डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुसरी)
लंडनला आगमन
२९ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब लंडनला पोहचले. या प्रवासात बाबासाहेबांची तब्बेत खालवली अन तिथे पोहचताच ते आजारी पडले. ताप, उलटी व जुलाबानी प्रकृती ढासळली. शिवतरकराना लिहलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, “प्रकृतीच्या बाबतीत मी सध्या आणीबाणीच्या प्रसंगातून जात आहे.” ७ सप्टे १९३१ पासुन त्याना आराम वाटू लागले पण कमालीचा अशक्तपणा आला होता. ईकडे विधायक काम पुढे उभं ठाकलेलं अन प्रकृतीने मधेच घोळ घातला. त्याना मनातून वाटे की जरा आराम करावा पण हा आराम आपल्या समाज बांधवाना नडू नये म्हणून स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन कामाला सुरुवात केली.
या परिषदेत मुस्लिम लीगचे प्रतिनिधी अध्यक्ष सर मो. इक्बाल, ख्रिश्चनांचे डॉ. ह्स. के. दत्त, उद्योग मंडळाचे जी.डी. बिर्ला इत्यादी मंडळी हजर होती. या परिषदेचे आकर्षण, अन भारताचे अनभिषिक्त राजे श्री. गांधी मात्र आजून तिकडे घोड घालून बसले होते. त्यानी गोलमेजला येण्याचा ईरादा अद्याप जाहीर केला नव्हता. ईकडे सर्व सदस्य लंड्नात पोहचले होते. शेवटी २९ ऑगस्ट १९३१ ला गांधी महाशय मुंबईहुन लंडनसाठी रवाना होतात. ते १२ सप्टे १९३१ रोजी लंडनला पोहचतात पण तोवर गोलमेज-२ सुरु झाली होती.
७ सप्टे १९३१ रोजी दुस-या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेत घटना समिती व अल्पसंख्यांक समिती अशा या दोन समित्यानी गोलमेज-२ चे प्रमुख कार्य करावयाचे होते. गोलमेज-१ मधे ठरलेल्या ब-याच गोष्टीना मुर्तरुप देण्याचे काम वरील दोन समित्यांवर सोपविण्यात आले होते. गोलमेज-१ च्या वेळी केलेल्या अहवालाची फेरतपासणी, विस्तार अन विवरण हे या परिषदेचे मुख्य कार्य होते. आता गांधी लंडनमधे आले होते. त्यानी १५ सप्टे १९३१ रोजी आपले पहिले वहिले भाषण गोलमेज-२ मधे झाडले. ते म्हणतात, “कॉंग्रेस हि संस्था कोणत्याही एक जातीच्या, धर्माच्या किंवा वर्गाची प्रतिनीधी नसून सर्व धर्म, जाती अन वर्गाच्या लोकांची एकमेव प्रतिनीधी आहे. कॉंगेसचे मुख्य दोन ध्येय आहेत १) हिंदु-मुस्लिम ऐक्य २) अस्पृश्यता निवारण, अन अशा संस्थेचा मे एकमेव लोकनियुक्त प्रतिनीधी आहे. थोडक्यात मी अन फक्त मीच खरा भारताचा प्रतिनीधी आहे.”
एवढे बोलून गांधी पुढे म्हणतात, “कॉंगेस ही केवळ ब्रिटीश हिंदुस्थानातीलच नव्हे तर संस्थांनी जनतेतीलही ९५% लोकांची प्रतिनीधी आहे असा मी छातीठोकपणे दाव करतो आहे.”
त्यावर हजरजवाबी बाबासाहेब लगेच प्रश्न टाकतात, “ ज्या ५% लोकांचं आपण प्रतिनिधीत्व करत नाही ते कोण आहेत जरा कळेल का हो गांधीजी?’
गांधी लगेच म्हणतात, “डॉक्टर साहेब, कॉंगेस अस्पृश्यांचाह प्रतिनीधी आहे हे तुम्ही याद राखा.”
बाबासाहेबाना काय कळायच ते कळलं. या गांधीनी आपण अस्पृश्यांचे प्रतिनीधी आहोत असा आव आणुन आमचे अधिकार विसर्जीत करण्याची पुर्ण तयारी केली आहे याच अंदाज आला. आता मोर्चेबांधणीचे काम जोमाने चालविल्या शिवाय गत्यंतर नाही याची जाण झाली.
या परिषदेतील गंमत अशी की याच दिवशी म्हणजे १५ सप्टे १९३१ रोजी बाबासाहेबाना समिती समोर भाषण करण्याची संधी मिळाली. ते उठुन उभे होतात अन भाषणास सुरवात करतात.
“संस्थानीकांच्या मागण्या सरसकट वा आंधळेपणाने समितीनी मान्य करु नये. एखादया संस्थानीकाने संघराज्यात सामील होण्यापूर्वी आपल्या प्रजेचे समाजजीवन सुसंस्कृत करण्यास आपण समर्थ आहो हे सिद्ध केले पाहिजे. जमीनदार म्हणतात कि आपल्याला विशेष अधिकाराचे प्रतिनिधीत्व दयावे. पण असा अधिकार जमीनदाराना दिल्यास स्वातंत्र्याचा अन प्रगतीचा हेतू निष्फळ ठरेल. कारण जमीनदार नेहमी क्रांतीविरोधी सनातन्यांच्याच पक्षाला झुकतं माप देतात.”
