About

Searching...
Sunday 15 July 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २०

July 15, 2012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पहिली)
सायमन कमिशनचा प्रतिवृत्तांत आला:
ईकडे नाशीकात जरी काळाराम मंदिराचा सत्याग्रह जोरात चालु होता तरी राजकीय पातळीव घडणा-या घडामोडींवर बाबासाहेब नजर ठेवुन होते. सायमन समिती लवकरच आपला प्रतिवृत्त सादर करणार होती व त्या मधे अस्पृश्यांच्या पदरात काय पडले हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेब अत्यंत आतुर झाले होते. अखेर मे १९३० सायमन समितीने आपला प्रतिवृत्त जाहिर केला. भारतातील निवडणुकीमध्ये जातवार मतदार संघ ठेवण्याची शिफारस केली. हिंदुना मध्यवर्ती विधीमंडळात २५० पैकी १५० जागा मिळणार होत्या. अस्पृश्य हिंदुना संयुक्त मतदार संघात राखीव जागा देण्यात आल्या. परंत अस्पृश्य वर्गातील उमेदवारांची निवडणुकीस उभे राहण्याची पात्रता ठरविण्याचा अधिकार राज्यपालाना देण्याचा मुर्खपणा या सायमन समितीनी केला होता.
८ ऑगस्ट १९३० रोजी नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भूषविले. ब्रिटिशांवर कडाडुन टिका केली. ब्रिटिशांमुळे स्वातंत्र्य, समता व बंधुता रुजविण्यात जरी मदत होत असली तरी स्वराज्य हवेच आहे. कारण ब्रिटिशांच्या काळात सगळ्यात जास्त म्हणजेच मागच्या एका शतकात ३७ दुष्काळ पडले व तीन कोटीहुन अधिक लोकं भुकेनी मेलीत. आपला व्यापार ईथे अनंतकाळ चालु ठेवण्यासाठी भारतात औद्योगीक क्रांती होऊ न देण्याची ब्रिटिशांची निती आपल्या पदरी दारिद्र्य टाकुन जात आहे. त्यांचा माल ईथे खपावा म्हणुन ईथली बाजारपेठ कायम इंग्लडच्या उत्पादनावर निर्भर राहिल अशी निती राबविण्यात येत आहे. ब्रिटिशांच्या दोन मुख्य देणग्या आपल्याला लाभल्या आहेत. एक विधीपद्दत व दुसरी सुव्यवस्था. पण जगण्यासाठी या पलिकडेही काही गरजा असतात हे ब्रिटिश सरकार विसरले दिसते किंवा हेतुपुरस्सरपणे त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न लागते व त्याचे बळकट नियोजन फक्त स्वराज्यानेच शक्य आहे. ईथले दारिद्र्य नको असल्यस स्वराज्य मिळविणे गरजेचे आहे. अशा प्रकारे ब्रिटिशांवर ताशेरे ओढुन सायमन कमिशनच्या मुर्खपणाचे वाभाडे काढले. आज पर्यंत बाबासाहेबांचा असाच आग्रह होता की ब्रिटिशानी स्वातंत्र्य समता व बंधुभाव राबविण्याआधी सनातन्यांच्या हाती सत्त्ता देऊ नये. कारण एकदा का सत्ता सनातन्यांच्या हाती पडली की अस्पृश्यांच्या वाट्याला काहिच येणार नाही हे उघड होते. सायमन कमिशनमुळे नाराज होऊन बाबासाहेबानी स्वराज्याची भाषा बोलुन गेले. या परिषदेत बाबासाहेबानी आजुन एक आरोळी फोडली, काही झाले तरी हिंदु सोडणार नाही. बाबासाहेबानी ब्रिटिसांचा समाचार घेतल्याचे पाहुन ’केसरी’ ने टोमणा मारला की सिझरवर त्याचा मित्र बृटश उलटला तसे बाबासाहेब आपल्या मित्रावर (ब्रिटिशांवर) उलटले.
