About

Searching...
Thursday 5 July 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)

July 05, 2012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)
आता बहिष्कृत हितकारिनी सभा जोमाने कामाला लागली. सगळे कार्यकर्ते उत्साहाने समाज कार्यांत गुंतुन गेली. जाने-१९२५ ला सोलापुरात ब.हि.स. चे पहिले वहिले वसतीगृह चालु झाले. जीवप्पा सुभाना कांबळी हे या वसतीगृहाचे पर्यविक्षक म्हणुन नेमण्यात आले. आता सोलापुरच जिल्ह्यातिल बहिष्कृत मुलांचा अंशता का होईना पण शिक्षणाचा प्रश्न सुटला होता.
सरस्वती विलास:
याच दरम्यान ब. हि. स. नी एक मासिक काढलं, त्या मासिकाचं नाव होतं “सरस्वती विलास” या वेळेस बाबासाहेब हिंदु होते. ते स्वत:ला हिंदु मानत. त्यांचा विरोध जातियवादाला होता. आजुन तरी ते हिंदु धर्माचाच भाग होते. ते फार धार्मिक वृत्तीचे होते अन हिंदु देव देवतांचा त्यांच्यावर जरी प्रभाव नसला तरी संस्कृतीचा प्रभाव होता. त्याचाच प्रतिबिंब म्हणुन ब.हि.स. च्या मासिकाचे नाव देवीच्या नावावर असल्याचे दिसते. या मासिका द्वारे तरुणांमधे जागॄतीचे व अभ्यासाची गोडी वाढविण्याचे काम केल्या जाई. सामाजिक व राजकिय जागृतीचा प्रासार करण्यासाठी हे मासिक अत्यंत महत्वाचं काम बजावत होतं. त्याच बरोबर तरुण व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा अन वाचनालये सुरु करण्याचं काम ब.हि.स. नी चालविले होते.
महारांचा हॉकी क्लब:
महार ही एक अशी जात होती की ज्यांच्या अंगी विविध कला गुण लोटांगण घालत. महार शुर होते. रणांगणात महारासारखी मर्दुमकी कुणीच गाजवित नसे. तसेच शिक्शणात सुद्धा महार अत्यंत बुद्धीवान म्हणुन वेळोवेळि आपली प्रतिभा दाखविली पण जातियवादी यंत्रणेने नेहमीच महारांचा धर्माच्या नावाने बळी घेतला. अन याच प्रमाणे क्रिडा क्षेत्रातही महार अत्यंत निपुन होते हे बाबासाहेब चांगले ओळखुन होते. महारांच्या मुलांतील क्रिडा प्रतिभा खुलावी म्हणुन बाबासाहेबाना महारांचा हॉकी क्लब स्थापन केला. आता मात्र महारांची मुलं हॉकी खेळ खेळू लागली. दिवसभर ईकडे तिकडे टवाळक्या करत हिंडणा-या रिकाम टेकड्या मुलांची संख्या हॉकीच्या मैदानात सराव करताना दिसू लागली. रात्री बे रात्री नाक्यावर बसुन चकाट्या पिटणारी पोरं आता हॉकीच्या गप्पा करु लागली. एकंदरीत टुकारपणा कमी झाला. महारांच्या पोराना आता नवि दिशा मिळाल्याने त्यांचा इतर ठिकाणचा वावर कमी झाल अन क्रिडा विश्वात ते रमु लागले.