जनतेच्या हक्काचे अन लोकांच्या कल्याणाचे हे तेजस्वी भाषण सभागृहातील संस्थानीकांचे अन जमीनदारांचे तोंड्चे पाणी पळविणारे भाषण ठरले. या जहाल मतामुळे जहागीरदार अन संस्थानीक हादरले. बाबासाहेबानी आपल्या धिकारावर पाणी फिरविणारे मत मांडण्याची काहीच गरज नव्हती असे त्यांचे मत झाले. बाबासाहेबांच्या या भाषणामूले त्या नंतर प्रत्येक संस्थानीक व जमीनदाराला वरील भाषणाचा धागा धरून आपले मत मांडणे अपरिहार्य होऊन बसले. अशा प्रकारे १५ सप्टे चा दिवस संपला.
१६ सप्टे १९३१ रोजी सभागृहात जमीनदारांच्या चेह-याव नाराजीच्या लकीरा उमटलेल्या दिसत होत्या. बाबासाहेबांच्या भाषणाचा तो परिणाम आजुन ओसरला नव्हता. तेवढ्यात गांधी उठून भाषणास सुरुवात करतात. “परिषदेतील पुढारी लोक नियुक्त नसून सरकार नियुक्त आहेत. आंबेडकरांच्या मताला माझी सहानुभूती आहे. पण मी जमीनदारांच्याच बाजूने आहे. संस्थानीकानी आपल्या संस्थानामधे काय करावे हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही.” या वाक्यानी गांधीचा नालायकपण जगजाहिर झाला. त्यानी गेव्हिंग जोन्स अन सुल्तान अहमद यांच्या मताचे समर्थन करुन सामान्य लोकांपेक्षा जमीनदार व संस्थानिकाना झुकतं माप दिलं.
आता गांधी परिषदेतील मुख्य मुद्याला हात घालतात, “हिंदु, मुसलमान व शिख यांच्या स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास मी तयार आहे. तसं त्याना मिळायलाही पाहिजे. पण ऐतिहासिक कारण पुढे करुन आंबेडकरानी अस्पृश्यांसाठी जे प्रतिनिधित्व मागितले ते मला कदापी मान्य नाही. अस्पृश्याना विशेष अधिकार वा वेगळे प्रतिनिधित्व देण्यात येऊ नये असे मी आज परिषदेला बजावुन सांगतो. परिषदेने तसे प्रतिनिधित्व अस्पृश्यांच्या ओटीत टाकल्यास मी कडाळुन विरोध करेन.” मणिभवन मधेल डागलेल्या तोफेला दिलेले हे प्रतिउत्तर होय. गांधीना खरं तर ईथे यायचंच नव्हतं. पण बाबासाहेबांचा विरोध करुन अस्पृश्यांच्या हाती काहीच पडु दयायचे नाही या कपटबुद्धिने ग्रासलेल्या गांधीने फक्त कट कारस्तानं करण्यासाठी परिषदेस हजेरी लावली. आता अल्पसंख्यांक समितीपुढे गांधी काय घोळ घालणार हे चित्र स्पष्ट झालं होतं.
फेडरल स्ट्रक्चर कमिटी:
१८ सप्टे रोजी घटना समितीची (फेडरल स्ट्रक्चर कमिटी) बैठक सुरु झाली. बाबासाहेबानी गांधीना एक महत्वाचा प्रश्न विचारला. “संघराज्याच्या विधिमंडळाचे अन संघराज्याच्या कार्यकारी मंडळाचे स्वरुप कसे असावे ह्यासंबंधी गांधीजीनी मांडलेले विचार हे त्यांचे स्वत:चे आहेत की कॉंगेसचे?”
संघराज्याच्या घटने बद्दल विचार विनिमय चालू होता पण संघराज्याची स्थापना केंव्हा करावी यावर कोणीच बोलत नव्हते. शेवटी बाबासाहेबानी विषयाला हात घातला. अशा विविध विषयावर जंगी चर्चा रंगत असे. भांड्ण होत असत. वाद विवादाचा महापुर ओसंडुन वाहत असे. कित्येकांमधे चकमकी उडत असत. स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र राज्यघटनेचा उहापोह रंगुन जाई. घटना शास्त्राच्या इतिहासाची उजळणी होई. या सगळ्या धामधुमीत एक व्यक्ती मात्र सर्वाना पुरुन उरत असे ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. कारण देशाची घटना बनविण्याच्या कामाची हि प्राथमिक फेरी होती. ईथी नुसतं बोलण्याला अर्थ नव्हता. त्याला अभ्यासाची जोड, अन आकडेवारीनी विश्लेषणाची गरज लागे. अन या बाबतीत बाबासाहेबांच्या तोडीचा कोणीच नव्हता. अत्यंत अभ्यास व विद्येचा सच्चा उपासक असलेल्या या महामानवानी आपल्या तेजानी वेळी वेळी हे सभागृल झळाळून सोडले. त्यांची भाषणे माहितीपुर्ण, इतिहासातील संदर्भासहित भविष्याचा वेध घेणारे असत. त्याच सोबत प्रत्येक भाषणांमध्ये उपयुक्त सुचनांचा भडिमार असे ज्याचं भान राखल्यास देशाची घटना एक परिपुर्ण घट्ना म्हणुन नावारुपाला येण्याचे सगळे अंगभूत गुण त्यात अंतर्भूत केलेले असत. अशा प्रकारे विविध क्षेत्रात लिलया वावरणारे अन चतुरस्त्र दांडगाई करणारे बाबासाहेब या परिषदेत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून जातात. अशा प्रकारे जंगी चर्चा अन वाद विवादानी रंगलेली हे फेडरल स्ट्रक्चर समितीची बैठ्क सप्टेबरच्या तिस-या आठवड्या पर्यंत चालते.