सायमन कमिशनने केलेल्या शिफारशी नुसार भारतातील विविध पुढा-याना इंग्लडमधे भारतीय कायद्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी बोलावण्यात आले. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन बाबासाहेब व रावबहाद्दुर श्रीनीवासन याना आमंत्रण देण्यात आले. ६ सप्टेबर १९३० रोजी गव्हर्नर जनरल कडुन गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले. आज सोनियाचा दिनु होता. ज्या अस्पृश्याना हिंदु लोकांनी सदैव दास्यात खितपत ठेवले त्यांच्या प्रतिनिधीला ब्रिटिश सरकारकडुन मिळालेलं आमंत्रण हि एक अपूर्व अशी ऐतिहासिक घटना होती. आता ब्रिटनच्या गोलमेज परिषदेच अस्पृश्यांच्या किंकाळ्यांचा प्रतिध्वनी गुंजणार होता. अत्यंत टोकाला जाऊन अस्पृश्यांच्य व्यथा मांडण्यासाठी सर्व आघाड्यांवर शत्रुला पुरुन उरेल असा महानायक एका ऐतिहासीक कामाची सिद्धता करु लागला. अस्पृश्यांना गुलामगिरीतुन मुक्त करण्याच्या दिशेने राणीच्या देशातुन आलेल्या या हाकेला ओ देऊन दलितांचा पुढारी युद्धास युद्धास सज्ज झाला.
४ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब ’व्हॉइसरॉय ऑफ इंडिया” या बोटीने मुंबईहुन लंडनला निघाले. याच काळात भारतात गांधीजीनी असहकारतेची चळवळ संपुर्ण ताकत लावुन उभी केली. ब्रिटिशाना सळो की पळो करणारी असहकारतेची चळवळ अत्यंत प्रखरतेने चालविण्यात सर्व शक्ती एकवटुन कामाला लागल्या मुळे व सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यामुळे गांधी या गोलमेज परिषदेस गेले नाही. कॉंग्रेसी पुढा-यानी गोलमेजवर बहिष्कार टाकला होता. असहकाराचा वणवा देशभर पसरत होता अन अशा वेळी कॉंग्रेसेत्तर, मुस्लिम व अस्पृश्य पुढा-यानी ब्रिटिशाशी सहकार्य करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे गांधीवादी आजुन भडकले. गांधीवादी सोडता इतर सगळे गो-यांचे हस्तक असल्याचं बोललं जाऊ लागलं. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा आपल्या ’इंडियन स्ट्रगल’ नावाच्या ग्रंथात बाबासाहेबाना ब्रिटिसांचा हस्तक म्हणतात. १८ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब लंडनला पोहचतात. परिषद सुरु व्हायला आजुन २४ दिवस बाकी होते. तो पर्यंत बाबासाहेबानी तेथील पुढा-यांच्या, पत्रकारांच्या भेटी गाठी घेऊन अस्पृश्यांची इंत्यंभूत माहिती दिली. अस्पृश्याच्या बाजुने सगळ्या ब्रिटिशाना झुकतं माप देण्यास भाग पाडणारी सगळी युक्ती लढवुन आपली बाजु भक्कम केली. प्राथमिक पातळीवर दलितांची बाजु मांडताना मिडीया व सभागृहातील नामी सदस्यांना प्रत्यक्ष भेटून विनवण्या केल्या, वेळप्रसंगी कित्येकांची मनधरणी केली. पराकोटीचे कष्ट उपसुन दलितांची बाजू मांडण्याचे सर्व प्रयत्न केले, परिषदे पुर्वी दलितांच्या बाजुने एकुणच झुकतं माप मिळणार याची भक्कम पायभरणी बाबासाहेबानी करुन ठेवली.
१२ नोव्हे. १९३० रोजी गोलमेज परिषद (पहिली) सुरु झाली. ब्रिटिशानी या परिषदे बद्द्ल दाखविलेल्या अत्यंत कुतुहलाचे व उत्सुकते परिणाम असे झाले की परिषदेकडे जाणा-या सर्व रस्त्यांवर ब्रिटिश नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेनी ब्रिटिशानी तुफान गर्दी करुन परिषदेच्या मार्गावर आपली उपस्थीती दाखवुन उत्सुकता प्रकट केली. परिषदेचे उदघाटन करताना इंग्लडचे महाराजे पंचम जॉर्ज म्हणाले, “हि परिषद अपूर्व अशी असुन त्यातिल प्रतिनिधींची नावे भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरानी नोंदली जातील.” रॅम्से मॅकडोनाल्ड यांची परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड होते अन परिषदेस सुरुवात होते.