आता जिल्ह्या पातळीवर जागो जागी ब.हि.स. च्या सभा भरु लागल्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद असायचा. खेडया पाड्यातुन लोकं या सभाना हजेरी लावत असत. बाबासाहेबांचा नाव आता बहिष्कृत लोकांशी कधी न तुटणारी नाड बनुन जुडत होता. लोकांच्या हृदयावर आंबेडकर हे नाव युगा युगांसांठी कोरलं जाऊ लागलं. एकंदरीत अस्पृश्यांमधे नवचैतन्याचे वारे वाहु लागले. जिल्हा पातळीवरच्या सभा आता तालुका पातळीवर येऊन धडकु लागल्या. ज्याना जिल्हा पातळीच्या सभाना जायला जमत नसे अशाच लोकांची संख्या जास्त होती. याचा परिणाम तालुका पातळीवरच्या सभाना तोबा गर्दी होत असे. जिकडे तिकडे अस्पृश्यांच्याच चळवळीचा डंका वाजत होता. अशा प्रकारे बहिस्कृत हितकारिनी सभा आपल्या कामाच्या कक्षा तुफान गतिने विस्तारत होती.
रॉयल कमिशन समोर साक्षी:
१५ डिसेंबर १९२५ रोजी रॉयल कमिशनने बाबासाहेबाना साक्षी देण्यासाठी बोलावले होते. बाबासाहेबांचा आधिपासुनच इंग्रजी चलन पद्धतिवर रोष होता. त्यानी इंग्लडला सादर केलेल्या आपल्या प्रबंधातुन तसा विरोधही दर्शविला होता. आज पुन्हा एकदा त्याना ईथे साक्षी देण्यासाठी बोलविण्यात आले होते. ईथेही बाबासाहेबानी आपला विरोध दर्शविला. ब्रिटीश चलन पद्धतीमुळे भारतिय सुवर्णसाठ्यावर जो परिणाम होतो त्या बद्दल बाबासाहेब फार चिंतीत होते. बाबासाहेबानी सुवर्णपरिमाणाला कडाडुन विरोध केला. इंग्रचांना याचं फारसं नवल वाट्लं नाही. आता पर्यंतचा बाबासाहेबांचा इंग्रजांविरोधचा रोख बघता त्याना या पेक्षा फार वेगळं अपेक्शित नव्हतं. ईथे आज इंग्रजांशी बोलणारा विद्वान हा असुपृश्यांचा नेता नव्हतात. आज या कमिशनपुढे बोलणारा हा माणुस या भुतलावरील एक महान विद्वान होता. विद्वानाशी एकरुप झालेला देशभक्त इंग्रजांअर गरजुन बाहेर पडला.
याच दरम्यान भारताच्या काना कोप-या पर्यंत खडबळ माजवुन देणा-या दोन अत्यंत महत्वाचा घट्ना दक्षीणेत तेंव्हाच्या मद्रास प्रांतात घडल्या. आज बाबासाहेबांची चळवळ ईकडे नावा रुपाला येत होती. अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करुन देण्यात बाबासाहेब अत्यंत वेगने प्रगती करत होते. महाराष्ट्रातुन अस्पृश्य निवारणाचे जे वारे वाहु लागले ते पार भारताच्या सगळ्यात खालच्या राज्यात मद्रास पर्यंत जाऊन धडकले होते. प्रत्येक अस्पृश्यानी आता मोकळा श्वास घेण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली होती. अस्पृश्यांना आता नविन स्वप्ने पडु लागली होती. प्रत्येकाच्या स्वप्नाचा नायक आंबेडकर नावाचा महान विद्वानच असायचा. याच धामधुमीत मद्रास राज्यातिल अस्पृश्यानी ब्राह्मणांच्या विरोधात जाहिरपणे दंड थोपटुन रणांगणात उडी घेतली.