आता लवकरच अल्पसंख्यांक समितीचे काम सुरु होणार होते. या मधल्या काळात गांधीजीचे पुत्र देवदास यानी बाबासाहेबांची अन गांधीजींची भेट सरोजीनी नायडू यांच्या निवासस्थानी घडवून आणली. तेंव्हा गांधी म्हणतात, “सभागृहातील इतर सभासदानी जर तुमच्या अस्पृश्यांच्या प्रतिनिधीत्वास मान्यता दिल्यास आपणही देऊ.” असा गांधी घोळ घालतात. बाबासाहेबाना काय कळायचे ते कळले.
अल्पसंख्यांक समिती:
२८ सप्टे १९३१ रोजी अल्पसंख्यांक समितीचे कामकाज सुरु झाले. या समितीच्या पुढे खरी आव्हाहन होती. राज्यघटनेपेक्षा ईथे खुप खटके उडणार होते. प्रत्येक संघटना जास्तीत जास्त मागण्या पदरी पाडण्याचे प्रयत्न करणार होती. त्यावरुन खुप वादावादी व खडाजंगी होणार हे गृहितच होते. एवढे कमी की काय म्हणुन घोड घालायला गांधी होतेच. पहिल्याच दिवशी प्रतिनिधींमध्ये अपेक्षेप्रमाणे एकमत होण्याची कुठलीच चिन्हे दिसत नव्हती. आगाखान यानी सुचना केली की आज रात्री गांधी मुसलमान नेत्याना भेटुन काहितरी मार्ग काढतील त्यामुळे ही सभा स्थगीत करावी.
गांधी मुसलमानांशी जे काही गुप्त खलबते चालविले होते त्याची पुर्ण जाण बाबासाहेबाना होते. आगाखानच्या सुचने नंतर लगेच ते भाषण करायला उठले. बाबासाहेब म्हणतात “अस्पृश्य वर्गाच्या सर्व मागण्या आम्ही गेल्या वेळेसच अल्पसंख्यांक समितीस सादर केल्या आहेत. आता आम्ही एकच गोष्ट विचाराधीन ठेवणार आहोत ती म्हणजे, आम्हाला प्रत्येक प्रांतात प्रतिनिधींच्या संख्येचे प्रमाण किती असावे ही होय. बाकी तुमच्या वाटाघाटी चालू दया. फक्त एकच लक्षात ठेवावे, विशेष सवलती मागणारे अन देणारे यानी आमच्या वाट्यातील काहीच कुणाला देता कामा नये.”
यावर परिषदेचे अध्यक्ष रॅम्से मॅक्डोनाल्ड म्हणतात, बाबासाहेबानी आपले म्हणणे नेहमी प्रमाणे अत्यंत आकर्षक व अचूक शब्दात मांडले आहे.
१ ऑक्टो १९३१ रोजी गांधीनी समितीपुढे परत एक आठवड्याची मुदत वाढवून मागितली. मुसलमान पुढा-यांशी आपली बोलणी चालु आहे अन ती अत्यंत निर्णायक वळणावर आली आहे. यावर बाबासाहेब गांधीना विचारतात की या निर्णायक बोलणीत कोणी अस्पृश्य प्रतिनिधी असणार की नाही? गांधीनी होकारर्थी मान हलविली. आभार माणुन बाबासाहेब पुढे म्हणतात, “पहिल्या अधिवेशनात समितीने जसे अस्पृश्यांचे स्थान राज्यघटनेत मान्य केले होते ते कुठल्याही परिस्थीत कोणाच्याही दबावाला न जुमानता तसेच अबाधित ठेवावे. जर भावी राज्यघटनेत अस्पृश्याना स्थान मिळणार नसेल तर अशा समितीत आपण भाग घेणार नाही. किंवा गांधीच्या तहकुबीच्या ठरावाला पाठिंबा देणार नाही.” अशा प्रकारे बाबासाहेबानी आपली अट पुढे करुनच सभा तहकुबीला मान्यता दिली. सभा आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली. आता गांधी सर्व नेत्यांमधे समेट घड्वून आणण्यासाठी युद्ध पातळीवर लढणार होते.
