About

Searching...
Thursday, 5 July 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्टर झाला)

July 05, 2012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्टर झाला)
भारतमंत्री मॉंटिग्यू यानी लंडनमधे असताना परत एकदा बाबासाहेबाना भेटीसाठी बोलाविले. मुंबई विधिमंड्ळाचा सभासद म्हणुन भारतात जाण्याचा आग्रह धरला. एवढा आग्रह धरुन ते थांबले नाही तर त्याना भारताचे महाराज्यपाल व मुंबई प्रांताचे राज्यपाल याना तार पाठवुन कळविले की आंबेडकराना मुंबई विधिमंडळात सभासद म्हणुन नेमावे. आज परत याच मुद्यावर बाबासाहेबांचे मन वळविण्यासाठी यानी ईथे बोलाविले होते. पण बाबासाहेब ते बाबासाहेब, ते असल्या गोष्टींच्या आहारी जाणरं व्यक्तिमत्व नव्हतं. बाबासाहेबानी भारतमंत्र्याला स्पष्ट शब्दात सांगितले की मी ईथे वयक्तिक गा-हाणे मांडण्यासाठी आलेलो नाही. मी ईथे आलो माझ्या बांधवांच्या व्यथा मांडायला, मी ईथे पिडीतांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तेंव्हा माझ्या बांधवांच्या हितासाठी काही धोरणात्मक पाऊल उचलता येईल का ते पहावे. मला पद घेण्यात किंवा स्वत: प्रसिद्धी मिळविण्यात काळीचाही रस नाही. बाबासाहेबांचे हे शब्द ऐकुन तो गोरा इंग्रच थक्क झाला. कारण आता पर्यंत भारतातुन आलेला प्रत्येक नेता स्वार्थी असतो असा अनुभव होता. पण आज त्याची गाठ पडली होती त्यागाची चालती बोलती व्याख्या आंबेडकर यांच्याशी. आत्मयज्ञ करणा-या एक महान आर्य पुरुषाचे हे रुप पाहुन मॉंटिग्यू चॉट पडला. त्याने अनेक प्रयत्न केले पण सगळे व्यर्थ गेले. विधीचा अभ्यासक्रम पुर्ण करण्याचा निर्धार पक्का होता. बाबासाहेबानी परत जोमाने अभ्यास सुरु केला. याच दरम्यान लंडन टाईम्सच्या संपादकाशी मैत्री केली. अस्पृश्यांच्या शिकक्षणा संबंधी धोरणात्मक पाऊल उचलण्यात यावे या अर्थाचा एक लेख सोडला. लंडन मधे पहिल्यांदाच एक अस्पृश्य येऊन थडकला होता. आज पर्यंत संवर्णानी जे लपवुन ठेवले व खोटी हुशारकी मिरविली ती एक एक करुन बाबासाहेब उलगडु लागले. संस्काराचे व समतेचे मुखवटे पांगरुन फिरणा-या भारतीय जातियवाद्यांच्या नाकी नऊ आले. संपुर्ण ब्रिटन मधे बाबासाहेबानी प्रथम खळबळ उडवुन दिली. ईथल्या संस्कृतीचा दुसरा पैलु प्रथमच लोकांच्या पुढे आला होता. सगळा ब्रिटेन जो भारतीय संस्कॄतीला छि थु करु लागला.

१९१९ च्या कायद्या प्रमाणे राजकिय मानपत्रात अस्पृश्यांचा उल्लेख आला अन प्रांतिक व केंद्रिय विधिमंडळावर अस्पृश्याना प्रतिनिधीत्व मिळाले. केंद्रिय विधिमंडळात सरकार नियुक्त १४ पैकी १ अस्पृश्य सदस्य होता. प्रांतिक विधिमंडळात मध्य प्रांत-४, मुंबई प्रांत-२, बंगाल-१, ऊत्तर प्रदेश-१, आणि मद्रास प्रांत-९ असे प्रतिनिधित्व अस्पुश्याना मिळाले.

“प्रॉव्हिन्शल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स ईन ब्रिटिश इंडिया” हा विषय घेऊन १९२१ च्या जुन महिन्यात बाबासाहेब एम. एस्सी. झाले.

४ सप्टेंबर १९२१ मधे शाहु महाराजाना पत्र लिहुन २०० पौंड्ची रक्कम उधार मागितली. या दरम्यान परत चलनवाढ झाल्यामुळे पैशाची चुणचुण जाणवु लागली. हि रक्कम कर्ज म्हणुन दयावे अन भारतात आल्यावर व्याजा सकट ती परत करु असा पत्र लिहला.

आता एम. एस्सी. ची पदवी मिळाल्यवर डॉक्टरेट साठी अभ्यास सुरु केला. डॉक्टर ऑफ सायन्स साठी “रुपयाचा प्रश्न” (The Problem of The Rupee) हा प्रबंध लिहुन १९२२ च्या पहिल्या तिमाहित लंडन विद्यापिठाला सादर केला. याच दरम्यान ते बॅरिस्टर झाले. या प्रबंधाच्या लिखानामुळे या आधि त्याना बॅरिस्टरच्या परिक्षेला बसता आले नाही.