त्रावणकोर संस्थानातील वायकोम ह्या गावातील मुख्य रस्त्यांवर ब्राह्मणांची घरे होती. या गावातील अस्पृश्याना मुख्य रस्त्यातुन माण्यास मज्जाव होता. अस्पृश्यानी आजवर हे सगळं नियतीची करणी म्हणुन स्विकारलं होतं. देवानीच आपल्याला अशा निच जातित जन्मास घालुन हि शिक्षा ठोठावली आहे अन ती आपण मुकाट्यानी सहन करायची, आपला तो अधिकारच नाही. त्या मुख्य रस्त्यावर ब्राह्मणांचाच अधिकार आहे हे मान्य करुन जगण्यातच धन्यता मनली जाई. पण आता मात्र देवाचं अस्तित्व नाकारणारा महामानव या भुतलावर धुडगुस घालत होता. संस्कृतीच्या भिंतीची विट न विट वाजविणारा महाबली ईथे अस्पृश्यांच्या बाजुने उभा ठाकलेला होता. तुम्ही गुलाम नाही सलामाचे मानकरी आहात हि भावना एक एक माणसा मधे पक्की रुजविण्याचे काम करण्यात येत होते. अन यातुनच वायकोम येथील अस्पृश्यानी हा मुख्य रस्ता खुला करण्यासाठी श्री. रामास्वामी नायकर यांच्या नेतृत्वाखाली या सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. देशभरातील संवर्ण मात्र खडबळुन जागे झाले. अस्पृश्यानी गावातिल मुख्य रस्त्याची मागणी करणे हे संवर्णांना अमान्य होते. देशाच्या कानाकोप-यातील संवर्णानी याचा विरोध केला. मद्रासला जाऊन अस्पृश्यांचे हाल करता येईना, पण याचा सुड जवळच्या अस्पृश्यांवर उगविला जाऊ लागला. देशात जिकडे तिकडे अस्पृश्यांचे हाल बेहाल चालु होते. जे संवर्ण मोठ्या मनानी मेहरबानी म्हणुन पाणवठयावर अस्पृश्याना पाणि भरण्याची परवानी देली होती अशा कित्येक पाणवठ्यांवर परत बंदी घालण्यात आली. अस्पृश्य समाजाला माज आल्याच्या गोष्टी होऊ लागल्या. बंडखोरी कुठल्याही परिस्थीतीत खपुन न घेता अस्पृश्याना त्यांची जागा दाखविली जावे असा एकंदरीत सुर येत होता.
देशभर अस्पृश्यांच्या विरोधात संवर्णानी सुद्धा दंड थोपटले. सगळ्या जिवनावश्यक यंत्रणेचा स्वामी हा संवर्णच असल्यामुळे अस्पृश्यांचे जिकडे तिकडे हाल बेहाल सुरु झाले. श्री. रामास्वामी नायकर वर सत्याग्रह मागे घेण्याचा दबाव वाढविण्यात आला. पण ते रामास्वामी होते त्यानी कुठल्याच दबावाला न जुमानता सत्याग्रह चालु ठेवला. आता पावसाळा सुरु झाला. जिकडे तिकडे पाणिच पाणि. नद्या नाले भरुन वाहु लागले. पावसानी अधिक जोर वाढविला अन गावात पुर आले. आता तरी हा सत्याग्रहाचा बट्ट्याबोळ होईल म्हणुन संवर्ण सुखावला पण पुढे उभा ठाकलेला अस्पृश्य अशा लहान सहान अडचणिना सहज झेलण्याची क्षमता बाळगणारा समाज होता. सत्याग्रच चालुच होते. या सत्याग्रहाचा डंका महाराष्ट्रात वाजु लागला. अस्पृश्यांच्या सत्याग्रहात भावनांचा उद्रेक असा काही झाला की, तिथुन हजारो कोस दुर बाबासाहेबांच्या भुमीतील दोन समाज सेवक कर्मवीर शिंदे अन आचार्य भावे हे वायकोमला जाऊन पोहचले. आता सत्याग्रहाला आजुन दोन महान लोकांची साथ लाभताच अधिक जोर चढला अन शेवटी अस्पृश्यांचा विजय झाला. गावातिल मुख्य वाट अस्पृश्यांसाठी उघडण्यात आली. ब्राह्मणांच्या घराच्या बाजुनी असणा-या या वाटुवरुन आता अस्पृश्य निशंकोच चालु लागला अन अशा प्रकारे देशातील एक महत्वाची अस्पृश्य चळवळ आपली ताकद सिद्ध करुन विजयाच्या सिंहासनावर विराजमान झाली. आता हा सिंहासन देशभर भ्रमण करणार होता.
