About

Searching...
Sunday, 15 July 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१

July 15, 2012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांधीशी भेट)
जुलै १९३१ मधे सरकारनी गोलमेज परिषद (दुसरी) साठी निवडलेल्या प्रतिनिधींची नावे जाहिर केली. पहिल्या गोलमेजमध्ये मर्दुमकी गाजवून सारे जगाला गदागदा हालवून सोडणा-या निर्भेड व बाणेदारपणाचे व्यक्तमत्व, म्हणजेच बाबासाहेबांचे नाव त्या यादीत होते. सप्रू, जयकर, सेटलवाड, मालवीय, सरोजिनी नायडू, मिर्झा इस्माईल, जीना, रामस्वामी मुदलियार अशा एकसे बढकर एक दिग्गजांची दुस-या गोलमेजसाठी निवड झाली होती. ह्या वेळी नुसती परिषद नव्हती तर या परिषदेत भावी हिंदुस्थानाची घटना बनविण्याचे प्राथमिक स्वरुपाचे काम करण्याचे ठरले होते. बाबासाहेबांची मागच्या वेळीस या समितीवर निवड झाली नव्हती. त्यांचा बाणेदारपणा व देशप्रेमाने झपाटलेल्या छटा गो-या साहेबांच्या राष्ट्रिय बाण्याला खोलवर झोंबल्या होत्या. तरी या वेळी त्यांच्या बुद्धिमत्तेपुढे शरणागती पत्कारून घटना समितीवर निवड करावी लागली. या निवडीमुळे बाबासाहेबांव देशाच्या कानाकोप-यातुन अभिनंदनाचा वर्षाव झाला. तिकडे ब्रिटनमधील लोकानी सुध्दा बाबासाहेबांच्या निवडी बद्दल समाधान व्यक्त केले.
उभ्या भारतात जिकडे तिकडे अभिनंदनांचा वर्षाव चालु असताना बाबासाहेबांच्याच मातृभूमित त्याच शहरात दूर गावदेवितील मणिभवन येथे गांधीजीने मोठा घोळ घालून लोकांनाबुचकळ्यात टाकले. ते दुस-या गोलमेजला जाणार की नाही हे त्यानी आजून जाहिर केलेच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत गूढता वाढवुन पुढच्या कार्याची रुपरेषा स्पष्ट न करणे हे गांधीच्या स्वभावातील सर्वात वरच्या क्रमांकातील गुणवैशिष्ट्य. आज त्यांच्या या गुणवैशिष्ट्यानी सारा भारत स्तब्ध झाला होता. त्या मणिभवन मधुन कधी एकदा गांधी आपली गूढता बाजूला सारुन मत जाहिर करतील याची सा-यानाच काळजी होती. ऐन वेळी बहिष्कार बिहिष्कार घातल्याचे जाहिर केल्यास पंचायत होईल म्हणुन गांधीचे मत येइस्तोवर इतर कॉंग्रेसी नेत्यानी मौन बाळगणे सोयीचे समजले. लोकांच्या मनाचे वेध घेणे अन स्वत: मात्र गूढ व्यक्तीमत्व बनून लोकांची, कार्यकर्त्यांची धादल उडविणारं हे व्यक्तिमत्व आजुनही गोलमेज बद्दल मौन बाळगून होतं.
९ ऑगस्ट १९३१ रोजी या गूढ व्यक्तीमत्वानी बाबासाहेबांच्या मागण्या काय असतील याची चाचपनी करण्यासाठी एक पत्र पाठविले. वरुन फुशारकी बघा.... त्यानी पत्रात लिहले की मला आजच रात्री ८ वाजता भेट हवी आहे. त्या दिवशी बाबासाहेब सांगलिहून नुकतेच आले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. आंगात १०६ अंश ताप होता. आपली तब्बेत सुधारल्यावर आम्ही स्वत: आपल्या भेटिस येऊ असे प्रतिउत्तर पाठवून बाबासाहेब उपचार घेऊ लागले.