मुसलमानांशी वाटाघाटीचे प्रयत्न
गांधी अन मुसलमान पुढा-यां मधे आठवडाभर वाटाघाटी चालू होत्या. सकारात्मक परिणा येणार अशा बातम्या वृत्तपत्रातून छापून येऊ लागल्या. गांधीनी मुसलमानांच्या १४ मागण्या मान्य केल्याचेही बोलल्या जाऊ लागले. घटक राज्याना शेषाधिकार असावे अन मुसलमानांना पंजाब आणि बंगाल या दोन प्रांतात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे बहुसंख्य प्रतिनिधीत्व दयावे या मागण्याना गांधीजीनी मान्यता दिली. शिवाय वरून मुसलमानाना कोरा चेक देण्याचे वरदान गांधीनी देऊन टाकले. ज्याचा परिणाम स्वातंत्र्याच्या वेळी आपणास भोगावा लागला. या सगळ्या मागण्या गांधीनी मान्य केल्या पण पंजाबच्या मागणीतुन शिख-मुसलमान यांच्यात एकमत होईना. यावर गांधीनी शिख व मुसलमान नेत्यामध्ये समेट घड्वून आणण्याचे सर्व प्रयत्न केले पण दोन्ही कडचे नेते हट्टाला पेटले होते. शेवटी आठवडाभरची मेहनत पाण्यात गेली अन हा समेट घडवून आणण्यात गांधी अपयशी ठरले.
८ ऑक्टो १९३१ रोजी गांधीजी बैठकीस आले व समेट घडवून आणण्यात अपयशी ठरल्याचे अल्पसंख्यांक समितीपुढे कबूल केले. हे अपयश आवश्यकच होते, त्यामुळे गांधीचा खरा चेहरा पुढे आला ते म्हणाले, “परिषदेस आलेले प्रतिनिधी हे त्या त्या समाजाचे वा वर्गाचे खरे प्रतिनिधी नाहित. म्हणुन समेट घडवून आणता आले नाही. त्यामुळे सरकारनी ही समिती व सभा बेमूदत तहकूब करावी.” काम न जमल्यास अत्यंत खालच्या स्थराला जाऊन आरोप करण्याचा गांधीचा स्वभाव ईथे उघड पडला.
यावर बाबासाहेबानी गांधीना धारेवर धरले. ते म्हणाले, “गांधीनी कराराचा भंग केला आहे. कोणत्याही प्रतिनिधीला प्रक्षोभ निर्माण होईल असे न बोलण्याचे ठरले असताना गांधीनी आमच्यावर शिंतोळे उडविले आहेत. त्यानी नुसती सभातहकूबीची सुचना करायला हवी होती. पण परिषदेस आलेले प्रतिनिधी खोटे आहेत हा आरोप गंभीर व संतापजनक आहे. आम्ही सरकार नियूक्त प्रतिनिधी आहोत हे मान्य आहे पण अस्पृश्यांचा प्रतिनिधी माझ्या शिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही हे गांधीनी ध्यानात ठेवावे.” अशा प्रकारे अत्यंत प्रखर व खरमरीत समाचार घेऊन बाबासाहेब गांधीवर भीमरूपी तोफ डागतात. बाबासाहेब नावाची तोफ गोलमेजच्या सभागृहात वेळोवेळी धडाडु लागली. ज्ञानाच्या मिश्रणातून तयार होणारा दारुगोळा कधी ब्रिटीशांवर आग ओकत असे तर कधी गांधींवर.
यानंतर ब्रिटीश पंतप्रधानानी गांधीला उद्देशून एक भाषण केले. कोण प्रतिनिधी कसा निवडून आला यावर उगीच वेळ वाया दवडण्यापेक्षा विधायक कामात प्रतिनिधीनी लक्ष घालावे असा टोला हाणला.
गांधीचे समेट विषयीचे अपयश अन त्यामुळे आलेली निराशा यातून आता गांधीचा संयमाचा ढोंग सुटत चाललेला होता व खरा गांधी दिसु लागला. गांधीशी झालेली झटापटी सगळ्याना कळावी म्हणुन बाबासाहेबानी देश विदेशातील पत्रकाराना हा संपुर्ण प्रकार जशाच तसं सांगितला अन त्यानी केलेले आरोप कसे बिनबुडाचे व अपयशातून आलेली विकृती दर्शविणारे आहेत हे सिद्ध केले.
१२ ऑक्टो १९३१ च्या पत्रात ते म्हणतात, “मुसलमानांच्या १४ मागण्या मान्य करताना गांधीजीनी अशी अट घाटली की अस्पृश्य वर्गाच्या मागण्याना सभागृहात मुसलमानानी विरोध करावा. म्हणजे सरोजीनी नायडुच्या निवासस्थानी टाकलेला फासा काम करेल. गांधी अस्पृश्यांच्या तोंडचे पाणी पडविण्यास अशी अक्कल हुशारी वापर होते. आपण प्रतिसवाल केल्यास मुसलमानांकडे बोट दाखवुन हात झटकण्याचा हा डाव होता. तुमच्या मागण्या मान्य केल्या असे उघड उघड म्हणायचे अन दुस-या मार्फत त्या न मिळण्याचा बंदोबस्त करायाचे. तयार न होणा-या प्रतिनिधीना वेळप्रसंगी विकत घ्यायचे असा हा महात्म्याला न शोभणारा प्रकार गांधीनी केला आहे. हि गांधीची भूमिका मित्राची तर नाहीच पण छातीठोकपणे पुढे येणा-या मर्दाचीपण नाही.”