गोलमेज परिषद म्हणजे म्हणजे भारतीय घटना तयार करण्यासाठी नेमलेली घट्ना समिती नव्हती. भारतीय पुढा-यांचे, संस्थानिकांचे मत आजमावण्यासाठी व त्यावर ब्रिटिशांच्या प्रतिनिधी मंडळाने योग्य निर्णय देण्यासाठी विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा करावयास बोलाविण्यात आलेली परिषद होती. परिषदेत सप्रु, जयकर, मुंजे, जिना, बिकानेरचे महाराज अशा अनेक भारतीय मुत्सद्यांचे तडाखेबंद अन कळकळीचे भाषण केले. एका मागुन एक भारतीय पुढारी व संस्थानीक उभे राहुन आपले मत मांडु लागले. अन तेवढ्यात एक तरुण उठुन उभा राहतो. सुदृढ बांधा, दणकट अंगकाठीचा, सर्वोत्तम पेहराव अन चेह-यावर झडकणार तेज ज्यात सारी सभा न्हाऊन निघाली असा त्या शतकाचा महान विद्वान आता भाषणासाठी उभा झाला होता. अख्ख्या सभागृहात अर्थशास्त्रत, राज्यशास्त्र, समाज शास्त्र अशा अनेक विषयात ज्याच्या तोडीचा कोणीच नव्हता अशा या महामानवाचं नाव होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बुद्धी वैभवानी झडाडलेली मुद्रा बघुन सभेतील सर्व सदस्यांचे डोळे दिपून गेले. नजरेतील आत्वविश्वास असा काही अबोल गरजत होता, ज्याचा प्रतिध्वनी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवुन गेला. अखंड विद्यार्जन व अविश्रांत परिश्रमाने बुद्धिची कांती ईतकी सतेज झाली होती की नजरेच्या टप्प्यात आलेले दगड धोंडे सुद्धा लख्ख लख्ख झडाडुन निघाले. ज्याचा जन्म टाकुन दिलेल्या समाजात झाला त्याने केवळ बुद्धीच्या बळावर आज चिखलातुन उठुन ब्रिटिशांच्या गावी, हिंदुंच्या मांडिला मांडी लावुन बसण्याची गुणवत्ता खेचून आणली. अन ते भाषणास सुरुवात करतात.
“ज्या लोकांची स्थिती गुलामांपेक्षा वाईट आहे, आणी ज्यांची लोकंसंख्या फ्रान्स या देशातील लोकसंखेएवढी आहे. भारतातील या एकपंचमांश लोकांची गा-हाणी मी परिषदेपुढे मांडत आहे. अन बाबासाहेब बॉंम्ब टाकतात. भारतातील सरकार हे लोकानी लोकांसाठी चालविलेले सरकार असावे. (सर्व सभा अवाक होते, बाबासाहेबाना ब्रिटिशांचा बगलबच्चा म्हणणारे आश्चर्याने बघु लागता, सारा सभागृह स्तब्ध होऊन हे काय मागितलं म्हणुन आश्चर्यानी बाबासाहेबांवर नजर रोखतो. हा देशभक्तीचा असा नमुना होता ज्याच्या पुढे स्वत:ला देशभक्त म्हणुन मिरविणा-या सर्व नेत्यानी एक मताने बाबासाहेबांच्या हाती सत्ता सुपुर्द करुन मुत्सद्दीपणाचे नमुणे पाहायला हवे होते.) ते पुढे म्हणाले, “ अस्पृश्य वर्गामधे हे आश्चर्यकारक स्थित्यांतर घडून येण्यास ब्रिटिश सरकारच जबाबदार आहे. ब्रिटिश राज्य येण्या आधी माझ्या समाजाची जी परिस्थीती होती त्यात काडिमात्र बदल झालेला नाही. आज तुमच्या राज्याला सव्वाशे वर्ष उलटुन गेली तरी आमची गुलामी तशीच आहे. पुर्वी आम्हाला विहिरीवर पाणी भरायला मनाई होती, आजही आहे. पुर्वी आम्हाला मंदिर प्रवेश बंदी होती, आजही आहे. पुर्वी आम्हाला पोलिस दलात प्रवेश नव्हता, आजही नाही. पुर्वी आम्हाला सेनेत घेत नव्हते, आजही नाही. अशा अनेक मुलभूत प्रश्नाची उत्तरे मी आजही नकारात्मक देतो. याचा अर्थ असा आहे की ब्रिटिशानी समतेचा जो तोरा मिरविण्याची सोंग दाखविली आहेत ती साफ खोटी व फसवी