About

Searching...
Wednesday 27 June 2012

jay bhim..डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)

June 27, 2012






jay bhim...डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)
भीम मॅट्रिक झाल्याचा सोहळा संपला, आता सुभेदाराला पोराच्या लग्नाचे वेध लागले. आपल्या गुणी पोरासाठी एक सुंदर, गुणी व पतीची सेवा करणा-या वधुचा शोध सुरु झाला. भिमाची किर्ती समाजातील लोकांपर्यंत आधिच पोहचलेली होती. ब-याच लोकांकडुन मुलगी देण्याचे प्रस्ताव येऊ लागले. सुभेदार मात्र भिमासाठी सर्वोत्तव वधुच्या शोधात होते. नुसती सुंदर नाही, नुसती चांगल्या घरण्यातील नाही तर भिमासारख्या विद्वानांच भार सांभाळण्याचं सामर्थ्य असणारी गुणी वधु हवी होती. महापुरुषाची पत्नी होण महा कठिण काम. ईतर बायकांचं अन महापुरुषांच्या बायकोच आयुष्य यात जमिन आस्मानचा फरक असतो. एकंदरीत महापुरुषांच्या बायकांच्या वाट्याला दु:खच जास्त आलेली दिसतात. महापुरुषाना विटी दांडी सारखे हलके फुलके खेळ नाही आवडत, किमान बाबासाहेबाना तरी नाही. यांचे खेळच निराळे. हिमालयाला बुक्क्या मारण्याचा खेळ, आभाळाच्या पोटात दगळ भिरकावण्याचे खेळ तर केंव्हा अख्ख समुद्र चुळभरुन थुंकुन देणारे असे महाबली बाबासाहेब. त्यानी लहान सहान चॅलेंज घेतलेच नाही. अशक्यप्राय वाटणा-या गोष्टीना चॅंलेंज करुन उभं ठाकण्याची त्यांची सवय. मनुनावाचा हिमालय हजारो वर्षे ठाण मांडुन उभा होता. त्या हिमालयाला दोन बुक्क्यात हवेत विरुन टाकणारे भिमच होते. जातियवादाचा समुद्र जो पॅसिफिकपेक्शा खोल होतं त्याला चुळ भरुन थुंकावं तसं थुंकुन दिल बाबासाहेबानी. मग हे असले मोठमोठाले न झेपणारे किंवा सामान्य माणसानी केंव्हा विचारही न केलेल्या गोष्टिना पायी तुडविणा-या बाबासाहेबाना सांभाळणारी माई किती शोधताना पार सुभेदाराची दमछाक होत असे. याच दरम्यान सुभेदारानी एक दोन ठिकाणी भिमाचं लग्न पक्क केलं पण नंतर काही कारणास्तव त्यानी ते लग्न मोडले. आता मात्र महार समाज त्यांच्यावर नाराज होता. लग्न मोडल्याच्या कारणावरुन समाजानी सुभेदाराना ५ रुपये दंड ठोकला. सुभेदाराना अपराध मान्य होता त्यानी तो दंड भरला पण मनासारखी सुन घरी आणुनच दाखविन असं जाहिर केलं.