दुसरी घटना सुद्धा याच मद्रास प्रांतातील आहे. मद्रास हे त्या काळातिल सनातनवाद्यांचे रोम होते. रोम जसे कट्टरवादयांचे प्रतिक आहे अगदी तसेच मद्रासचे होय. या प्रांतातील संवर्ण हे फार कट्टर अन जातियवादी. ईथे संवर्णानी हजारो वर्षांपासुन लोकांचा नुसता छळ चालविलेला नव्हता तर अत्यंत अमानुष वागणुक दिली होती. पण बाबासाहेबांचे परिवर्तनाचे वारे ईथे येऊन नुसते धडकलेच नव्हते तर तरुणाना गदागदा हलवुन या व्यवस्थेविरोधात बंड करुन उठण्यास प्रवृत्त करत होते. याचाच एक नमुना उभ्या भारतानी बघितला. मुर्गेसन नावाच्या एका तरुणानी सारे जातिय निर्बंध तोडुन थेट एका हिंदु मंदिरात प्रवेश केला. अस्पृश्याना आज पहिल्यांदाच संवर्णांच्या देवाचे दर्शन घेतले अन आपण असल्या नालायक जातिय निर्बंधाना मानत नाही असे जाहिर केले. पण सनातन्यानी मात्र याच्या विरोधात दंड थोपटले. त्याला थेट न्यायालयात खेचण्यात आले अन समस्त मानवी जीवनाला लाजविणारा न्यायालयीन निर्वाळा येतो व उभा देश हादरतो. मुर्गेशनला न्यायालयाने दोषी ठरविले अन शासन केले. हि बातमी भारतातील प्रत्येक अस्पृश्याला चवताळुन उठण्याचा व बंड करण्याचा आदेश देणारा संदेश घेऊन आली होती. आता आजुन वाट न बघता संवर्णांशी दोन हात करण्यास प्रत्येकानी पेटुन उठावे असा संदेश उभ्या भारतातील अस्पृश्यांच्या रक्तात क्रांतीची फुंकर घालत देशभर पसरत होता.
याच दरम्यान बाबासाहेबांकडे एक गोड बातमी होती, त्याना पुत्ररत्न झाला. त्याचे नाव राजरत्न ठेवण्यात आले. बाबासाहेब व माई फार आनंदी होती. घरी अगदी सगळीकडे याचा धुडघुस असे. हा मुलगा जसजसा मोठा होत गेला तसा त्याचा खट्ट्याळपणाही वाढला. पण बाबासाहेबाना मात्र याच्यावर अत्यंत प्रेम होते. बाबासाहेब आता कामावरुन लवकर घरी परतु लागले. एकदा विचारल्यावर ते राजरत्नसाठी घरी लवकर आल्याचं सांगतात. एकंदरीत या मुलामधे त्यांचा खुप जीव होता. पण नियतीने परत एकदा त्यांच्या डोक्यात डोंगर घालावा तसा वार केला. राजरत्नचा मृत्यु झाला. आता मात्र बाबासाहेब मनातुन खचुन गेले. १९ ऑगस्ट १९२६ ला आपले परम मित्र दत्तोपंत पवार (कोल्हापुरचे) याना या संदर्भात बाबासाहेबानी एक पत्र लिहले. त्यात ते म्हणतात की आजवर तिन मुले व एक मुलगी गमावलो. पण यावेळेस मात्र आम्ही दोघेही नवरा बायको पार खचुन गेलो. राजरत्नच्या जाण्यामुळे मला सुद्धा कशातच मन लागत नाही. हे जीवन आता निरस झाले आहे. असा त्यांचा पत्र आहे.