१४ ऑगस्ट १९३१ रोजी दिलेला शब्द पाळण्यासाठी बाबासाहेब मणिभवनात पोहचतात. दुपारी दोन वाजता भेटण्याचे ठरले होते. सोबत शिवतरकर, भाऊसाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, कद्रेकर, काणेकर असे सात आठ कार्यकर्ते असतात. बाबासाहेब मणिभवनाच्या तिस-या मजल्यावर गांधीच्या दिवानखाण्यात पोहचतात तेंव्हा गांधीजी पक्षातील लोकांशी चर्चेत गुंतलेले व फराळ करत होते हे पाहून बाबासाहेबानी नमस्कार केला व एका बाजुला जाऊन बसले.
आज भारतातील दोन दिग्गज आमने सामने आले होते. एक महान राजकीय व्यक्तिमत्व ज्याच्या नावाचा डंका जगभर वाजला ते गांधी. तर दुसरे समाजानी वेळोवेळी तेजोभंग केला तरी अखंड व अविश्रांत परिश्रमाने सा-या देशाला नविन सामाजीक नितीमुल्ये शिकविणारे महा विद्वान बाबासाहेब आंबेडकर. एक अत्यंत गूढ व्यक्तीमत्व, शेवट पर्यंत घोळ घालून ठेवणारा तर दुसरा रोकठोक बोलून निमिशात प्रश्न निकाली काढणारा. एक महाकपटी तर दुसरा महादयाळू आई सदृस्य. एक अत्यंत शक्तीशाली, बलशाली, धनाढ्य व शक्तिशाली लोकांचा टोकाचा पाठिंबा लाभलेला तर दुसरा दारिद्र्याचे चटके आजुनही सहन करणारा, धन कमविण्याची कुवत असुनही धनाच्या वाटेला न जाणारा युग पूरुष अन रंजल्या गांजल्यांच्या सेवेत स्वत:ला वाहुन घेणारा यूगप्रवर्तक, धनाच्या बाबतीत कंगाल लोकांचा सेनापती. खरं तर दोघांची तुलनाच नाही होऊ शकत. कारण बाबासाहेब हे संपुर्ण स्वातंत्र्याचे खरे समर्थक होते तर गांधी हे फक्त राजकीय स्वातंत्र्यालाच संपुर्ण स्वातंत्र्य मानणारे एक अल्पज्ञानी होते. गांधीना इंग्रजांची गुलामगिरी नको होती पण त्यानी अस्पृश्यांवर लादलेली गुलामगिरी कायम असावी अशा निर्लज्ज मताचा हा माणूस होता. त्याना स्वातंत्र्य म्हणजे काय हेच कळले नव्हते तरी ते स्वातंत्र्याच्या बाता करत हिंडत होते. त्यानी आपल्या स्वभावातील हा नीचपणा मणिभवनात दाखविलाच. तिकडे युगपुरुश त्यांच्या भेटीसाठी डोळे लावून बसला होता तर ईथे हे गूढ व्यक्तीमत्व मिस स्लेड या बाईशी हसत खिदळत गप्पा हाणत होते. एकंदरीत वातावरण व गांधीचा हा असा स्वभाव पाहून बाबासाहेब संतापलेत. कर्मयोगी माणसला असला आचरटपणा सहन होणे शक्य नव्हते. बाबासाहेबांचा संताप लवकरच भडका घेऊन दोघात खडाजंगी होण्याची चिन्हे दिसताच बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यानी गांधीच्या सहका-याना याची कल्पना दिली. एक कार्यकर्ता गांधीच्या कानात जाऊन कुजबुजला तेंव्हा गांधीनी आपलं खिदळण आवर्ती घेतलं अन बाबासाहेबाना भेटीस बोलावले. दोघांची नजरानजर झाली. दोघेही एक दुस-याना प्रथमच भेटत होते. औपचारिक प्रश्नोत्तरानंतर गांधीनी मुद्यात हात घातला.