आहेत. म्हणुन आज अस्पृश्यांला वाटु लागले आहे की स्वराज्य मिळायला हवे. ब्रिटिशांपेक्षा लोकानी लोकांसाठी चालविलेले राज्य यायला हवे. हि मागणी मुळात आकार घेण्याचे कारणच आहे ब्रिटिशांचा पक्षपाती राजकिय धोरण अन समतेचा सोंग. असे हे निष्क्रिय सरकार काय कामाचे, ज्याना सव्वाशे वर्षात इतका मुलभुत प्रश्न हाती घ्यावा असे वाटले नाही त्याना राज्य करण्याचा खरच नैतीक अधिकार आहे का याचं त्यानी आत्मचिंतन करुन बघावं. (हिंदु प्रतिनिधिंची चुळबुळ सुरु झाली, बाबासाहेबानी गो-याचा समाचार घेताना जो विषय पुढे केला त्यावर सरकारची तारांबळ उडाली) भारतातील भांडवलदार किमान वेतन कामगाराना देत नाही. जमिनी शेतक-याना मिळत नाही, जमिनदारांचे शेतक-यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित होत आहेत. या आर्थीक पिळवणुकतुन मुक्त करण्यासाठी कायद्यात बदल करुन लोकाना दिलासा देण्याचा अधिकार सरकारला असुन सुद्धा तो वापरला जात नाही. अन हे सगळं का होत नाही तर हस्तक्षेपा नंतर होणा-या प्रतिकाराला घाबरुन........ असे भ्याड सरकार काय कामाचे. (सगळ्या गो-या साहेबांच्या माना आता खाली गेल्या होत्या, सगळ्यानी नजर जमिनीवर रोखुन बाबासाहेबांकडुन होणारा उद्धार झेलत होते) सध्या देशात तप्त वातावरण असल्यामुळे बळाचा वापर योग्य ठरणार नाही. स्वार्थी राज्यघटना मान्य होणार नाही. तुम्ही ठरवावे अन हिंदी लोकानी ऐकावे असा हा काळ नाही. आता काळानुरुप लोकांमधे बरीच जागरुकता झाली किंवा क्षणोक्षणी ती घडवून आणली जात आहे. याचा एकंदरीत परिणाम तुम्हाला माघार घेणारा असेल, त्यापेक्षा मोठ्या मनानी जनकल्याणाचे निर्णय घेऊन समता रुजविण्याचे काम करावे. (आज पर्यंत ज्या हिंदुनी फक्त महार म्हणुन बाबासाहेबाना हीन नजरेनी बघितले, त्याना बाबासाहेबांची खरी योग्यता आज दिसली. देशभक्तीचा असा हा उच्च कोटीचा नमुना पाहुन गांधीची चळवळ कवडीमोलाची वाटली असावी) ’इंडियन डेली मेल’ने असे प्रसिद्ध केले कि बाबासाहेबांचे हे भाषण म्हणजे वक्तुत्वाचा एक उत्कृष्ट नमुना होय. (Ref: Indian Round Table Conference, p 123-29)

या सभेत हिंदु लोकांमधे एक व्यक्ती मात्र कृतकृत झाली होती. चेह-यावर प्रसन्नता दाटुन आली. डोळे भरुन आले, आपल्या हातुन एक महान विद्वान घडविला गेल्याचा पुरावा मिळाल्यामुळे जन्म सार्थकी लागले अन डोळ्यातुन आनंदश्रू वाहू लागले. समाधान व कौतुकानी यांचे हृदय ओसंडून वाहु लागले. ते व्यक्ती होते बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड. बाबासाहेबाना विदेशात पाठविण्यासाठी मदत करणार हेच ते राजे. आज बाबासाहेबांचा भीमपराक्रम पाहुन ते धन्य झाले होते. बाबासाहेबाना शुभेच्छा देऊन जेंव्हा तिथल्या राजवैभवी निवासस्थानी जातात, तेंव्हा राणीला हि शुभवार्ता सांगुन महाराज म्हणतात, “आपले सारे प्रयत्न आणी पैसा सार्थकी लागला आहे. कार्य सिद्धिस गेले, या डोळ्यानी एका विद्वानाची वैभवशाली वाटचाल बघितली. हि माझ्या अयुष्यातील एक अपूर्व घट्ना होती.” अन याच खुषीत महाराजानी लगेच तिथेच बाबासाहेब व मित्रपरिवाराला एक मोठी मेजवाणी देतात अन मधल्या काळातील वियोग एकदाचा संपतो.