वकिली अन पहिले यश:
राजरत्नच्या जाण्याचे दु:ख फार दिवस करता येणार नव्हते. बाबासाहेबानी परत उठुन काम सुरु केले. आता अस्पृश्य निवारनाचे वारे जिकडे तिकडे वाहु लागले. कार्यकर्त्यांमधे उत्साह ओसंडुन वाहत होता. प्रत्येक तरुण अस्पृश्य निवारनाच्या स्वप्नानी झपाटलेला होता. आजची आंबेडकर चळवळ ही त्या वेळच्या चळवळीशी कधीच बरोबरी करु शकणार नाही. तेंव्हा आमच्या बांधवांच्या मुलभुत हक्कावर मनुने अटकाव घातला होता. अन जिथे अटकाव आहे तिथे क्रांती फार वेगाने होते. या काळात म्हणुनच चळवळ अत्यंत वेगाने उभी झाली.
ऑक्टो-१९२६ पुण्यातिल बागडे, जेधे अन जवळकर या तिन ब्राह्मणेत्तर समाज सेवकाने ब्राह्मणांचे वाभाळे काढणारे एक महान क्रांतिकारक पुस्तक लिहल्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्यातील ब्राह्मणानी न्यायलयात दावा ठोकला. या तिघानी “देशाचे दुश्मन” नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. त्या पुस्तकामधे देशाची हानी करण्याचे सगळे कारस्थान ब्राह्मणानी केले व ब्राह्मणांमुळे या देशाची नेहमी विविध आघाड्यांवर पिछेहाट तर झालीच पण गुलामीही लादली गेली असा निष्कर्ष काढण्यात आला होता. या पुस्तकामुळे ब्राह्मणांच्या विरोधात इतरांची मोर्चेबांधणी बळकट होऊ लागली. त्यामुळे ब्राह्मणानी या तिंघावर सुड उगविण्यासाठी त्यांच्यावर खटला दाखल केला.
फिर्यादी पक्षाचे वकिल होते पुण्यातील नामवंत विधितज्ञ ल. भ. भोपटकर. भोपटकरांचा विधीक्षेत्रातील दरारा पाहता कोणी त्यांच्या पुढे उभा राहण्याची हिम्मत करीत नसे. आता या तिघांची पंचायत झाली होती. अन त्याना कळले की मुंबईत एक तरुण राहतो ज्याचे नाव आहे भीमराव आंबेडकर. तोच या भोपटकराला सडेतो उत्तर देऊ शकेल असे कानी पडले अन हे तिघे बाबासाहेबाना शोधत मुंबत आले.
जेंव्हा त्यानी बाबासाहेबाना बघितलं तेंव्हा हा तरुण मुलगा आपली केस जिंकणार की नाही याची शंका आली पण त्यांच्याशी प्रत्येक्ष बोलल्या नंतर जवळकरांचं मतपरिवर्तन झालं. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दातुन ओसंडुन वाहणारे ज्ञानचे हजारो झरे व बुद्धीमत्तेचे कारंजे अन बाबासाहेबांच्या एकुन हालचालितुन घडणारा तो ज्ञानोत्सव बघुन योग्य व्यक्ती गाठल्याची खात्री झाली अन त्यानी लगेच बाबासाहेबाना आपले वकिल पत्र दिले.
आता बाबासाहेबांपुढे भोपटकराना हरवुन आमली अमिट छाप विधीच्या दुनियेत सोडायची एक संधी होती. पण भोपटकर मात्र या मैदानातील एक महान खिलाडी होता. सहजासहजी पराभव खाणारा तो माणुस नव्हतात. बाबासाहेबानी सर्व शक्ती पणाला लावुन कुठल्याही किमतीत हि केस जिंकायचीच असा निर्धार केला अन शेवटी भोपटकराला चित करुन विजय मिळविला. या विजयानी बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला एक वेगळे वळण मिळाले. आता ते एक दमदार वकिल म्हणुन नावा रुपाला आले.

0 comments:

Post a Comment