डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर आघाडया)
पाक्षिक समता व बहिष्कृत भारत:
बाबासाहेबाचं बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक चालुच होतं. त्याच्या जोडील समता नावाचं दुसरं पाक्षिक २९ जुन १९२८ पासुन सुरु करण्यात आलं. आता समता व बहिष्कृत भारत आळीपाळीने दर शुक्रवारी प्रकाशित होऊ लागले. या दोन पाक्षिकानी बहुजन समाजात नवचैतन्य जागृत केलं. खेडया पाडयात क्रांतीचे वारे वाहु लागले. तिकडे गांधीनी ब्रिटीशांच्या विरोधात दंड थोपटले होते. उभा देश गांधीच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्याचा लढा लढत होता. तर ईकडे अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली समतेचा लढा अधिकाधिक तीव्र करु लागला. एकीकडे १५० वर्षाच्या गुलामगिरीच्या विरोधात गगनभेदी आरोळ्या ऐकु येत तर दुसरीकडे २००० वर्षाच्या गुलामगिरीच्या विरोधात अस्पृश्याच्या किंकाळया भीम गर्जनेत परावर्तीत होत होत्या. एकेकीडे सनातनी जे स्वत:च्याच बांधवाना गुलाम बनवुन छ्ळत होते ते स्वातंत्र्याची खोटारडी भाषा बोलु लागले, स्वदेशाच्या नावाखाली सनातनी धर्माची (पुनर्बांधनी जी ब्रिटीशानी उध्वस्त केली होती) करण्याची चळवळ चालविली होती. तर दुसरीकडे खरीखुरी स्वातंत्र्य चळवळ आकार घेऊ लागली होती. अन हा खरा स्वातंत्र लढा लढविताना जी दोन पाक्षिक बाबासाहेबानी चालु केली होती ती लवकरच वित्तीय कमकुवतीचा बळी पडली अन १९२९ साली हि दोन्ही पाक्षिक बंद पडली. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ते असे म्हणत की ज्या जळवळीचा वृत्तपत्र नाही ती चळवळ लंगडी आहे. आज परत एकदा बाबासाहेबांची चळवळ लंगडी झाली होती.
गिरणी कामगारांचा संप:
याच दरम्यान मुंबईतील गिरणीकामगारानी संप केला. हा संप त्या काळातील एक सगळ्यात मोठा व कित्येकाचे संसार उध्वस्त करनारा महाविकोपी संप ठरला. कामगार व मालकाचे संबंध बिघडविण्यात पटाईत असलेल्या कम्युनिष्टांच्या दुराग्रहाचा हा प्रतिबिंब होता. सुमारे दिड लाख कामगार संपावर गेले. ईतर कामगार तुलनेने आर्थिक बाबतीत भक्कम होते पण दलित कामगारांचे या संपामुळे अतोनात हाल झाले. अशावेळी सहा महिने संप चालल्या कारणास्तव दलितांची दानदान उडाली. अत्यंत दयनीय अवस्था झाली. अन हे सगळं बाबासाहेब अत्यंत जवळुन पाहत होते. अस्पृश्य कामगार बाबासाहेबाना भेटुन आपल्या व्यथा सांगु लागले. कम्युनिष्टानी आपल्या हट्टापायी कसे कामगारांचे नुकसान केले याचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं जाई. कामगारांचे असे हाल होताना बघुन ते अस्वस्थ होत. त्यांच ह्रुदय भरुन येई. फ्रेड्रिक स्टोन नावाच्या गृहस्थाचे इ.डी. ससून नावाच्या गिरण्या होत्या. बाबासाहेबानी मध्यस्ती करुन कामगाराना कामावर रुजु होण्यास सांगावं अशी फ्रेड्रिक साहेबांकडून विनंती करण्यात आली. सी.के. बोले त्या काळचे प्रसिद्ध मजुर नेते होते. त्यांच्या सोबत बाबासाहेबानी हा संप मागे घेण्यासाठी पुढाकार घेऊन मजुर व मालकांमधे समेट घडवुन आणण्यास प्रारंभ केला. ईतर संघटना मात्र बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे संतापुन गेल्या. बाबासाहेबांना याच काळात जीवाचा धोका निर्माण झाला होता. तरी ह्या सगळ्या गोष्टिची पर्वा न करता बाबासाहेबानी संपकर्त्यांमधे प्रबोधनाचे काम चालु ठेवले.
अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी छात्रावास:
आज पर्यंत बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातुन समाजकार्य चालु होते. पण आता बाबासाहेबानी शिक्षणासाठी स्वतंत्र आघाडी उघडुन दलितांचा उद्धार कारयचे व राजकीय व सामाजीक लढयासाठी दुसरी स्वतंत्र आघाडी उघडायचे ठरविले. त्यामुळे १४ जुन १९२८ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जीत करण्याचा व दोन वेगळ्या संस्था उघडण्याचा ठराव संमत झाला. ठरल्याप्रमाणे दोन वेगळ्या संस्थांची नोंदणी झाली.
१) भारतीय बहिस्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ
२) भारतीय बहिस्कृत समाज सेवा समिती.
भारतीय बहिस्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ: या संस्थेनी संपुर्णत: अस्पृश्यांच्या शैक्षणीक कामावर लक्ष केंद्रित करुन समाज कार्य करण्याचे ठरले. त्या प्रमाणे हि संस्था नोंदणीकृत करुन घेण्यात आली. जागो जागॊ निवासाची सोय उपलब्ध करुन देणे. मुलाना शिकण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे, शालेय शुल्क व राहण्याची सोय या प्राथमिक गरजांची पुर्तता करणे ईत्यादी महत्वाची कामे या मंडळाने सुरु केली. अस्पृश्यासाठी छात्रावास चालविताना पैशाची गरज भासु लागली. बाबासाहेबानी सरकारला साकडे घातले व आर्थीक मदत देण्याची मागणी केली. ईकडे बाबासाहेबांचे अनुयायी जोमाने कामाला लागलेच होते. जिकडे तिकडे अस्पृश्यांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांची सेना दिवस रात्र खिंड लढवु लागली. एकंदरीत कामाचा सपाटा बघुन व कार्यकार्त्यांची समाजसेवेची तळमळ बघुन मुंबई सरकारनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्थेला वार्षिक ९०००/- नऊ हजार रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान नुसतं अनुदान नव्हतं, अस्पृश्यांच्या जीवनाला कलाटणी देणारं पहिलं पाऊल होतं. आता शिक्षणाची लाट उसळणार होती. अस्पृश्याना नविन दिशा गवसणार होत्या. अंगभुत गुणांच्या जोरावर मुख्य प्रवाहात मुसंडी मारण्याची सिद्धता ईथे होणार होती. पुढच्या लढाईसाठी भीम सैनिकाची ईथेच जडण घडण होणार होती. अन प्रत्येकानी त्या दिवशी उत्सव साजरा केला. आता अस्पृश्यांच्या विध्यार्थीनी शिक्षणाची कास धरली, खेड्या पाड्यातुन, अस्पृश्यांची पोरं बाबासाहेबांच्या वसतीगृहात प्रवेश घेऊन शिकु लागली. येणा-यांची संख्या ईतकी जास्त होती की त्याचा वसतीगृहाच्या एकंदरीत बजेटवर परिणाम होऊ लागला. अनुदानाच्या व दानशूर व्यक्तिंकडुन मिळालेल्या पैशात हे छात्रवास चालविणे अवघड होऊन बसले. नीधी गोळा करुन हे पुण्य कार्य चालु ठेवणे अपरिहार्य होते. त्यामुळे आता प्रत्यक्ष बाबासाहेबानी संस्थेसाठी निधी मिळविण्याच्या कामात उडी घेतली. ते दानशूर संस्था, व्यक्ती व संस्थानिंकांकडे अस्पृश्याच्या शैक्षणिक कार्यास हातभार लावण्याची विनंती करत. कित्येकाना पत्र लिहुन आपल्या संस्थेची माहिती देऊन निधी मिळविण्याचे प्रयत्न करत. जागो जागी जिल्हा लोकल बोर्डाच्या नेत्याना भेटुन शुल्कात सवलत व छात्रवासासाठी विनामुल्य जागा मिळविल्या. स्पृश्य हिंदु या कार्यक्रमाबद्दल उदासिन असत. त्याना वाटे की अस्पृश्यानी ठेविले तैसेची अनंते रहावे या उक्तीप्रमाणे जीवन कंठावे. बाबासाहेबांचे