ईकडे २४ नोव्हे १९३० रोजी बाबासाहेबांच्या पुर्व आदेशानुसार बंद पडलेले बहिष्कृत भारत कात टाकुन ’जनता’ असे नाव धारण करते अन परत एकदा चळवळ लढविण्यास सज्ज होते. देवराव नाईक संपादक व भास्करराव कद्रेकर हे प्रकाशक व व्यवस्थापक म्हणुन काम पाहु लागतात. बंद पडलेल्या बहिष्कृत भारत व समता या दोन्ही पाक्षिकाच्या वर्गणीधारकाना वर्गणीचे पैसे फिटेस्तोवर जनताचा अंक देण्याचे ठरते. बाबासाहेब जरी विदेशात बसले होते तरी त्यांचे संपुर्ण लक्ष ईथे होते. गांधीवादयानी इंग्रजांच्या विरोधात लढा तीव्र केला होता. गोलमेजला गेलेल्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा गांधीवादयानी देशाच्या कान्याकोप-यातुन निषेध नोंदविला होता. या हेकट लोकांपासुन कसे सुरक्षित राहावे, लवकर घरी जावे, एकटे फिरू नये किंवा रात्री घरा बाहेर पडु नये अशा सुचनांचे अनेक पत्र बाबासाहेबानी शिवतरकर व कार्यकर्त्याना पाठविले होते.

ब्रिटन व अमेरीकी वृत्तपत्रांमधुन अस्पृश्यतेचा प्रश्न चव्हाटयावर ठेवला
बाबासाहेबांच्या भाषणातील अनेक मुद्दे इंग्लड व अमेरीकी पत्रकारानी छापले. खरं तर या पत्रकाराना सुद्धा हा मुद्दा निट माहित नव्हता. पण बाबासाहेबांच्या मुद्देसुद व सखोल अभ्यासाच्या बिनतोड मिश्रणाने आकार घेतलेली हि भाषणे अगद्या काही शब्दात अस्पृश्यांच्या गुलामीची गाथा अचुकपणे जगाच्या समोर मांडली जाऊ लागली. बाबासाहेबानी हि व्यथा मांडाताना मिळेल त्या मार्गाचा अचुक वापर केला. सुरुवातीला जे पत्रकार बेकींग न्युज म्हणुन बातमी घेत आता त्यांच्यातील मानवी मुल्ये त्याना बाबासाहेबांकडे खेचून आणु लागली. पत्रकारांच्या संवेदनशील मनाला बाबासाहेबांच्या थोरवीची ओळख होताच कर्त्यव्य बजावण्यासाठी कित्येक पत्रकारानी बाबासाहेबांच्या अस्पृश्य सेवेच्या कार्यात जमेल त्या परिने योगदान देण्याचा अखंड यज्ञ केला. सगळ्या वृत्तपत्रातुन, मासिकातुन, एकच चर्चा उडाली. अस्पृश्य नावाचा अमानुष प्रकार भारतात चालु आहे अन इंग्रजानी त्यावर उपाय योजना न योजल्यामुळे ब्रिटिश जनता लज्जीत झाली. सा-या जगातुन या अस्पृश्यतेचा धिकार करणा-या प्रतिक्रिया येऊ लागल्या. जिकडे तिकडे अस्पृश्यातेचा प्रश्न भारतीय संस्कृतीचे मुखवटे फाडत पसरत होता. कित्येक हिंदुना तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. संस्कृतीचा तोरा मिरविणा-या सनातन्यांचे चेहरे अता उघडे पडले होते. आता संपुर्ण जगाला कळुन चुकले की अस्पृश्य म्हणजे नेमका काय प्रकार आहे.