वधुचा शोध जोरात चालु होता. तेंव्हा ओळखितल्या एक गृहस्थाकडुन रमाईचं स्थळ सांगुन आलं. दापोली तालुक्यातिल वणंदगाव जि. रत्नागीरी. येथील भिकु धुत्रे यांची कन्या. भिकु धुत्रेला शंकर नावाचा मुलगा होता. तो मुद्रणालयात काम करीत असे. भिकु धुत्रेची परिस्थीत बेताची. रोजच्या हमालीच्या कामावर घर चालत असे. रमाई लहान असतानाच धुत्रे दांपत्याचे निधन झाले. पुढे मामानी रामाबाईचा सांभाळ केला. असं हे स्थळ सांगुन आल्यावर सुभेदारानी स्वत: निरखुन पारखुन रमाईलाच सुन म्हणुन घरी आणण्याच ठरवलं. अत्यंत सोज्वळ, दिसायला सुंदर, लांब केसं, बोलके डोळे अन भिमाला शोभुन दिसेल अशा चारत्र्यवान स्त्रिचा शोध रमाईच्या घरी येऊन संपतो. रमाई या सगळ्या गुणानी काठोकाठ भरलेली प्रेमाची व त्यागाची मुर्ती होती. विवाहाचा दिवस जवळ येऊ लागला तसं दोन्हीकडे जोरात तय्यारी सुरु झाली. जोरात म्हणजे अगदीच गरीबितल्या जोरात. भव्य लग्न मंडप नव्हतं. पंचपक्वान्नाच जेवण नव्हतं. झगमग रोशनाई नव्हती. गाड्यांचा ताफा नव्हता. किंवा वरातितील लोकं भरझरीचे कपडे घालुन हिंडत नव्हते. यातलं काहीच नव्हतं तरी मला व्यक्तीश: हे लग्न जागातील कुठल्याही लग्नापेक्षा एक भव्य लग्नच वाटतं. कारण जरी हे सगळं नव्हतं पण तिथे नवरदेव म्हणुन जो माणुस उभा होता ना, तो जगातला न भुतो न भविष्य असा दिव्य पुरुष होता. अन त्याच्या शेजारी जी नववधु होती ती या तेजोमय पुरुषाला पाठिमागुन बळदेणारी महामाया होती. मग अशा दोन महान विभुतींच्या ऋणानुबंधाची गाठ घालाणारा तो सोहळा मला जगातील कुठल्याही सोहळ्यापेक्षा हजारोपटीने मोठा वाटतो. भायखळ्याच्या बाजारात हे लग्न पार पडले. अशा प्रकारे कोटी कोटी उपेक्षीतांसाठी एकटाच झगडणा-या भिमाच्या आयुष्यात आज सोबत करणारी एक जिवन संगिनी प्रवेश करते. भिमाच्या हातात हाथ देताना ती नुसतं हात देत नाही. ती देते प्रेमाची शाश्वती, मायेच्या उबेची शाश्वती, सदैव पाठीशी उभं राहण्याची शाश्वती, समाजानी अपमानीत केल्यावर जेंव्हा जेंव्हा मन विदिर्ण होईल, रुक्ष होईल तेंव्हा त्या मनाला प्रेमाच्या स्पर्शाने प्रफुल्लीत करण्याची शाश्वती. जेंव्हा केंव्हा लढता लढता आपल्याच लोकांच्या वागण्यामुळे खिन्न होऊन जाण्याची वेळ येईल, खचुन जाण्याची वेळ येईल तेंव्हा याच कुशीत उल्हासाचे झरे दिसतील. ती शाश्वती देते की तुम्ही आता लढा, पुर्ण ताकतीनीशी लढा, त्यासाठीच तर मी आले आहे. मला कुठे करायचा आहे सुखाचा संसार. तुमच्या घरचा डोलारा आता माझ्यावर सोपवा अन खुशाल नविन आघाड्या उघडा. असेच काही असावे ते मुक शब्द माईचा मनात.

शिवराम जानबा कांबळे

शिवराम जानबा कांबळे हे दलित समाजातील कार्यकर्ते. “सोमवंशीय मित्र” नावाचे मासिक पुण्याहुन प्रकाशीत केल्या जात असे. शिवराम कांबळे या मासिकाचे संपादक होते. भारतातील पहिली “अस्पृश्य परिषद” बोलाविण्याचा मान हा यांच्या नावेच आहे. त्या वेळी पुणे परिसरातील कित्येक महार बांधव जानबा कांबळेंच्या चळवळीचा हिस्सा होते. पुण्यितील पर्वती मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी जानबानी चळवळ उभी केली होती. काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह जरी प्रसिध्द असला तरी मंदिर प्रवेश सत्याग्रहाची मुहुर्तमेढ रोवणारेही जानबा कांबळेच आहेत. अस्पृश्याच्या विकासासाठी व उत्कर्षासाठी त्यानी भारत सरकारला निवेदन दिले होते. आंबेडकर मालिका संपल्यावर मी यांच्यावर एक स्वतंत्र लेखमालीका लिहणार आहे. तेंव्हा नक्की वाचा.