गांधी- डॉक्टर आपले काय म्हणणे आहे?
बाबासाहेब-माझे नाही, आपले. कारण आपणच मला बोलविलात तेंव्हा मी ऐकायला आलो आहे. आपणच आपले मत सांगावे.
गांधी- माझ्या व कॉंग्रेस विरुद्ध आपल्या काही तक्रारी असल्याचे माझ्या कानावर आले. मी माझ्या लहान पणापासून अस्पृश्यांचा विचार करित आलो आहे. तेंव्हा तुमचे जन्मही झाले नसावे (ईथे खवचटपणा केलाच) अस्पृश्यांचा प्रश्न मी अधिक जिव्हाळ्याचा मानतो. आज पर्यंत अस्पृश्यांसाठी कॉंग्रेसने २० लाख रुपये खर्च केले. ही सगळी सेवा मी मनोभावे चालविली असता तुमची माझ्या व कॉंगेसवर तक्रार असण्याचे कारण काय?
बाबासाहेब- माझा जेंव्हा जन्मही झाला नसेल तेंव्हापासुन आपण हे कार्य करत आहात हे सत्य आहे. अन वडिलकीचा मुद्दा अशा प्रकारे पुढे आणण्याची आपली रित आहे तेंव्हा आपली वडिलकी मला मान्य आहे. पण त्या तुमच्या सेवेचे मात्र तीन तेरा वाजले. ती केवळ औपचारीक अस्पृश्य सेवा राहिली आहे. तुमचे सर्व वीस लाख रुपये पाण्यात गेले हे मी ठामपणे तुम्हास सांगतो. एवढीमोठी रक्कम जर माझ्या हाती आली असती तर अस्पृश्यतेच्या या कार्यात मोठी गगनभरारी मारली असती जे तुम्हाला जमल नाही अन जमणारही नाही. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुम्हाला अस्पृश्यता हा जर कळीचा मुद्दा वाटला असता तर आज जसे कॉंगेसचे सदस्यत्व स्विकारताना खादीचे कपडे वापरण्याची अट आपण ठेवली अगदी तसचं अस्पृश्याना समान माना अशी दुसरी अटही ठेवली असती. पण तुम्ही तसे करत नाही.
या वाक्यामुळे गांधीचे सारे मुखवटे फाटले. त्याच्या खोट्या नितीला आज एक विद्वानानी शब्दाच्या तलवारीने सपासप कापून काढले. गांधीचे सर्व शस्त्र बुद्दीच्या शस्त्रापुढे कुचकामी ठरले. अत्यंत बलाढ्य सेनापती गांधी आज बुद्दीच्या महाबलीपुढे निश:स्त्र होऊन लोळत होता. हतबल झालेल्या या गांधीला बाबासाहेब आजून लोळवतात ते पुढे म्हणतात.
“कॉंग्रेसचे सदस्यत्व घेताना किमान एका अस्पृश्य मुलाला घरी ठेवुन शिक्षणाची सोय करावी अशीही अट घालता येऊ शकते. पण तुम्ही तेही करत नाही. कारण तुम्ही अस्पृश्याचे जे काही बोल बोलत आहेत ते शुद्ध सोंग आहे.”
गांधी गोरेमोरे होऊन बाबासाहेबांकडे लज्जीत झालेल्या चोर नजरेने बघत होते. अंगावर कपडे नसलेल्या माणसालाही नागड करता येऊ शकतं याचा अपूर्व सोहळा चालु होता, सारे कार्यकर्ते आवाक होऊन याचा अनुभव घेत होते. बाबासाहेब पुढे म्हणतात.
“एवढेही न जमल्यास तुमच्या प्रत्येक सदस्यानी आपल्या घरी एखादी अस्पृश्य बाई नोकर ठेवून अस्पृश्यांची जबाबदारी उचलावी, पण तुम्ही हे सुद्धा करायला तयार नाही”
किती लहान अपेक्शा होत्या आमच्या. मागतो काय तर अरे किमान आम्हाला नोकर तरी ठेवा, धुनं भांड्यांचं काम तरी दया. अन हे धुणं भांड्यांच काम कोण मागतय तर सदीचा महाविद्वान......... काय ती अवस्था, अन तरी म्हणे गांधी अस्पृश्यांची सेवा करित होते. ज्यानी ईतकी लहान गोश्टही करायची तयारी नाही दाखविली तो अस्पृश्य निवारणाचे कार्य कसे काय करत होता तोच जाणे.
“यातलं काहीच न जमल्यास एखादया अस्पृश्य मुलाला शिक्शणासाठी आपल्या घरी ठेवण्याचे आपल्या कार्यकर्त्याना सुचवा, म्हणजे तुमचे कार्य सिद्धिस जाईल.” कृतीप्रधान अट किती महत्वाची अन निर्णायक ठरेल याचं नेमक्या शब्दात बाबासाहेबानी विश्लेषण केलं. विधायक काम कसे करावे हे गांधीनी बाबासाहेबांकडून शिकवणी लावून शिकायला हवे याचा खुलासा करणारा हा संवाद सत्र. पण वरवर शांततेचा आव आणणारा गांधी वरिल संवादातून शिकण्यापेक्षा अंहकार दुखावल्यानी अस्वस्थ झाला. बाबासाहेब पुढे बोलतात.
“महात्मे हे धावत्या आभासासारखे असतात. त्यांच्या धामधुमीमुळे धूर उंच उंच उडतो, पण समाजाची पातळी उंचावायची राहून जाते. तुमचे अगदी तसेच आहे.”
हे निर्भेड व्यक्तिमत्व ईथेच न थांबता पुढे म्हणते.
“ गांधीजी मला मायभूमी नाही. ज्या देशात कुत्र्याच्याही जिण्याने आम्हाला जगता येत नाही. कुत्र्या मांजराना जेवढ्या सवलती मिळतात त्या आम्हाला माणूस असुन मिळत नाही. त्या भूमीला आपली मातृभूमी व तेथील धर्माला आपला धर्म मी तर काय कोणीही ज्याला माणुसकीची जाण आहे व ज्याचा स्वाभिमान जागा आहे असा पुरुष म्हणणार नाही.”