बाबासाहेबांच्या मागण्याना गांधीजीनी अशा प्रकारे विरोध अन भेदनितीने जाती जाती मध्ये भडका उडविण्याचे कट कारस्थान केल्यामुळे भारतातील अस्पृश्य पेटून उठले. याचा निषेध करण्यासाठी रावबहाद्दुर एम. सी. राजा यानी विशाल सभा भरविली. या परिषदेत अस्पृश्यानी गांधीचे नेतृत्व नाकारण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव तारेनी बाबासाहेबाना कळविण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्याचे नेते फक्त अन फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहेत याचा पुरावा देण्यासाठी भारताच्या कानाकोप-यातून लंडनमधे बाबासाहेबांवर तारांचा वर्षाव करण्यात आला. गांधीनी बाबासाहेबांवर सरकार नियुक्त प्रतिनिधी म्हणुन लावलेल्या आरोपाचे हे सणसणीत उत्तर होते. उभ्या भारतातून अस्पृश्यानी फोडलेल्या भीम गर्जनेच्या गगनभेदी आरोळ्याचा हा प्रतिध्वनी गो-यांच्या देशात असा गुंजून गेला की जागो जागी गांधीला तोंड लपवून पळावे लागे. लंडनमधील सभांमधून, चर्चातून, मुलाखतीतून गांधीना अस्पृश्यां बद्दल विचारणा करण्यात येई. प्रतिउत्तरादाखल देण्यासारखे गांधीकडे काहीच नसायचे अन गांधी नंग्या अवस्थेत पुन्हा नंगा केला जाऊ लागला. भरीत भर म्हणुन नाशिकची चळवळ जोर धरली. सत्याग्रहाला उधाण आले होते. नाशिकात अस्पृश्याना कसे मंदिर प्रवेशासाठी तीन वर्षापासुन लढावे लागत आहे याची इत्यंभूत माहीती ब्रिटनच्या London Times मधे प्रसिद्ध होई. त्यामुळे गोरे लोकं गांधीला गाठून पाणी पाजत अन बाबासाहेबांकडे सहानुभूतीपुर्ण नजरेनी पाहत. नाशिकच्या स्त्याग्रहामुळे गांधीची लंडनमधे पुरेवाट लागली होती. तुमच्या सारख्या महात्म्याच्या देशात मंदिर प्रवेशासाठी अशी चळवळ उभी राहते हे तुमच्या माहात्म्याला न शोभणारी बाब आहे असा प्रतिसावा होई. यावर उत्तर नसल्यामुळे गांधी अक्षरशा पळ काढता.
म्युरायल लेक्टर नावाची फ्रेंच बाई जिच्याकडे गांधी या परिषदेच्या दरम्यान मुक्कामास होते तीला गांधीचा ईथे चाललेला उपहास सहन झाला नाही. ब्रिटीश पत्रकारानी व अमेरीकन मिडीयानी गांधीला सळो की पळॊ करुन सोडले होते. बाबासाहेबानी अहोरात्र कष्ट करुननिवेदने प्रसिद्ध केलीत. प्रतिकूल मतांचा परामर्श घेतला. वजनदाव व्यक्तीना भेटून आपले मत पटवून दिले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की गांधीवर मिडीयानी फास आवळायला सुरुवात केली. या सर्व घडामोडीमुळे लेक्टर बाईनी बाबासाहेबांची भेट घेण्याचे ठरविले. कोण हा अतिशहाना गांधीच्या विरोधात मोहिम चालवतो आहे या अविर्भावात त्या बाई भेटायला आल्या ख-या पण पुढे उभा ठाकलेला तेजस्वी पुरुष अत्यंत विदारक सत्य तिला उलगडुन सांगतो. तेंव्हा लेक्टर बाई अंतर्मुख होऊन मूक रडतात. अस्पृश्यांची बाजू मांडण्याची बाबासाहेबांची हातोटी अत्यंत परिणामकारक, विदारक अन पुढच्या व्यक्तीच्या काळजाला छेदुन जाणारी असे. बाबासाहेब अन गांधी दोघांचेही मित्र असलेल्या कित्येक लोकानी दोघात समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण यश आले नाही. कारण गांधीचा हरिजन कार्याचा पाया भूतदयावर अधिष्ठित होता. याच दरम्यान ऑक्टो १९३१ च्या अखेरीस ब्रिटनमधे निवडणुका होतात अन मजूर पक्षाची दाणदाण उडते.
गांधीजीवरील कठोर हल्यामुळे ईकडे भारतातील वृत्तपत्रानी मात्र उलट प्रकार चालविला होता. उभ्या जागातील पत्रकारानी गांधीला वेठीस धरून भंडावून सोडले असता भारतीय पत्रकारीता बाबासाहेबांवर शिंतोळे उडविण्यात मग्न होती. गांधीच्या प्रेमापोटी पत्रकाराना बाबासाहेब देशद्रोही वाटू लागले, ब्रिटिशांचे बगलबच्चे वाटू लागले. हिंदूंचा वैरी अन देश बुडव्या अशा विविध अपमानकारक अन अशोभनीय मथळ्याखाली बाबासाहेबांवर देशभरात टिका चालू होती.