आपले ध्येय गाठण्यासाठी बाबासाहेबानी अस्पृश्यांसाठी मुलभूत हक्काची मागणी करणारा एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्याचे नाव होते, ’हिंदुस्थानची भावी राज्य घटना आणी अस्पृश्य निवारणाची योजना’. देशातील प्रांतिक व मध्यवर्ती विधीमंडळात अस्पृश्याना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळण्याचा हक्क असावा. सार्वत्रीक मतदान पद्दती असावी. पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदार पद्दतीने व नंतर सामुहिक मतदार पद्दतीने परंतू राखीव जागेच्या व्यवस्थेनुसार आपली माणसे प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा हक्क अस्पृश्य वर्गीयाना असावा. सरकारी नोकरीत प्रमानशीर भर्ती करण्यासाठी लोकसेवा आयोग नेमावे. निर्बंधात व व्यवहारा कुठलिही जातपात पाळू नये. अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी एक खास खाते निर्माण करावे. प्रांतिक व स्थानीक सरकारने अस्पृश्यांच्या हिताकडे दुर्लक्ष वा कानाडोळा केल्यास त्या विरोधात हिंदुस्थान सरकारकडे किंवा भारतमंत्र्याकडे तक्रार करण्याचा अधिकार अस्पृश्य प्रतिनिधीना वा संस्थेना देण्यात यावा. मुलभूत हक्काची मागणी करणारा हा जाहिरनामा म्हणजे पाचावर धारण होता. जातुन सर्व लोकानी या जाहिरनाम्याच्या बाजुन केल दिला. ब्रिटिशांची तारांबळ उडाली. ईकडे हिंदु नेत्यांचा तिळपापड होत होता.
मुसलमान प्रतिनिधीनी सिंध प्रांत, स्वतंत्र मतदार संघ व वायव्य प्रांत वेगळा करुन दयावा अशा मागण्या लावुन धरल्या. अस्पृश्यवर्गाच्या मागणीला ते पाठिंबा देत नव्हते. कारण अस्पृश्य हे शेवटि हिंदुच होते. त्यांच्या मताप्रमाणे उद्या हे दोघे एकत्र होतील व आपल्या हक्कावर गदा आणतील असे त्याना वाटे. त्यांच्या संयुक्त बळापुढे आपला टिकाव लागणार नाही अशी त्याना भीती वाटत असे.

भारतातील अस्पृस्य कशी युगानुयुगे असाह्य वेदना सहन करतोय, अपमान कारक व अंखंड दु:ख भोगतो आहे याकडे जगाचे लक्ष वेधण्याचे काम अहोरात्र चालु होते. अस्पृश्यांची परिस्थीती अमेरीकेतील निग्रोंपेक्षा कशी वाईट आहे हे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी कित्येका ठिकाणाहुन भाषणे, पत्रके व लिखान करुन बाबासाहेबानी सा-या जगाला या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडले. बाबासाहेबांच्या या प्रयत्नाना ब-यापैकी यश आले. मिस एलिनॉर, मिस. एलेन, नॉर्मन ऍन्जेल इत्यादी लोकसभेतील सभासदांनी लॉर्ड सॅंकी यांची भेट घेतली. अस्पृश्य वर्गाला सरसकट मतदानाचा अधिकार दयावा अन त्यांच्या गा-हाण्यांचे निवारण करावे अशी विनंती केली. हि बाबासाहेबांची पहिली विजयी मुसंडी होती. गो-या लोकानी आता हा प्रश्न सोडविण्यात यावा यावर आपले मत देणे सुरु केले. लॉर्ड सॅंकी यानी अस्पृश्याना त्यांचे मुलभूत अधिकार मिळतील असे आश्वासन दिले. हि मुसंडीची फलश्रूती होती.