कार्य त्याना नसत्या उचापत्या वाटत. महार शिकुन करणार तरी काय असा सनातन्यांचा समज होता. त्यामुळे बाबासाहेबानी आता मुस्लिम संस्थांकडे हात पसरविले, ज्या समाजाला ते फारसे पसंद करीत नसत पण आज त्यांच्याकडुन सनातन्यांपेक्षा वेगळ्या प्रतिसादाची चिन्ह दिसु लागली होती. पारसी धर्मदाय संस्थांकडुन निधी मिळविण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. जिकडे तिकडे हात पसरण्याशिवाय पर्यायच नव्हता. एक असा माणुस ज्यानी मनात आणलं असतं तर कुठल्याही देशात, अत्यंत उच्चपदस्थ अधिकारी पदावर विराजमान होऊन ऐश्वर्यसंपन्न जीवन जगण्याची सर्व गुणवत्ता अंगात असुन सुध्दा ईथे मुस्लिं, पारशी व दानशूर व पुरोगामी हिंदुंच्या दारो दारी भिक्षा मागत फिरत होते. कुणासाठी तर स्वत:साठी नाही, आपल्या पिढीत बांधवांसाठी. पुढच्या पिढ्याना ऐश्वर्यसंपन्न पाहण्यासाठी स्वत:च्या सर्व सुख सोयीना विसर्जीत करुन एक बोधिसत्व जो स्वत: विद्येचा धनी होता आज आर्थिक धनासाठी वणवण भटकत होता. ईथे अस्पृश्यांच्या छात्रवासात खायला अन्नाचा तुटवडा पडु नये म्हणुन जेंव्हा बाबासाहेब पारश्यांची दारी मदतीसाठी जात होते तेंव्हा उभ्या भारतात लग्नविधीच्या नावानी लाखो क्विंटल तांदुळ अक्षता म्हणुन फेकुन दिल्या जात होता. भाजीसाठी फोडणी घालायला तेल ईथे जपुन जपुन वापरल्या जात होतं तेंव्हा ईथले आमचे हिंदु बांधव मात्र लाखो लिटर तेलं हनुमानांच्या मंदिरात दगडावर ओतत असत. आजही परिस्थीती तशीच आहे. कित्येक लोकं उपाशी मरताहेत तर माजखोर लोकं त्याच्या कितीतरी पटीने जास्त अन्न व वित्त देवाच्या नावानी फेकुण देत आहे. हजारो वर्षांपासुन दास्यात खितपत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबानी जागो जागी विविध आघाड्या उघडुन लढा उभारला होता. महान कार्य सोप्या पद्धतीने होतं नसतं. त्याना जागी जागी अटकाव होत असे. अपयश येत असे. ते अंतर्मुख होऊन या सगळ्या गोष्टिंचा विचार करुन परत एकदा जोमाने कामाला सुरुवात करत.
धर्मांतराचा पहिला खडा टाकुन पाहिला:
सनातनी लोकानी अस्पृश्य चळवळीला नेहमी उपहासाच्या नजरेनी पाहिले. बाबासाहेबही त्यांच्या नजरेत आता एक तापट व उटपटांग बोलणारे गृहस्थ बनले. अस्पृश्यानी आहे तसेच राहावे सगळे याच मताचे होते. याच दरम्यान कुठुनच प्रतिसाद मिळत नाही. चळवळीला यश येत नाही, हिंदुनी असे वागल्यास अस्पृश्याची दास्यातुन कधीच सुटका होणार नाही हे जाणुन हिंदुंना गदागदा हालविण्यासाठी म्हणुन बाबासाहेबानी जळगाव व पातुर्डा येथे भाषणात धर्मांतराचा खडा टाकुन हिंदुंच्या मनाचे वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण संवर्णानी हा बाबासाहेबांचा आचरटपणा आहे असे समजुन या घोषणेकडे दुर्लक्ष केले. दिलेली मुदत संपल्यावर जळगावातील १२ महारानी ४ जुन १९२९ रोजी ईस्लाम धर्म स्विकारला. महारानी ईस्लाम स्विकारताच हिंदुंचे तत्पुर्तीतरी धाबे दणाणले. आता सगळे महार मुस्लिम बनतील की काय याची भीती वाटु लागली. हि धर्मांतराची लाट आपल्या धर्माला अत्यंत हानीकारक ठरेल हे उघड उघड दिसल्यामुळे लगोलग हिंदुनी महारांना तात्पुर्ती सहानुभीती म्हणुन जळगावातील दोन विहिरी खुल्या करण्यात आल्या. आजुन काही अनिष्ठ घडण्यापेक्षा महाराना ईथेच थोपवुन धरण्याची ही एक बिनतोड युक्ती होती.