गांधीजी म्हणत, आपण अस्पृश्यांचे स्वाभाविक पालक आहोत, तर बाबासाहेब म्हणत आपण अस्पृश्यवर्गाचे जन्मजात अन स्वयंसिद्ध नेते आहोत. गांधीजीचे नेतृत्व हे भूतदयेवर आधारीत , भावनाप्रधान व कृत्रीम होते तर बाबासाहेबांचे नेतृत्व निसर्गसिद्ध, वास्तववादी अन व्यवहारनिष्ठ होते. बाबासाहेबानी अजोड अन अतुल्य अशा हिंदु नेत्याची सत्ता व नेतृत्व झुगारून देली. तर तिकडे गांधीमधील अजिंक्य अहंकाराने स्वत:मधील सतपुरुषावर मात करुन आंबेडकरांपुढे दंड थोपटून उभे ठाकण्यास भाग पाडले. सदैव स्तूती-स्त्रोत्रे ऐकण्याची सवय असलेला हा कृत्रीम देव आज स्वामिनिष्ठ भक्तांपासून साता समुद्रापार जगाच्या व्यवहारातील निष्ठुरपणाला पहिल्यांदाच समोर जात होता. राजकारणातील मुरब्बी अन सडेतोड पुरुषांशी पहिल्यांदाच गाठ पडल्यामुळे आपल्या बलस्थानांची टिंगल टवाळी होताना हताशपणे पाहण्या पलिकडे काहीच करू शकत नव्हता. भारतीय वृत्तपत्रे अन भक्तांचा घोळका यांच्या स्तुतीसुमना ऐवजी इंग्रजी पत्रकारांचा विच्छेदनयुक्त प्रश्नांचा भडीमार ईतका भेदक असे की आजवर उभी केलेली गांधीजींची आभासी प्रतीमा धडाधड कोसळू लागली. याच्या अगदी उलट बाबासाहेब मात्र कॉंग्रेसच्या भाडोत्री पत्रकारांपासुन हजारो मैल दूर राणीच्या देशात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक मुत्सद्दी म्हणुन मान्यता पावत होते. कुठलाही धनसंपदेचा पाठिंबा नसताना केवळ बुद्धीवैभावाच्या जोरावर नवीन इतिहास रचत होते. अलौकिक बुद्धिमत्ता, अंगभूत गुणवत्ता अन धैर्यशाली व न्यायप्रिय वृत्तीमुळे जगाच्या इतिहासात नविन पानं रंगविण्यात गढून गेले.
मुसलमान प्रतिनिधींचा निर्णय गांधीना नडला
गांधीनी मोठ्या शिताफिने मुसलमानांच्या १४ मागण्या मान्य केल्या व त्यानी अस्पृश्य व इतर अल्पसंख्यांकाच्या मागण्याला पाठिंबा देऊ नये असा कूटनीतीपुर्ण प्रस्ताव ठेवला. पण मुसलमानानी इतर अल्पसंख्यांकाचा घात न करण्याचे जाहिर केले व गांधीच्या पाचावर धारण बसली. याला एक दुसरी बाजू सुद्धा होती. मुसलमानांची एक ठरलेली नीती होती. आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी इतर प्रतिनिधींशी समेटाचे बोलणे चालवायचे. हिंदु पुढा-यांशी बोलताना अनेक मागण्या लावून धरायच्या. अत्यंत टोकाची भूमिका घेत त्यातील अधिकाधिक मागण्या मान्य करवून घ्यायच्या अन शेवटच्या घडीला ब्रिटीशांकडे दुसरा फासा फेकायचा की, हे बघा एवढ्या मागण्या हिंदु पुढारी देण्यास तयार आहेत. तुम्ही या पेक्षा जास्त काय देणार ते बोला. स्वतंत्र मतदार संघ मिळावा म्हणुन मुसलमान आकाश पाताळ एक करत होते. सर्व शक्ती झोकून देऊन ते स्वतंत्र मतदार संघ मिळविण्यास एकवटले होते. त्यामूळे गांधीचे ऐकुन जर त्यानी इतर अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देऊ नका असे सभागृहात म्हटल्यास ते स्वत:साठीही स्वतंत्र मतदारसंघ मागण्याचा अधिकार गमावून बसतील याचा त्याना अंदाज होता. मुर्ख जर कोणी होते तर ते गांधी. कारण त्याना असे वाटे की मुसलमान इतरांच्या विरोधात जाऊन स्वत:च्याही पायावर धोंडा मारुन घेतील. आहे की नाही गंमत. ईतकी बेसिक गोष्ट ज्या माणसाला कळत नव्हती तो भारताचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेजला आला होता हे आपले दुर्दैव.
गुप्त निवेदन सादर
गांधीनी मुसलमानाना सोबत घेऊन बाबासाहेबांची नाकेबंदी करण्याचा घाट घातला होता. त्यानी कित्येक डावपेचही आखले. आता मात्र डावपेचाला डावपेचानेच उत्तर देणे गरजेचे होते. बाबासाहेबानी सर्वाना पुरुन उरणारा डावपेच आखला. अहोरात्र झटुन एक अजोड निवेदन तयार केले. स्पृश्य हिंदुच्या विरोधात आपण केलेल्या भाषणाचा मुसलमान पुढारी स्वार्थासाठी वापर करतात व हिंदु पुढारी मात्र सत्य बाजू निट मांडत नाही. एकंदरीत परिस्थीतीचा मुसलमानानी सदैव धुर्तपणे वापर केला व हिंदुंच्या व अस्पृश्यांच्या अहिताचे नित्य चिंतले. तरी हिंदुंच्या मतांचे खरे दर्शन ब्रिटिशाना व्हावे म्हणुन तयार केलेले हे निवेदन बाबासाहेबानी गुप्त पणे मुख्य प्रधान मॅक्डोनाल्ड याना सादर केले.