कर्मवीर विठठल राम

हे त्यावेळचे दुसरे अस्पृश्य नेते. विदेशात जाऊन समाजशास्त्र व धर्म शास्त्राचा तौलनिक अभ्यास केलेले प्रगाढ पंडीत. विदेशातुन परतल्यावर भारतभर दौरे केले. दलित समाजाच्या विकासासाठी पुढे सरसावले. सर नारायण चंदावरकर यांच्या सहाय्याने “डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ ईंडीया” संस्थेची स्थापणा केली. अस्पृश्य चळवळीचा हा पहिला संघटीत प्रयत्न होता. पण ईथे एक अडचण होती, कर्मवीर हे उदरमतवादी होते. त्याना दलितांचे हित साधायचे होते पण संघर्ष नको होता. संवर्णाशी झगडुन, भांडुन काही मिळविण्यात त्याना ईंटरेस्ट नव्हता. हक्कासाठी लढताना संघर्ष करावा लागतो त्याना नेमका हाच नको होता. संघर्ष टाळला, उर्जेला बगल दिली की चळवळ फसते अन ईथे हेच झालं. कर्मवीरांच्या उदारमतवादामुळे हळू हळू हि चळवळ हवतेच विरली.

अन आता भिम मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांच्या विद्यार्थी दशेतील हा एकंदरीत चळवळीचा असा चेहरा मोहरा होता. थोडक्यात शिवराम जानबा कांबळे सोडल्यास ईतर सगळा आनंदी आनंद होता. जिकडे तिकडे ब्राह्मण अन इतर संवर्ण दलितांचा वाट्टेल तो उद्धार करत होते. खेडयापाडयात, गावागावातुन दलितांचा छळ होत असे. दलितांच्या दु:खाना वाचा फोडणारा आजुनु तरी विद्यार्थी दशेत तिकडे मुंबईला शिक्षण घेत होता. मनुवाद्यांचे शंभर अपराध भरत आलेले होते. लवरच मनुचा गळा कापला जाणार होता पण तोवर मात्र जे हाल काढावे लागणार होते ते असह्य होते. जीवघेण्या वेदनांनी दलित किंचाळत होते. अन आमचा सेनापती युद्धासाठी लागणारी विद्यारुपी रसद, कायद्याची आयुधं अन हमल्याची रुपरेषा ठरवित होता.

महाविद्यालयीन शिक्शण सुरु झाले, आजारामुळे एक वर्ष वाया गेले. आर्टस ईंटर परिक्षा उत्तिर्ण होण्यास एक वर्षाचा विलंब झाला. आता मात्र सुभेदाराना भिमाच्या शिक्षणाचा भार सोसेना. पण गुरुवर्य केळुस्कर मात्र भिमाच्या शिक्षणावर नजर ठेवुन होते. सर नारायण चंदवरकरांच्या मध्यस्तिने बडोद्याचे महाराज गायकवाड यांची मुंबई निवासस्थानी भेट घेतली. राजाना नमस्कार केला. आज गुरुवर्यासारखा एक विद्वान माणुस राजासमोर उभा होता तो भिमासाठी. युगप्रवर्तकाच्या ज्ञानार्जनात आर्थिक अडचण उभी ठाकली होती. त्या अडचणीचा बंदोबस्त करण्यासाठी महारांकडे मदतीचा हात मागण्यासाठी आज गुरुवर्य ईथे आले होते. “अस्पृश्याना उत्तेजनार्थ सहाय्य देऊ” अशी घोषणा बडोदे नरेशानी मुंबई नगरभवनातील एका सभेत केली होते. आज गुरुवर्यानी महाराजाना त्या घोषणेची आठवण करुन दिली. अन हळूच भिमाला नरेशांसमोर उभं केलं. बडोद्याचे महाराज फार दयाळू व दलितांच्या उत्कर्षासाठी शेवट पर्यंत झटलेले एक महान व्यक्तिमत्व होते. महाराजानी भिमाला काही प्रश्न विचारले. भिमानी प्रश्नाची उत्तर देऊन महाराजाना प्रसन्न केलं. महाराजानी ताबडतोब मासिक रुपये २५/- ईतकी शिष्यवृत्ती भिमराव आंबेडकरांना जाहिर केली. आज गुरुवर्यानी भिमासाठी ज्ञानांच्या महामार्गाची सोय केली. बुद्धी वैभवात भर टाकण्याची सोय करुन दिली.