६ मे १९२२ रोजी कोल्हापुरचे छत्रपती श्री. शाहु महाराज यांचे मुंबईत निधन झाले. हि बातमी इंग्लड्च्या वृत्तपत्रात वाचुन बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. अस्पृश्यांचा आधार स्तंभ आज कोसळा होता. दिन दलितांसाठी कळकळीने काम करणारा एक महान राजा आज निघुन गेला होता. बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहुन त्याना बळ देणारं अन वेळ प्रसंगी पाठीवर थाप मारुन साबाशकी देणारा एक हाथ कायमचा नाहिसा झाला. बाबासाहेब शोकाकुल अवस्थेत राजाराम महाराजाना तसे पत्र लिहतात.

खरं तर १९२२ च्या मार्च-एप्रिल नंतर बाबासाहेबांचं लंडन मधिल शिक्षण पुर्ण झालं होतं. त्याना एम. एस्सी. व बॅरिस्टर या दोन्ही पदव्या मिळाल्या होत्या. डॉक्टरेट साठी प्रबंध सादर केला होता. आता त्यांच्याकडे मोकळा वेळ होता. पण या दरम्यान बॉन विद्यापिठातुन एखादी पदवी घ्यावी म्हणुन बाबासाहेब १९२२ च्या मे महिन्यात बॉनला निघुन जातात. तिथे प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला.

पण याच दरम्यान बॉनला आसताना बाबासाहेबांना लंडन वरुन एक संदेश येतो. त्यांचे लंडनचे प्रा. एडविन कॉनन यांनी बाबासाहेबान ताबडतोब लंडनला परत येण्याचे आदेश दिले. सादर केलेला प्रबंध ब्रिटीश राजवटीचे बिंग फोडणारा होता. ब्रिटीश प्राध्यापकांच्या राष्ट्रीय बाण्याला झोंबणारा निष्कर्ष या प्रबंधात काढण्यात आलेला होता. प्राध्यापकानी या प्रबंधाचा तिखटपणा जरा कमी करायची सुचना दिली. विषयाचा मुळ गाभा तसाच ठेवुन प्रखरपणे मांडलेले मत जरा सौम्य करण्याची हि सुचना एका प्रबंधकाराशी समरस झालेल्या देशभक्तास दुखवुन गेली. पण नाईलाज होता. बाबासाहेबानी हि सुचना मान्य केली पण आता तिकडे बॉन विद्यापिठाचा अभ्यास नुकताच चालु केल्यामुळे लगेच हा बदल करुन सुधारित प्रबंध सादर करणे जमणार नव्हते.

या आधी लंडन विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघापुढे “जबाबदार सरकारचे दायित्व” या विषयावर बाबासाहेबानी एक निबंध वाचला होता. तेंव्हा वातावरण फार तापले होते. बाबासाहेबांमधिल देशभक्त जेंव्हा जेंव्हा प्रंबधामधुन व्यक्त होत असे तेंव्हा ब्रिटीश व्यवस्था त्यांच्याकडे शंकेनी बघत असे. बाबासाहेब भारतिय क्रांतिकारी संघट्नेचे सदस्य असल्याची अधे मधे शंका येत असे. त्या नुसार ब्रिटीश गुप्तचर संघटनेने त्यांच्या नाव क्रांतिका-यांच्या यादीत घातले व पाळत ठेवले. पण शेवटी सत्य काय ते त्याना कळले.

१४ एप्रिल १९२३ रोजी बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर मायभुमीत परतले. आजुन डॉक्टरेट मिळायची होती. भारतात आल्या आल्या प्रबंध सुधारणेचे काम हातात घेतले. चार पाच महिने अथक परिश्रम घेऊन सुधारीत प्रबंध लिहला. हवे तसे बदल केल्या गेले. प्रबंधात हे बदल करताना त्याना फार त्रास झाले पण उपाय नव्हता. तरी सुद्धा प्रबंधातिल मुख्य गाभा शक्यतो न हलता वरवर करता येईल तितका बदल करुन हा प्रबंध लंडनला पाठवुन दिला. अन १९२३ च्या शेवटी लंडन विद्यापिठाने तो प्रबंध स्विकारुन बाबासाहेबाना “डॉक्टर ऑफ सायन्स” हि पदवी बहाल केली. लंडन मधिल पी. एस. किंग ऍंन्ड सन्सने १९२३ च्या डिसेंबर महिन्यात “द प्रोब्लेम ऑफ रुपी” हा प्रबंध ग्रंथ रुपाने प्रकाशित केला.

तिन विश्वविद्यालयातुन पदव्या घेतल्यावर बाबासाहेबांची विद्वत्ता जगाने मान्य केली. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र, धर्मशास्त्र, निर्बंधशास्त्र आणी इतिहास ईत्यादी विषयात पारंगत झालेला महाबली भिमराव आंबेडकर आता अस्पृश्यांची लढाई लढण्यास पुर्ण ताकतीने रणांगणात उतरला होता.

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.