दुहेरी गुलामगिरी
खरं तर स्पृश्य हिंद हा फक्त राजकीय गुलाम होता. फक्त सव्वाशे वर्षाची गुलामगिरी झुगारुन देण्यासाठी तो इंग्रजांच्या विरोधात पेटुन उठला होता. अत्यंत निष्ठुर व टोकाची भुमीका घेऊन तो इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरला होता. पण अस्पृश्यांची व्यथा मात्र अत्यंत निराळी होती. इंग्रजांची गुलामगिरीतर त्यांच्यावर लादली गेली होतीच. पण त्याही आधी आपल्याच धर्मबांधवांकडून सामाजीक गुलामगिरी हजारो वर्षापासुन लादली गेली होती. आज बाबासाहेबांच्या रुपाने एक युगपुरुष आमच्या मदतिला उभा ठकाल होता. आज दोन दोन गुलामगि-यातुन मुक्त होण्यासाठी एकाच वेळी लढा दयायचा होता. स्वातंत्र्य, समता व बंधुता हि मुल्ये आधारभूत माणुन खरंतर गांधीनी अस्पृश्याना संयुक्त मतदारसंघ व राखिव जागा देऊन एक पवित्र कार्यास हातभार लावायला हवे होते. पण त्यानी तसे न करुन एक नवीन अडचण ओढवुन घेतली. या उलट ज्या मुसलमानानी नेहमी धुर्तपणा केला त्याना मात्र गांधीनी वरील सर्व मागण्या मान्य केल्या. आहे की दिवाळे निघालेली अक्कल.
यामुळे बाबासाहेबांपुढे अत्यंत बिकट व आव्हाहनात्मक परिस्थीती येऊन ठेपली होती. आता त्यांच्या पुढे प्रश्न होता ब्रिटिश की गांधी. गांधीकडुन उभे झाल्यास हा माणूस निव्वड आशिर्वाद देऊन रिकाम्या हाती पाठवेल. संयुक्त मतदारसंघ व राखिव जागा गांधीनी आधिच अमान्य केल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या ठेवून त्या मान्य करवुन घेणे हा एकमेव पर्याय बाबासाहेबांपुढे राहिला होता. गत्यंतर नव्हते. गांधीनी मुसलमान व इतर धर्मियाना दिलेले अधिकार अस्पृश्याना देण्याचे साफ नकारले होते.
अल्पसंख्यांक समितीपुढे निवेदन सादर
मुसलमान, ख्रिश्चन, एंग्लो-इंडियन, युरोपियन व अस्पृश्यानी अखेर अल्पसंख्यांक समितीपुढे एक निवेदन सादर केले. त्या निवेदनात असे म्हटले होते की, कोणाही मनुष्याला नोकरी, अधिकारपद, नाकरिकाचे हक्क, धंदा किंवा व्यापार करण्याचा हक्क हा निर्विवाद देण्यात यावा. धर्म, जात, पंथ व कुळ या गोष्टीनी वरील कामात अडथळा निर्माण करु नये. अस्पृश्याना सरकारी कचे-यात नोकरी करण्याचा अधिकार असावा. सैनिक दलात व पोलिस खात्यात अस्पृश्यांची भर्ती करावी. त्याना न्याय दयावा. पंजाबमधिल अस्पृश्याना पंजाब लॅंड एलिनिएशन एक्टचा लाभ मिळावा. अस्पृश्यांच्या गा-हाण्या ऐकण्यात कार्यकारी मंडळानी पक्षपात केल्यास राज्यपालांकडे किंवा महाराज्यपालांकडे न्याय मागण्याची अस्पृश्याना अधिकार व मोकळीक असावी. हे मुख्य निवेदन समितीला सादर करण्यात आले.
पुरवणी निवेदन
बाबासाहेब दलितांच्या बाबतीत नेहमी अपेक्षेपेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन कर्तुत्व बजावत. वरील निवेदना व्यतिरिक्त बाबासाहेबानी समितिला एक पुरवणी निवेदन सादर केले. त्यात बाबासाहेबानी खालील प्रमाणे मागण्य़ा केल्या.
१) सर्व केंद्रिय व प्रांतिक मंडळात अस्पृश्यवर्गाच्या लोकाना खास प्रतिनिधीत्व म्हणुन जागा मिळाव्यात.
२) त्याच सोबत अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावे.
३) जर संयुक्त मतदार संघ नि राखिव जागा ठेवायचे असल्यास वीस वर्षा नंतर अस्पृश्य मतदारांचे सार्वमत घेऊनच निर्णय घ्यावा.
४) अस्पृश्य वर्गास अवर्ण हिंदु असे म्हणावे.