सावरकरांचे निमंत्रण:
सप्टेबर १९२९ ला बाबासाहेब एका खुण खटल्यासाठी रत्नागिरीत गेले. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालणार होता. बाबासाहेबांच्या या रत्नागिरी भेटीचा थोडासा सामाजीक कार्यासही हातभार लावण्यासाठी सावरकारानी कार्यक्रम आखला. रत्नागिरीतील शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या घेऊन ते निमंत्रण पत्र बाबासाहेबाना देण्यात आले. रत्नागिरीतील विठठल मंदिरात बाबासाहेबानी भाषण करावे असं विनंती करणारं हे स्वाक्ष-यानी भरलेलं पत्र बाबासाहेबाना देण्यात आलं. पण याच दरम्यान रत्नागिरीतील सनातन्यानी मात्र कुठल्याही परिस्थीती हा कार्यक्रम होऊ न देण्याचं जाहिर केलं. सभाबंदीसाठी दंडाधिका-याला निवेदन देण्यात आले. ज्या शहरात खुद्द सावरक अस्पृश्यनिवरणाचं काम करत होते तिथे आंबेडकरांच्या सभाबंदिचे निवेदन दिले जाते. यावरुन सनातन्यांच्या मनात किती विष होतं दे जाहिर होते. त्यांची एकंदरीत मानसिकता किती विकृत होती याचा हा कागदोपत्री पुरावा होय. बाबासाहे मात्र दिवसभर कोर्टाच्या कामात गढून गेले होते. दरम्यान त्याना मुंबईवरुन अत्यंत आवश्यक तार येते व लगेच मुंबईला हाजर होण्याचा संदेश मिळतो. त्यामुळे या सभेला न जाता बाबासाहेब न्यायालयातील काम संपवुन तडक मुंबईस निघुन जातात व रत्नागिरी शहरातील एक ऐतिहास भेट अपुर्ण राहते. भारतीय इतिहासातील दोन महान व्यक्ती ज्यांच्या कर्तुत्वानी हि माती कृतकृत झाली त्यांची ऐतिहासी भेट व सभा होता होता हुकल्यामुळे आमच्या सांस्कृतीक ठेव्यातील एक सोनेरी पान रंगता रंगता कोराच राहिला.
दादर गणेशोत्सव:
एक वर्षापुर्वी दादर गणेशोत्सव मंडळाने अस्पृश्याना गणेश दर्शन खुले केले होते. पण या वर्षी आचानक हिंदुंचे म्होरके डॉ. जावळे व इतर गुंडांच्या दबावामुळे गणेशोत्सव मंडळाने आपला मागच्या वर्षीचा निर्णय फिरवला. अस्पृश्याना मुर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या जागी वा प्रत्यक्ष दर्शनाच्या खोलीत प्रवेश दिला जाणार नाही असे जाहिर केले. आयोजकांचा हा निर्णय वा-या सारखा अस्पृश्यांचा घरा घरात पोहचला. लगेच अस्पृश्यानी आयोजनस्थळी गर्दी केली. सुरुवातीला आयोजकांच्या गुंडानी अस्पृश्याना दटाव दडप केला. पण पाहता पाहता अस्पृश्यांची संख्या लक्षणीव वाढली. आता दबाव गुंडावर येऊ लागला. तरी अस्पृश्य येऊच लागले. शेजार पाजारची सगळी जागा जनसमुदायानी भरुन गेली. लोकांची लाट आली होती जणू. आयोजकांचे धाबे दणाणले. तरी सुद्धा गुंडानी मुद्दा लावुन धरला. अस्पृश्याना प्रवेश न देण्याचा मुद्यावर ते अडुन बसले होते. फरक फक्त एवढाच होता की अर्ध्या तासापुर्वी ते धमकावणा-या स्वरात बोलत होते, आत मवाळ स्वरात, पण निर्णय मात्र अटावाचाच होता. याच दरम्यान प्रबोधनकार ठाकरेनी पुढाकार घेऊन परिस्थीती आटोक्यात ठेवली. अस्पृश्यांच्या हक्कावर गदा आणणा-यांचा निषेध नोंदविण्यात आला. प्रबोधनकारानी महारांची बाजु उचलुन धरली. परिस्थीती अत्यंत स्फोटक बनली. कुठल्याही वेळी दंगा उसळेल या अवस्थेला गेली. अन दंगा झालाच तर दोन मिनटात सनातन्यांचा धुव्वा उडविणार एवढी जनसंख्या बाहेर सज्ज होती. एकंदरीत परिस्थीती बघुन सनातन्यानी आपला निर्णय मागे घेतला व उत्सवाच्या मंडपात एकच जल्लोष उडाला. अस्पृश्यांचा विजय झाला. आता या वर्षी अस्पृश्य मनसोक्तपणे आपल्या गणरायाचे दर्शन घेणार होते. गणेशाच्या दर्शणानी आमचा उद्धार होणार होता असे नव्हे, पण हिंदु धर्मातील व्यक्ती म्हणुन तो आमचा अधिकार होता. हा लढा भक्तिपेक्षा अधिकाराचा होता.
