाला शिकायला पाहिजे. गावात जाऊन महारकी करुन जगावं. असे हिणकस शेरे मारणा-या या शिक्षकाला भिमानी एकदा प्रतिउत्तर दिला. तुमचे काम तुम्ही बघा, नको त्या विषयावर तुम्ही बोलण्याची गरज नाही. तेंव्हा पासुन हा शिक्षल भिमाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसे. पण भिम तो भिम. सामर्थ्याच्या जोरावर त्यानी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
आता आनंदराव नोकरी करु लागला. घरात कमवत्या माणसाची भर पड्ली त्यामुळे सुभेदाराने भिमाला घडविण्यात लक्ष केंद्रित केले. अशा प्रकारे १९०७ मधे बाबासाहेब मॅट्रिकची परिक्षा उत्तिर्ण झालेत. त्याना ७५० पैकी २८० गुण मिळाले. महार मुलानी मॅट्रिक होण्याची हि अघटित घटना. सुभेदाराचे हात आकाशाला स्पर्श करु लागले. केलेल्या कष्टाची चिज झाली होती. बाप नावाच माणुस अशावेळी कृतार्थ होत असतो. त्याच्या आनंदाला कुठल्याही मोजपट्टीने मोजता येत नाही. अंगावर मुठभर मास चढलेले सुभेदार मान ताठ करुन समाजात भिमाचा बाप असल्याचं सांगत मिरवु लागले. सगळ्य़ा हाहा म्हणता सगळ्या महार समाजात हि बातमी गेली. एक महाराचा पोरगा मॅट्रिक झाल्यामुळे सगळीकडे जल्लोष होत होता. अन भिमाच्या या यशामुळे आनंदाने न्हाऊन निघालेला सपकाळ कुटुंबाचा व भिमाचा सत्कार संभारंभ आयोजीत करण्यात आला. सिताराम केशव बोली नावाचा समाज सुधारक या सत्कार समारंभाचे अध्यक्शस्थानी होते. त्याच सभेत मुंबईतील आजुन एक महान विचारवंत, प्रसिद्ध शिक्षक, नावाजलेले ग्रंथकार गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे ही उपस्थीत होते.
चर्नीरोड येथील बागेत गुरुवर्य केळुस्कर वाचनासाठी नित्य जात असत. एकदा त्यानी एक तरतरीत मुलगा बागेत बसुन वाचताना बघितला. समवयीन मुलं मागे उडया मारत होते पण हा मुलगा मात्र एकाग्रचित्तेन वाचतो आहे याचं त्याना कौतुक वाटलं. गुरुवर्यानी जवळ जाऊन त्या मुलाची चौकशी केली. अन मुलानी नाव सांगितलं भिमराव आंबेडकर. थेट काळजाला भिडणार नाव होतं. भावी विद्वानाशी आजच्या विद्वानाची हि भेट होती. आपल्या लेखणीने कित्येक वर्षापुर्वी गाडल्या गेलेल्या व समाजाला अनभिज्ञ असलेल्या गोष्टींना परत जगापुढे आणना-या आजच्या विद्वानाशी भावी आयुष्यातील युगप्रवर्तकाची ही भेट होती. ज्या रुढी प्रथांची झड आजच्या विद्वानाला बसली होती पण ती मोडुन काढता आली नाही त्या प्रथाना पार मुळासकट उपटुन टाकणा-या महान क्रांतीकारी नेत्याची बालरुपात आज गुरुवर्यांना भेट लाभली होती. दोघेहे ज्ञानाचे भांडार, दोघेही विद्वान, फक्त फरक एवढाच होता, एक आजचा होता तर दुसरा उदयाच होता.
आजच्य सत्कार सोहळ्यात गुरुवर्य आवर्जुन उपस्थीत होते. त्यानी याच सभेत स्व:ता लिहलेले गौतम बुद्धाचे चरित्र भिमाला भेट दिले. याला योगा योग म्हणा किंवा आजुन काही पण पुढे जाऊन बाबासाहेब बुद्ध धर्म स्विकारतात त्याची ही नांदी होती. ईथुनच बुध्द धर्माच्या दिशेन पहिलं पाऊल पडलं. गुरुवर्यानी १९५६ च्या घटनेची ईथे जणू मुक घोषणाच केली. कार्यक्रम संपला, सगळे गेले पण गुरुवर्याना मात्र थांबले होते. भिमाच्या पुढच्या शिक्षणाचं काय? तुम्ही शिकविणार की नाही? मग तुम्हाला ते जमणार की नाही? ही सगळी चौकशी करु लागले. काही झालेतरी भिमाचे शिक्शण थांबु नये हि कळकळ होती. यावर सपकाळांच वाक्य होतं.
“परिस्थीती बेताची आहे, पण पोराला उच्चशिक्षण देणार.”




0 comments:

Post a Comment