बाबासाहेबांच्या पुरवणी निवेदनानी अस्पृश्यांच्या बाजुने अत्यंत महत्वाची भुमीका बजावली. अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ दयावा अशी अल्पसंख्यांकाच्या करारात नोंद झाली. हे बाबासाहेबांच्या कष्टाचं फळ होतं.
अल्पसंख्यांक समितीपुढे गांधीचे तांडव
अल्पसंख्यांक समितीच्या करारात अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देण्याची नोदं होताच गांधी चवताळून उठतात. त्याना हा स्वत:चा पराजय वाटु लागतो. अस्पृश्याना खितपत ठेवण्याच्या त्यांच्या स्वप्नावंर पाणी फिरल्याचे त्याना वाटले. गुलामाना स्वतंत्र मतदार संघ देऊन स्पृश्य हिंदुंच्या बरोबरीत उभे करण्यासाठी समितीने घेतलेला हा निर्णय गांधीना अस्वस्थ करुन जातो. ते गरजतात, “हिंदु, मुसलमान व शिख यांच्या मध्ये जो निर्णय घेतला जाईल तो मान्य होईल, पण अस्पृश्याना दिलेलं प्रतिनिधीत्व अन स्वतंत्र मतदार संघ कदापी मान्य होणार नाही. मी पुन्हा सांगतो, अस्पृश्यांना दिलेले प्रतिनिधीत्व मला मुळीच मान्य नाही. अस्पृश्यांच्या वतिने मांडलेल्या मागण्या व त्याना समितीने दिलेली संमती हि अत्यंत चुकीची व आम्हाला मुळीच पसंद न पडलेली गोष्ट आहे. मी अस्पृश्यांच्या या मागण्याचा निषेध करतो व त्या मला अमान्य असल्याचे ईथेच जाहिर करतो.”
गांधीनी शेवटी नालायकपणाचा कळस गाठला. आपल्या नीच वृत्तीचा उभ्या सभागृहात दर्शन दिले. गांधी हा माणूस वरवर दिसतो त्या पेक्षा किती धुर्त, अमानूष व कपटी आहे हे सर्व सभासदानी तिथेच बघितले. आपल्याच समाजातील एका वर्गाला तुडवित ठेवण्यावर अडून बसलेला हा नेता या पुढे जेंव्हा जेंव्हा ब्रिटिशांपुढे स्वातंत्र्याची मागणी करेल तेंव्हा तेंव्हा तो स्वातंत्र्य मागत नसून सवर्णांसाठी हलकटपणे राजकीय सत्ता मागत आहे याची आठवण होईल. गांधी हा खरा स्वातंत्र्यलढ्याचा नेता नव्हता ते उभ्या सभागृहानी आजमावले. हा खोटारडे व भामटा नेता होता हे पुराव्यानिशी जाहिर झाले.
एवढ्यावर थांबले असते तर ते कसले गांधी, त्यानी आवेशात येऊन असे म्हटले की, “अस्पृश्य मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारुन हिंदु धर्मातून बाहेर पडत असतील तर पडु दया. मला त्याची अजीबात पर्वा नाही. पण जोवर ते हिंदु धर्माचा भाग आहेत तो वर त्यांच्या या मागण्याना मी कदापी मान्यता देणार नाही.”
लवाद नियुक्तीला मान्यता व गांधीची स्वाक्षरी
अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवरुन गांधीनी सभागृह डोक्यावर घेतले. प्रतिनिधींचे एकमत होत नाही हे पाहून ब्रिटिश मुख्यप्रधानानी प्रतिनिधीना एक सुचना केली. अल्पसंख्यांक प्रश्नांसंबंधी निर्णय देण्यासाठी सर्व प्रतिनिधीनी मुख्य प्रधानास लवाद म्हणुन नेमावे. या लवादानी दिलेला निर्णय बंधनकारक राहील असे निवेदन सादर करावे. अन लवादाने निर्णय दयावा अशी लेखी मागणी सर्व सभासदाने मिळुन स्वेच्छेने करावे नि सर्व प्रतिनिधीनी त्या निवेदनावर स्वाक्ष-या कराव्यात. या युक्ती काम करुन गेली. सर्वाना लवाद नेमुण मिळणार निर्णय मान्य झाला. सर्व प्रतिनिधीनी तसे निवेदन तयार करुन स्वाक्ष-या केल्या. महत्वाचं म्हणजे गांधीनाही लवादाने निर्णय दयावा असे वाटले व त्यानी सही केली. अशा प्रकारे गोलमेज-२ संपन्न झाली व १ डिसेंबर १९३१ रोजी परिषदेचा समारोप झाला.
२८ जाने १९३२ रोजी गांधींचे मुंबईत अगमन झाले. भारताच्या कानाकोप-यातुन अस्पृश्य मुंबईत दाखल झाले. बंदरातच गांधींचा निषेध व विरोध करण्यात आला. गांधी समर्थकही थडकले. लाठ्या, काठ्या, विटा व सोडा बॉटल्सची बरसात झाली. आज महात्मा या नावाचा अस्पृश्यानी मनातच दफनविधी आटोपला अन अनंतकाळासाठी गांधीनी अस्पृश्यांचे वैर ओढवुन घेतले.

0 comments:
Post a Comment