याच्या अगदी उलट भारतीय मिडीयानी मोहिम हाती घेतली होती. बाबासाहेबांवर उभ्या जगातुन मदतीच्या वर्षाव होत होता. त्यांच्या तर्कशुध्द व वस्तुनिष्ठ प्रश्नानी जगाला गदागदा हालवुन सोडले होते. सारा मिडीया त्याना या विधायक कामात सहाय्य करत होता. भारतीय मिडीयानी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. बाबासाहेबांवर टीका होताना बघुन ईथल्या दलितांच्या हृदयात संतापाची लाट उसळत असे पण आपला राजा तिथे एकेकाला तुडवित आहे याचं मनात समाधान होतं. बाबासाहेबांच्या उद्योगशिलतेने आणि बुद्दिवादाने परिषदेतील कित्येक प्रतिनिधी भारावुन गेले. बाबासाहेबांबद्दल त्याना अत्यंत आदर वाटु लागला. एक महान विद्वान त्या परिषदेला लाभल्यामुळे ते स्वत: कृतकृत झाले होते. बाबासाहेब ईथे परिषदेत व्यस्त असताना त्याना एक आनंदाची बातमी देणारी तार मिळाली. महाड सत्याग्रहाच्या खटल्याचा निकाल लागला. अस्पृश्यांचा विजय झाला अशी तार होती. हि तार वाचुन बाबासाहेबांच्या डोळ्यांतुन आनंदाश्रू वाहु लागले. पाणी मिळविण्यासाठी लढा उभारावा लागतो ईथुन सुरु होणारा लढा समता गाठेस्तोवर लढायचे म्हणजे महा कठीण काम, पण ही तार मात्र पुढे विजयश्री वाढुन ठेवल्याचं सांगत होती.
विविध उपसमित्यांचा अहवाल संमत करुन गोलमेज परिषद १९ जाने १९३१ साली स्थगित झाली. त्यानंतर लगोलगो हिंदी प्रश्नावर ब्रिटिश लोकसभेच चर्चा अन वादावादी सुरु झाली. परिषदेत ठरलेल्या तत्वांवर भावी भारताची राज्यघट्ना तयार केली जाईल व त्यामधे अस्पृश्यांचा मुद्दा निकाली काढण्यात येईल. त्याना मुलभूत अधिकार बहाल केले जातील असे रॅम्से मॅक्डोनाल्ड साहेबानी लोकसभेत भाषण केले. या वादविवादाच्या वेळी आयझॅक फूट नामक सदस्यानी अस्पृश्यांच्या बाजुने आवाज उठविला. अस्पृश्यांची बाजु मांडताना ते सदग्रुहस्थ म्हणतात “जर आज आपण अस्पृश्यांचा प्रश्न सोडविला नाही तर आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याना हयाचे पाप भोगावे लागतील. यापुढे भारतात जाणा-या भावी राज्यपालानी अस्पृश्याना सहाय्य व सहानुभूतीचा हात दयावा अन त्याना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे सर्व प्रयत्न करणे हेच आपले ध्येय आहे ठेवले पाहिजे अशी मी त्याना ताकिद देतो.”फूट साहेबांचे हे वाक्य म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचे प्रशस्तीपत्र होय.

१३ फेब्रु. १९३१ रोजी बाबासाहेब भारताच्या प्रवासासाठी एस. एस. मुलतान नावाच्या बोटीवर चढतात. गोलमेज परिषदेत विविध विषयावर सखोल चर्चा घड्वुन आणण्याचे अत्यंत जबाबदारीचे काम पुर्ण करुन आज बाबासाहेब मायदेशीच्या वाटेवर होते. त्यातल्या त्यात अस्पृश्यांच्या प्रश्नावर सारं जग हालवुन सोडल्यामुळे आता काहितरी निर्णायक निकाल हाती लागेल अशी खात्री वाटे. २७ फेब्रु. १९३१ रोजी ते मुंबई बंदरात उतरतात. शंकरराव वडवळकरा यांच्या नेतृत्वाखाली समाज समता दलाच्या दोन हजार स्वयंसेवकानी मुंबई बंदरात बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले. एका वार्ताहाराला उत्तर देतात, “गोलमेज परिषद हि मुत्सद्देगिरीचा विजय आहे. जरी नियोजीत राज्य घटनेत काही दोष असले तरी ते फार महत्वाचे नाहीत. आपल्याला ते नंतरही दूर करता येतील. अन त्यानी असे स्पष्ट केले की भावी राज्यघटनेत अस्पृश्यांचे हित साधले जाईल व हाल अपेष्टा संपुष्टात येतील.” अशा प्रकारे पहिली गोलमेज परिषद पुर्ण होते.

0 comments:

Post a Comment