गांधी मधेच बोलतात, “डॉक्टर तुम्ही एक महान देशभक्त आहात. ब्रिटिशांच्या भूमीत उभे राहुन निर्भेडपणे स्वातंत्र्याची मागणी करणारे तुम्हीच खरे देशभक्त आहात. तुमच्या गोलमेज (पहिली) मधील या वृत्तांताने मी सुखावून गेलो.

“नाही गांधीजी........ या देशाने आपच्या बाबतीत इतका अक्षम्य गुन्हा आहे की, ऊभा देशजरी मी पेटवुन दिला तरी मी देशद्रोही वा गुन्हेगार ठरणार नाही. त्याचे सगळे पाप तुम्हा लोकानाच लागतील. मला मायभूमी नाही परंतू सद्सदविवेकबुद्धी आहे. मी या राष्ट्राचा वा राष्ट्रधर्माचा उपासक मुळीच नाही. मला राष्ट्राशी काही देणेघेणे नाही. परंतू माझ्यात असलेल्या सदसद विविक बुद्धीचा मी अनन्य उपासक आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे माझ्या हातून काही राष्ट्रभक्ती म्हणविणारे कार्य जर घडले असेल तर ती माझी राष्ट्रसेवा नसून सदसदविवेक बुद्दीचा सन्मान आहे. जिथे आम्हाला कुत्र्यासारखे तुडविले जात आहे त्या राष्ट्राचा कुठल्याही टोकाला जाऊन मी नुकसान केले तरी ते पुन्यकार्यच ठरेल. पण तसे न करण्याचे श्रेय माझा विवेकाला जाते. मी देशी परदेशी भेद न करता माणुसकीचे हक्क मिळविण्यावर भर देत आहे. देशी-विदेशी मुद्या पेक्षा मानवी मुल्ये जास्त महत्वाची आहेत हे माझा विवेक मला सांगतो.”
वातावरण तापत चालले होते. बाबासाहेबानी एकहाती मिटींगचा सगळा ताबा स्वत:कडे घेतला होता. नुसतंच लिडर म्हणुन मिरविणा-या गांधीचे आज बाबासाहेबांनी वाभाडे काढले होते. बाबासाहेबांच्या शब्दवैभवाच्या महासागरातील एक एक लाट गांधीला धुवून काढत होती. त्यांच्या आजपर्यंतच्या जी हुजूरी करणा-यानी तयार केलेल्या प्रतिमेला बाबासाहेबानी खडे चारले, सार मुखवटे उतरविले. शब्दाच्या तलवारीला जेव्हा ज्ञानाची जोड लाभते तेंव्हा अंहकार सपासप कापुन काढला जातो. आज ईथे हे अत्यंत मोठ्या प्रमाणात चालु होते. गांधीजी नुसतं बघत राहिले होते. बाबासाहेबांचा विविध विषात चतुरस्त्र वावरण्याचं कौशल्य पाहून गांधी स्तब्ध झाले. मोठ मोठी आव्हानं लिलया पेलण्याची अमर्याद क्षमता मणिभवनाच्या खिडक्या, दरवाजातून आज ओसंडून वाहत होती. तिथेल्या लोकांसाठी हा ज्ञानाचा अपूर्व सोहळा दिपून टाकत होता. अन बाबासाहेबानी गांधीच्या पुढे आजुन एक महाभयंकर प्रश्न ठेवला.