पर्वती मंदिर चळवळ:
१३ ओक्टोबर १९२९ रोजी पुण्यातील पर्वती मंदिराची चळवळ सुरु झाली. लोकाना मंदिर चळवळ म्हणजे नाशिकची काळाराम चळवळच आठवते. पण त्याही आधी पुण्यातील सुधारणावादी पुढा-यांच्या मदतीणे शिवराम जानबा कांबळेनी पर्वती मंदिर चळवळ चालविली. जी शेवटी अपयशी ठरली पण या चळवळीने अस्पृश्यांच्या मनात एक नविन उत्साह भरला. ईथे देण्यात आलेल्या गगनभेदी आरोळ्याचा प्रतिध्वनि पुढे नाशिकात अखंडपणे ६ वर्ष गुंजत राहिला.
या चळवळीत खालिल मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता. राजभोज, थोरात, लांडगे, मुरकुटे इत्यादी दलित वर्गीय पुढारी व सोबत सुधारणावादी संवर्ण वा.वि.साठे, देशदास रानडे, ग.ना. कानिटकर, केशवराव जेधे, अन न. वि. गाडगीळ. इत्यादी स्पृश्य नेत्यानी अस्पृश्यांच्या बाजुने पर्वती मंदिर लढ्यात सक्रिय भाग घेतला. या चळवळीच्या दरम्यान सनातन्यानी अत्यंत निष्ठुरपणे दगडफेक केला. त्यात राजभोज गंभीर जखमी झाले. त्याने लगेच दवाखाण्यात हलविण्यात आले. गाडगीळ व रानडे ही जखमी झाले. परिस्थीती अधिक स्फोटक होत चालली होती. प्रकरण पोलिसांच्या हाताबाहेर जाताना पाहुन लषकराला पाचारण करण्यात आले. अख्खी एक लष्करी पलटण आली. लष्कर व पोलिसानी संयुक्तपणे जोर लावुन परिस्थीती काबुत आणल्या. एक मोठा रक्तपात टळला.
पुण्यात जेंव्हा हि चळवळ चालु होती तेंव्हा बाबासाहेब स्टार्ट समितीच्या कामात गढून गेले होते. पुण्यातील सत्याग्रहात दलितांवर झालेला दगडफेक व मारामारी ऐकुन बाबासाहेब अस्वस्थ झाले. त्यानी मुंबईत सभा घेऊन या चळवळीला आपला पाठिंबा दर्शविला. पुण्यातीळ चळवळीस नुसता पाठींबा व शुभेच्छे देण्यापेक्षा मुंबईतील कार्यकर्त्यानी आर्थीक मदत पाठवावी. अन वेळप्रसंगी जथ्याजथ्यानी जाऊन पुण्यास धडकण्यास सर्वानी सज्ज राहावे असे आदेश दिले. आपल्या जात बांधवांच्या लढ्यात गरज पडेल तिथे, पडेल तेंव्हा उडी मारण्यासाठी सगळ्यानी सदैव तय्यार रहावे असा भीम संदेश दिला. अन ईथेच बाबासाहेबानी घोषित केले की आपणही अशीच एखादी मोठी मंदिर प्रवेश चळवळ करु अन आपला अधिकार बजाऊनच दम घेऊ. बाबासाहेबांची नाशिकची चळवळ हि मुळात या पर्वती मंदिर चळवळीच्या प्रेरणेतुन उभी होते. पण सनातन्यांचे इरादे ईतके बुलंद होते की सतत सहा वर्ष चळवळ चालवुन सुध्दा यश येत नाही व शेवटी धर्मांतराला नाईलाजास्तव झुकतं माप दयावं लागलं.

—
0 comments:
Post a Comment