प्रा. कॉव्हर्नटन, प्रा. मुल्लर, प्रा. ऍंडर्सन अशा विद्वान अन विख्यात प्राध्यापकांच्या हाताखाली भिमाचे महाविद्यालयीन शिक्षण चालु झाले. प्रा. मुल्लर यांचेतर भिमावर अत्यंत प्रेम. ते भिमाला आपले सदरे, पुस्तके देत. अभ्यासात ख्कुप प्रगती होती. अवांतर वाचनही वाढले. पण आजपर्यंतचे अवांतर वाचन अन महाविद्यालय जिवनातिल अवांतर वाचन यात प्रचंड तफावत होते. आत्तापर्यंतचे अवांतर वाचन ज्ञानाची मुख भागविण्यासाठी होते. पण आत्ताचे अवांतर वाचन मात्र एक विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत होऊन पुढे सरकत होते. दलितांच्या मुकं किंकाळ्याना वाचा फोडण्याच्या दिशेने पायभरनी चालु झाली.

दरम्यान पोयबावाडी येथील इंप्रुव्हमेंट चाळ क्रं १ मधे सुभेदारानी बि-हाड हलविलं. या चाळी सरकारने बांधायचे ठरविले तेंव्हा सुभेदारानी राज्यपालाची भेट घेऊन ईथे अस्प्रुश्यांसाठी खोल्या द्याव्यात असा अर्ज केला. ते मान्य झालं अन सुभेदाराना चाळ क्रं १ मधे खोली क्रं. ५० व ५१ अशा समोरासमोरील खोल्या मिळाल्या. खोली क्रं ५० मधे भिमराव अभ्यासासाठी बसत अन सुभेदार बाहेर पहारा देत बसत. भिमाच्या अभ्यासात अडथडा झालेला सुभेदाराना अज्जीबात चालत नसे. आता भिम मन लावुन अभ्यास करत असे. रात्र रात्र जागुन सगळ्या विषयांची जोरदर तय्यारी केली. अन १९१२ मधे बाबासाहेब आंबेडकर बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.

ईथे एक गम्मत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी स्थापण केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य अ. बा. गजेंद्रगडकर हे सुद्धा याच वर्षी बी.ए. झाले अन ते या परिक्षेत प्रथम आले होते.

बी. ए. झाल्यावर भीमराव आंबेडकरानी बडोदे सरकारच्या सेवेत नोकरी स्विकारण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बडोदे नरेशनी जो मदतीचा हात दिला होता त्याची बाबासाहेबाना जाणिव होती. बडोदे संस्थानातिल सैन्यात बाबासाहेबांची लेफ्टनंद पदी नियुक्ती होते. पण सुभेदार मात्र फार अस्वस्थ होतात. बडोद्याच्या चालिरीती व सामाची कट्टरता सुभेदाराना चांगली माहित होता. आपल्या पोराला तिकडे जगणे कठिण होईल याची त्याना जाण होती. सुभेदारानी भीमास बडोद्याची नोकरी न स्विकारण्यास सांगितले. पण भीम परत हट्टाला पेटले. शेवटी वडलानीच माघार घेतली अन भीम बडोदयास रवाना झाले.

बडोदयास जाऊन दहा पंधराच दिवस झाले होते अन मुंबईहुन वडिल आजारी असल्याची तार येते. भीम लगेच मुंबईच्या प्रवासाला निघतो. सुरतला गाडी थांबते तेंव्हा वड्लांसाठी सुरतची प्रसिद्ध मिठाई घेण्यास ते गाडीतुन उतरतात. मिठाई घेऊन येईस्तोवर गाडी सुटते, अन दुसरी गाडी पकडायला दुसरा दिवस उगवावा लागतो. दुस-या दिवशी बाबासाहेब ऊशीर मुंबई पोहचतात. वडील मृत्युशय्येवर पडलेले, प्राण कंठाशी आणुन आपल्या प्रिय मुलाची वाट बघत होते. तेवढ्यात बाबासाहेब आल्याची बातमी कानी पडताच सुभेदार डोळे उघडतात. पोराला जवळ बसवितात, हातात हात घेतला हा शेवटचा स्पर्श होता. सुभेदाराना ते कळत होतं, भीमाला दु:ख आवरेना डोळे भरुन आले. अन ईथेच एक तेजस्वी महापुरुषाची ज्योत मालवली. भीमानी टाहो फोडला. निस्वार्थी अन विनाअट सातत्याने प्रेमाचा वर्षाव करणारा एक आधारस्तंभ आज भीमाच्या आयुष्यातुन वजा झाला. पोराच्या उत्कर्षासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडणारा एक तेजस्वी पुरुष अन प्रेमळ बाप भीमाला एकटा टाकुन निघुन गेला.

0 comments:

Post a Comment