“मुसलमान, शिख, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक अस्पृश्यांच्या तुलनेत बराच पुढारलेला व सुधारलेला आहे. त्या तुलनेत अस्पृश्य अत्यंत मागासलेला आहे. या इतर समाजाचे राजकीयदृष्ट्या स्वतंत्र अस्तीत्व पहिल्या गोलमेजने मान्य केले आहे. त्याच प्रमाणे अस्पृश्यांनाही अल्पसंख्यांकात अंतर्भूत करण्यात आले आहे. आता राजकीय दृष्टा हे अस्पृश्यही मुसलमान व शिखा प्रमाणे स्वतंत्र अस्तित्व मिळवून बसले आहेत. आम्हाला सवलती व पुरेशे प्रतिनिधीत्व मिळावे याची शिफारस केली आहे. या विषयी आपल्याला काय वाटते?”
बाबासाहेबानी गांधीच्या डोक्यावर हा अनुबॉंम्ब टाकला. खरं तर हे डिवचण्याचं काम होतं. पण यावर गांधीची प्रतिक्रिया काय येते हे बघण्याची हि सर्वोत्तम वेळ होती. हा प्रश्न टाकुन बाबासाहेबानी गांधीच्या मुद्रेवरील भाव हेरण्याचा प्रयत्न केला. पण गूढ ते गूढ...... कसली मुद्रा न कसले हाव भाव........ सगळं निश्चल.
गांधीजी- अस्पृश्य समाज हा हिंदु समाजाचा अभिन्न अंग असल्यामुळे मी त्याना वेगळं समजत नाही. मी त्याना हिंदुपासुन वेगळे करण्याच्या विरोधात आहे. त्याना राखीव जागा देण्यालाही मी अनुकूल नाही.

गांधीना अंदाज नव्हता ते काय बोलत होते. अन बाबासाहेबांचे काम झाले होते. गांधीजे हेच मत आजमावण्यासाठी बाबासाहेबानी तो प्रस्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटाने गांधीची घालमेल झाली अन त्यानी विरोधाचा निर्णय सुनावुन टाकला. हे ऐकल्यावर बाबसाहेब तडक उठतात अन गांधीच्या नजरेस नजर भिडवुन निर्भेडपणे म्हणतात, “बरे झाले खुद्द तुमच्या तोंडुन मला हे कळाले. आता तुमच्या सोबत एक शब्दही बोलण्यासारखे काही राहिले नाही. रजा घेतो.”

गांधी हे त्या वेळचे हिंदि राजकारणातील एक बलवान, मुत्सद्दी, अत्यंत शक्तिमान अन सर्वात मोठा जनाधार लाभलेले अनभिषिक्त राजे होते. अशा नेत्याशी आज बाबासाहेबानी युद्धाची घोषणा केली. मणिभवन ईथे बाबासाहेबानी गांधी-आंबेडकर युद्धाची सलामी तोफ डागली. या तोफेचा प्रतिध्वनी लंडनच्या दुस-या गोलमेज मधे उठणार होता. आता हे युद्ध अनंतकाळापर्यंत चालणार होते. निर्भेड व्यक्तिमत्व अन बाणेदारपणाचा असा नमुना गांधीनी उभ्या जन्मात बघितला नव्हता. बाबासाहेबाच्या रुपात उभं ठाकलेलं हे आव्हाहन गांधीला उभ्या आयुष्यात पुरुन उरणार होतं.
१५ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब एस. एस. मुलतान या बोटीने दुस-या गोलमेज परिषदेसाठी रवाना होतात. बोटीत सर प्रभाशंकर पट्टणी भेटले. त्यानी काल गांधीशी झालेल्या चर्चेतील बाबासाहेबांच्या संवादाचे संदर्भ देऊन असे म्हटले की महान विभूतींशी अनादराने बोलणा-यांची जिभ छाटावी असे आमचे हिंदु शास्त्र सांगते अन तुम्ही जेंव्हा काल गांधीशी बोलत होतात तेंव्हा तुमची जिभ छाटावी असे वाटले. पट्टणींचे हे तेजोभंग करणारे वाक्य ऐकुन बाबासाहेब रागावण्या ऐवजी हासतात अन उलट प्रश्न विचारतात.

“काय हो सर..... तुमच्या या धर्माप्रमाणे ढोंग्याचे व खुशमस्क-याचे काय छाटावे असे सांगितले आहे ते कळेल का?”

खवचटपणाला अतीखवचटपणे उत्तर देण्यात बाबासाहेबांचा हतखंडा होता. सर साहेब आडवेच झाले अन पुन्हा कधी वाट्याला गेले नाही.

जवळपास भारतातील सर्वच प्रतिनिधी गोलमेजसाठी रवाना झाली होती. पण गांधी मात्र आजुन गूढ वलयांची उंची वाढवुन कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढवित होते.

0 comments:

Post a Comment